महत्वाच्या बातम्या
-
मनसेचा एकमेव आमदार गळाला लावण्यासाठी भाजपाकडून दबावतंत्राचा वापर? | भाजपाची योजना काय? काय म्हणतात तज्ज्ञ?
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सध्या अनेक दिग्गज नेत्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर भाजपाकडून पाटील यांना गळाला लावण्याच्या हालचाली सुरू झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
3 वर्षांपूर्वी -
मनसेचे आमदार राजू पाटील यांना ईडीचे समन्स | नेमकं काय आहे प्रकरण? - वाचा सविस्तर
ईडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटलांना त्यांच्या जबाब नोंदविण्यासाठी 23 जून रोजी समन्स बजावला होता. ते जबाब देऊन आले आहेत. ते आज मुंबईत कामानिमित्त गेले असता आता या प्रकरणी त्यांची काही गरज आहे का? हे विचारण्यासाठी ईडीच्या कार्यालयात गेल्याची माहिती राजू पाटील यांनी दिली. पण ईडीच्या कार्यालयातील राजू पाटील यांच्या जाण्याने राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
ती तांत्रिक बाब, शिवरायांचं नाव आमची मागणी नाही | नवीन विमानतळाला दि बा पाटील यांचंच नाव दिलं जावं - आ. राजू पाटील
नवी मुंबईतील सिडको भवनाला आंदोलक आज घेराव घालणार आहेत. विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्त नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीने जोर धरला असून, बेलापूर येथील सिडकोच्या मुख्यालयाला हजारोच्या संख्येने घेराव घालण्यासाठी प्रकल्पग्रस्त आणि इतर राजकीय पक्षांतील कार्यकर्ते सकाळपासून सिडको कार्यालयाकडे रवाना होत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
एक आमदार पाठपुरावा दमदार | कल्याणमधील काही रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर | मनसे आमदाराकडून जाहीर आभार
काही दिवसांपूर्वी मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्या भेटीत राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवलीतील विकास कामांसाठी निधी मिळाला यासाठी पाठपुरावा केला होता. त्यावेळी ‘प्रस्ताव पाठवा बाकी मी बघतो, तसेच एखाद्या जवळच्या राष्ट्रीय महामार्गात येणाऱ्या रस्त्याला निधी देतो’असा शब्द त्यांनी दिला होता, तो पूर्ण केला असं स्वतः मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं होतं. यासाठी गडकरींच्या केंद्रीय परिवहन खात्याने तब्बल ४८ कोटी ६१ लाखाचा निधी मंजूर केला होता.
4 वर्षांपूर्वी -
त्या २७ गावांच्या विकासासाठी विशेष पॅकेज द्या | आ. राजू पाटील यांची अर्थमंत्र्यांकडे मागणी
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. 27 गावांसाठी आगामी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात यावी, अशी आग्रहाची विनंती आमदार राजू पाटलांनी बोलून दाखवली होती. त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीण मतदार संघात येणाऱ्या दिवा शिळ डायघर विभागात टोरंट कंपनीला स्थगिती देण्यात यावी, अशीही मागणी यापूर्वी राजू पाटील यांनी अजित पवारांकडे केली होती.
4 वर्षांपूर्वी -
‘एक आहे पण नेक आहे’ | पक्षांतराने अजिबात विचलित होऊ नका
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना मनसेला दोन मोठे धक्के बसले. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तर केडीएमसीचे मनसे गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. साहजिकच मनसे प्रमुख राज ठाकरेंना मोठे धक्के बसल्याची चर्चा झाली. अशा सगळ्या परिस्थितीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील काहीसे बॅकफूटला गेल्याची चर्चा होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राजू पाटील यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवकालीन गडकिल्यांची दुरावस्था | आ. राजू पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले व शिवकालीन इतिहासाचे जिवंत साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांची झालेली दुरावस्था पाहून उद्विग्न झालेले मनसेचे आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ‘अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तेव्हा राहील, पण शिवरायांची जी खरी स्मारकं आहेत ती आपण जपली नाहीत तर हा महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही,’ अशी भावना पाटील यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिंदेंच्या बंगल्यापासूनच खड्ड्यांच्या साम्राज्याची सुरुवात | खड्डेमय कल्याणची मनसेकडून पोलखोल
मिशन बिगेन अगेनमुळे आता कुठे रस्त्यांवर वाहने धावू लागली आहेत. मात्र, पावसामुळे खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
ट्विटरवर फॉलोअप घेणाऱ्या आमदारांनी प्रत्यक्षात कल्याण शीळ रोडवर फेरफटका मारावा - खा. श्रीकांत शिंदे
मिशन बिगेन अगेनमुळे आता कुठे रस्त्यांवर वाहने धावू लागली आहेत. मात्र, पावसामुळे खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
धारावी पॅटर्न राबवा ही सूचना आ. राजू पाटील यांनी १० एप्रिलला दिली होती, सरकारला जुलैमध्ये जाग
कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरलेल्या धारावीची दस्तुरखुद्द जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेऊन शाबासकी दिल्यानंतर आता धारावीचा हा पॅटर्न कल्याण-डोंबिवली महापालिकाही राबवणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनीच ही माहिती दिली आहे. धारावी पॅटर्नने हाताबाहेर गेलेला कोरोना महापालिका रोखणार आहे. त्यासाठी कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागात घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी सवलतीच्या दरात बस उपलब्ध करा - आ. राजू पाटील
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चारकमान्यांना कोकणात जाण्यासाठी वाहतूक सुविधा अद्यापही उपलब्ध नाही. चाकरमन्यांनी कोकणात कसं जावं हा प्रश्न उभा ठाकला आहे. तसेच, गणेशोत्सवात कोकणबंदी होण्याची भितीही व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे या मुद्द्यावरूनही राजकारणही तापलं आहे. या प्रश्नात आता मनसेने उडी घेतली असून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी सरकारनं सवलतीच्या दरात बस उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आधी पालकमंत्रीच आरोग्यमंत्री होते, खासदार डॉक्टरच आहेत, तरी KDMC'ची आरोग्यसेवा थर्डक्लासच
ठाणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या व तुटपुंजी उपाययोजना लक्षात घेऊन ठाणे महापालिका आयुक्तांसह चार आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र खरी गरज आहे ती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आता बदला अशी मागणी भाजप आणि मनसेने केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण-डोंबिवली: इतर आमदार सुस्त पण मनसे व्यस्त; घरचे हाॅस्पिटल कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी
महाराष्ट्रात दिवसभरात २२१ नवे करोनाग्रस्त पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १९८२ वर पोहचली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज करोनामुळे महाराष्ट्रात २२ रुग्णांचा मृत्यू झाला. २२ मृत रुग्णांपैकी १६ मृत्यू मुंबईत, ३ पुण्यात तर २ नवी मुंबईत झाले आहेत. तर एका मृत्यूची नोंद सोलापुरात झाली आहे. महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारी ही बातमी ठरली आहे.
5 वर्षांपूर्वी -
केडीएमसी हद्दीत कोरोना टेस्टींग लॅब आवश्यक; आ. राजू पाटील यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे हे रुग्ण ठणठणीतही होत असल्याचेही दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले राज्यातील ३४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये मुंबईतील १४ रुग्ण, पुण्यातील १५, नागपूरमधील १, औरंगाबाद १, यवतमाळमधील ३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९६ वर गेली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोकांना गांभीर्य नाही, आता संचारबंदी हाच उपाय..राष्ट्रवादी व मनसेची मागणी
कोरोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू केली पाहिजे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. संचारबंदी हा एकमेव उपाय असल्याचंही ते म्हणाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
२७ गावांबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते पण एकनाथ शिंदेंची नियत? मनसेला शंका
मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पहिल्यांदाच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘२७ गावांची वेगळी महापालिका करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियत साफ दिसते. मात्र पालकमंत्र्यांची तशी दिसत नाही,’ असं म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
या अधिवेशनातच राज्यात 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर कायदा येणार; मनसेच्या पाठपुराव्याला यश
महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना चाप बसावा यासाठी राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. आंध्रप्रदेश सरकारने आणलेल्या दिशा कायद्याची माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यासंबंधिची माहिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर देखील जाऊ आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आ. राजू पाटील यांचा दिशा कायदा पाठपुरावा; भाजपकडून विधानसभेत मुद्दा हायजॅक?
महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना चाप बसावा यासाठी राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. आंध्रप्रदेश सरकारने आणलेल्या दिशा कायद्याची माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यासंबंधिची माहिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर देखील जाऊ आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
'U T' NRC - CAA, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा; आमदार राजू पाटील यांचा टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात सीएए, एनआरसी आणि एनपीआरबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आता महाविकास आघाडीत धुसफूस होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA चा अभ्यास करावा, असा सल्ला काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी दिला. त्याआधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही उद्धव ठाकरेंनी सीएएचं जाहीर समर्थन करु नये असं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकार डोंबिवलीत एखादं भोपाळ होण्याची वाट पाहतायं का? आ. राजू पाटील
डोंबिवली एमआयडीसी फेस २ मधील मेट्रो पोलिटीन या केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली. या कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा असतो. आगीमुळे केमिकलच्या ड्रममध्येही सतत स्फोट सुरु होते. अग्निशमन दलाच्या तब्बल १२ गाड्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होत्या. या आगीनंतर या कंपनीतील आणि आजूबाजूच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News