महत्वाच्या बातम्या
-
मनसे नंतर भाजपात मग शिवसेनेत मग शिंदे गटात जाणाऱ्या पलटूराम खासदार सदाशिव लोखंडेंचा पत्ता कट? आठवले शिर्डीतून लोकसभा लढवणार
Ramdas Athawale to Contest Loksabha Elections 2024 from Shirdi | आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात रिपाई आठवले गटाची पत्रकार परिषद पार पडली, याच पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. 28 मे रोजी रिपाई आठवले पक्षाचं शिर्डीत राज्य अधिवेशन पार पडणार आहे. रिपाई आठवले पक्षाची नोंदणी झाल्यानंतर पहिलं अधिवेशन हे शिर्डीत घेणार असल्याची माहिती राज्य सह संघटक अशोक नागदेवे यांनी दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
भाजपसोबत युती करावी | अन्यथा 2024 मध्ये शिवसेनेचं मोठं नुकसान होणार - आठवलेंचा इशारा
भारतीय जनता पक्ष एकाबाजूला राज्यातील २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं चित्र आहे. त्यासाठी राज्यातील नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रा काढण्याचं नियोजन आहे.
3 वर्षांपूर्वी -
संसदेत महत्वाच्या विषयावरून विरोधकांना रोखलं जातंय तर आठवलेंना 'कविता'चे संधी | विरोधकांचा संताप
संसदेचं वरीष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये बुधवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार घडला. यावेळी विरोधकांनी आपल्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, तर मार्शल्सकडून खासदारांवर, विशेषत: महिला खासदारांवर हल्ला झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
त्यांना मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळायचा नसेल | म्हणून मुद्दाम मास्क घालत नसतील - आठवले
राज ठाकरे विनामास्क प्रवास करतात, हे अनेकदा समोर आलंय. आजही त्यांनी नाशिक दौऱ्यात मास्क परिधान केलेलं नव्हतं. तसंच नाशिकचे माजी महापौर मुर्तडक यांनाही राज ठाकरे यांनी चेहऱ्यावरील मास्क काढण्याची सूचना केली. त्यामुळे राज ठाकरेंचा ‘विना मास्क इशारा’ चर्चिला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींनी लग्न करून ‘हम दो हमारे दो’ची अंमलबजावणी करावी - आठवलेंचा सल्ला
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपलं भाषण आणि कवितांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोलाचा सल्ला दिलाय. राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी, असा सल्ला रामदास आठवलेंनी राहुल गांधींना दिलाय. रामदास आठवलेंनी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट | आठवलेंच संतापजनक वक्तव्य
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 58 वा दिवस आहे. केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांच्या अनेकदा बैठका झाल्या. मात्र, अद्यापही हवा तसा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शिरुन ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्धार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत गुंडगिरी करून ट्रम्प यांच्याकडून माझ्या पक्षाची बदनामी | आठवलेंची प्रतिक्रिया
रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आपल्या धमाल चारोळ्यांसाठी आणि आगळ्यावेगळ्या वेशभूषेसाठी प्रसिद्ध आहेत. लोकसभेत भाषण करताना चारोळीचा उपयोग करून सभागृहाची ते वेळोवेळी दादही घेतात.
4 वर्षांपूर्वी -
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही जिंकणार | शिवसेनेचा पराभव होणार - आठवले
रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या युपीए अध्यक्षपदावरुन भाष्य केले आहे. युपीएचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात यावं, अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली होती. मात्र, शिवसेना युपीएचा घटक नाही. शिवसेनेच्या या मागणीमुळे ठाकरे सरकारसोबत काँग्रेसचा खळ्ळखट्यॅक होणार आहे.काँग्रेस सरकारमधील आपला पाठिंबा काढणार आणि हे सरकार पडणार आहे, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Go Corona Go नारा देणाऱ्या आठवलेंना कोरोनाची लागण
आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना करोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांना करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. माझ्या संपर्कात जे लोक आले आहेत त्यांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. करोनाची साथ नव्यानेच आली होती तेव्हा गो करोना करोना गो अशी घोषणा दिल्याने रामदास आठवले हे चांगलेच चर्चेत आले होते.
4 वर्षांपूर्वी -
सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही | आठवलेंचं वक्तव्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी भाजपसहित, कंगना रानौत आणि राणे कुटुंबीयांचा खरपूस समाचार घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत निशाणा साधला. तर हिम्मत असेल तर राज्य सरकार पाडून दाखवा असं आव्हान देखील दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय विंग मराठी बोलतात का? - रामदास आठवले
मराठी बोलण्यासर नका देत 75 वर्षीय महिलेला दुकानाबाहेर काढणाऱ्या सराफ दुकानदाराने अखेर माफी मागून आंदोलन मागे घेण्याची विनंती शोभा देशपांडे यांना केली. मराठीचा आग्रह धरत आंदोलन केलेल्या शोभा देशपांडे यांचे वृत्त मीडिया आणि सोशल मीडियात झळकताच, मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच, या महिलेशी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोनवरुन संवाद साधला आहे. मात्र, केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी या महिलेच्या व शिवसेनेच्या भूमिकेला आपला विरोध दर्शवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
छत्रपतींना बिनडोक म्हणणे योग्य नाही | आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रतिउत्तर
महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधानविरोधी असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रामदास आठवलेंच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कुलाबा येथील ‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केल्याने मराठी लेखिका शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर २० तास ठिय्या आंदोलन केले. यानंतर आंदोलनस्थळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दुकानदाराला मनसे स्टाईल दणका दिला.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह संविधानविरोधी....रामदास आठवले | वाद पेटणार?
महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधानविरोधी असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रामदास आठवलेंच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
संजय राऊतांच माहित नाही पण मी नटींच्या घोळक्यात नसतो - रामदास आठवले
शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर तोफ डागत त्यांनी आपल्याला शिकवू नये अशा शब्दांत रिपाईच्या रामदास आठवले यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यांनी दलित अत्याचाराविरुद्ध कधीच एक शब्दही काढला नाही, किंवा दलितांवरील अत्याचारांवुरुद्ध ते कधी पुढे आले नाहीत, असं म्हणत त्यांनी राऊतांवर टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
अजब ! हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत
हाथरस सामूहिक बलात्कार आणि पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून देण्यात आलेली वागणूक समोर आल्यानंतर जनतेचा आक्रोश बाहेर पडताना दिसतोय. त्यामुळे हाथरस शहरात तणावाचं वातावरण दिसून येतंय. दुसरीकडे या घटनेनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निशाण्यावर घेतलंय.
4 वर्षांपूर्वी -
आठवलेंनी हेच समर्थन हाथरसमधील बलात्कार पीडित व तिच्या परिवाराला दिलं असतं तर
माणुसकीला काळिमा फासणारी हृद्यद्रावक घटना उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gangrape) जिल्ह्यामध्ये घडली. जेथे 4 नराधमांनी 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने गंभीर जखमी झालेली या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून लोकांमधून संतापाची लाट उसळत आहे. सोशल मिडियावरही लोक या घटनेचा निषेध करत आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात नेमकी भेट का झाली, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही, असं स्पष्ट करत रिपाईच्या रामदास आठवले यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा महायुतीत येण्याचं आवाहन केलं आहे. कोणी एकत्र यायचं असेल तर, शिवसेनेला प्राधान्य आहे. शिवसेनेनं भाजप- रिपाईसोबत यावं असं वक्तव्य त्यांनी मुंबईत पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत केलं.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा | शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे - आठवले
काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षातील काही दिग्गज नेत्यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ नेत्या आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेता निवडणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. यावरुन काँग्रेस पक्षातील दोन गटांमध्येच मतभेद पहायला मिळाले. या सर्व घडामोडींवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी एक सल्ला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अयोध्येत बौद्ध मंदिर व्हावं यासाठी फार आधीपासून माझ्या हालचाली सुरु आहेत - आठवले
अयोध्येत सध्या राम मंदिर भुमिपुजनाची तयारी सुरु आहे. या कार्यक्रमाला देशभरातू कोणाला निमंत्रण दिलंय ? कोण जाणारेय ? यावरुन सध्या राजकारण सुरु आहे. अशात आता अयोध्येत बुद्धविहार उभारण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीय.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची धमकच नाही, आठवलेंची खोचक टीका
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, आपण आमच्या आयुष्यात खास आहात. आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. देशाचं नेतृत्त्व करण्याची क्षमता आपल्यात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS