महत्वाच्या बातम्या
-
चायनिज खाद्यपदार्थांवर बहिष्कार आणि ते विकणाऱ्या हॉटेलांवर बंदी घाला - आठवले
गलवान खो-यात झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारतीयांकडून चीनविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर चायनीज हाॅटेल आणि खाद्यपदार्थांवर बहिष्कार घाला असं आवाहन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. चीन हे धोकेबाज राष्ट्र असल्याची जोरदार टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी कोरोनाला गो म्हणालो म्हणून तो राज्यात व देशात जास्त प्रमाणात आला नाही: आठवले
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र, अशातच कोरोना व्हायरसचे देशात ७३ रुग्ण आढळून आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
यमक जुळणं महत्वाचं? राहुल गांधी मोदींना दंडा मारतील तर आम्ही अंडा मारू: आठवले
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ‘दंडा मार’ची भाषा केली तर आम्ही त्यांच्याविरोधात अंडी मारो आंदोलन करु असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. राहुल गांधी अशा प्रकारची वक्तव्यं करत असल्यानेच अमेठीतून ते निवडणूक हरले. राहुल गांधी हे स्वतःच काँग्रेस पक्ष कमकुवत करत आहेत. ते अशाच प्रकारे बोलत राहिले तर काँग्रेस पक्ष संपेल अशीही टीका आठवलेंनी केली.
5 वर्षांपूर्वी -
रामदास आठवले पलटी मारण्याच्या तयारीत? पवारांसोबत राज्यसभा संदर्भात चर्चा?
राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत केंद्रिय समाजकल्याण राज्यमंत्री आणि आरपीआय (ए) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना भारतीय जनता पक्षाकडून संधी दिली जाणार नसल्याच्या बातम्या बुधवारी माध्यमांत झळकल्या. त्यानंतर आज आठवले यांच्या घरी एनसीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली.
5 वर्षांपूर्वी -
आरपीआय बंद'मध्ये सहभागी न झाल्यानेच 'वंचित'चा बंद अपयशी : रामदास आठवले
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यभरात बंद ची हाक देण्यात आली होती. जालन्यातील मामा चौकात वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सीएए, एनआरसी विरोधात जोरदार घोषणा बाजी करत मुख्य बाजार पेठ बंद करण्याच्या प्रयत्न केला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा बंद मागे घेतल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली. बंद शांततेतच पार पाडायचा होता असे यावेळी आंबेडकर म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
देशातील सर्वांना हिंदू म्हणणे योग्य नाही; आठवले आरएसएस'शी असहमत
देशातील १३० कोटी लोकांना संघ हिंदूच मानतो, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. सरसंघचालकांनी हिंदुत्वावरून केलेल्या वक्तव्यावर केंद्रीयमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लवकरच राजकीय भूकंपाचे आठवलेंकडून संकेत, पण कसा ते त्यांना सुद्धा माहित नाही
नागपुरात विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यातच राज्यात राजकीय पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याचे विधान सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र नेमका भूकंप कसा शक्य आहे ते देखील त्यांना माहित नसल्याचं दिसलं आणि त्यामुळे केवळ कोणाच्यातरी सांगण्यावरून राजकीय वातावरण दूषित करण्याऱ्या टीममध्ये ते देखील असल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
जे सत्तेत येतील त्यांचे तळवे चाटण्या पलीकडे आठवलेंनी काहीच केलं नाही: आनंदराज आंबेडकर
आनंदराज आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या टीकेला तिखट शब्दांत प्रतिउत्तर दिलं आहे. आंबेडकरी जनतेच्या संदर्भातील सर्वच विषयांवर रामदास आठवले भारतीय जनता पक्षाला पोषक ठरणाऱ्या प्रतिक्रिया नेहमीच देत असताना. मात्र इंदू मिल संदर्भातील त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्यावर केलेल्या टीकेला सडेतोड प्रतिउत्तर देण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आठवले असतात त्यांच्याकडे सत्ता ही अंधश्रध्दा; स्वतःच्या बार्गेनिंग पावरचं माध्यम संपुष्टात: सविस्तर
राजकारणात अनेकांनी मोठ्या पक्षासोबत स्वतःची ‘बार्गेनिंग पावर’ वाढविण्यासाठी एखाद पिल्लू सोडलं आहे. त्यात सर्वात आघाडीवरील मोठं नाव म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister for State Ramdas Athawale) म्हणावे लागतील. मागील अनेक वर्षांपासून ‘मी असतो तिकडे सत्ता जाते’ असं एक पिल्लू त्यांनी सोडलं असून, त्याचा पुरेपूर राजकीय फायदा देखील उचलला आहे. राज्यात मोठं मोठे पक्ष १०-२० खासदार असून देखील एखादं मंत्रिपद मिळण्यासाठी झगडत असतात. मात्र याला रामदास आठवले अपवाद ठरले असावेत असंच म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या भूमिकेने विनायक मेटे, सदाभाऊ खोत आणि मेटेंच्या राजकारणाला यु-टूर्न?
भारतीय जनता पक्ष सहकारी पक्षांना संपवतो असा आरोप त्यांच्यावर नेहमीच करण्यात आला आहे. वास्तविक त्यात तथ्य असलं तरी सत्तेतील सहकारी पक्षातील नेते आणि त्यांच्या पक्षाला देखील भाजपने राज्यात अप्रत्यक्षरीत्या स्वतःच्या पक्षाला विसरून भाजपचे अघोषित प्रवक्ते होण्यास भाग पाडलं होतं. महादेव जाणकारांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना, रामदास आठवले यांचा आरपीआय आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष अप्रत्यक्षरीत्या का होईना, स्वतःचे पक्ष विसरून भाजपाच्यामागे फरफटत गेले आणि आज त्यांच्या कार्यकर्त्यांना भविष्य आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवारांचा शिवसेना आणि भाजपाला मोलाचा सल्ला
सत्ता स्थापनेचा तिढा दोन आठवड्यांनंतरही सुटत नसल्यानं राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली कोंडी सोडवण्याबद्दलचा सल्ला घेण्यासाठी पवारांची भेट घेतल्याचं आठवलेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंसाठी सेनेने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे: रामदास आठवले
शिवसेनेने आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे असं आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनीही म्हटले आहे. शिवसेनेने समसमान फॉर्म्युला समोर आणून अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. हा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाला मान्य होईल असे वाटत नाही त्यापेक्षा शिवसेनेने पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे आणि आदित्य ठाकरेंना त्या पदी बसवावे अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाने अशी ऑफर दिली तर शिवसेना ही ऑफर स्वीकारेल असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब बोलून दाखवली.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात शिवसेना आणि आरपीआयला एकच न्याय; आठही जागांवर भाजपकडून ठेंगा
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे राखले आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला एकही मतदारसंघ आलेला नाही त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला पुण्यात आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी झगडावं लागणार असल्याचं दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने नुकतीच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाने कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोंमेंट, कसबा, वडगाव शेरी, पर्वती, हडपसर, खडकवासला या आठही मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवणं पाकिस्तानच्या हिताचं : रामदास आठवले
पाकव्याप्त काश्मीर पाकिस्ताननं भारताला सोपवणं हे पाकिस्तानच्या हिताचं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेला पाकिस्तानसोबत रहायचे नाही, हे अनेक वृत्तांमधून समोर आले आहे. जर पाकिस्तानला युद्ध नको असेल आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या हिताचा विचार असेल तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा,” असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. ते चंदीगडमध्ये बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
काहीच वाच्यता न करता भाजपने अप्रत्यक्षरीत्या काही सहकारी पक्ष नेत्यांसकट हॅक केले? सविस्तर
भारतीय जनता पक्ष सहकारी पक्षांना संपवतो असा आरोप त्यांच्यावर नेहमीच करण्यात आला आहे. वास्तविक त्यात तथ्य असलं तरी सत्तेतील सहकारी पक्षातील नेते आणि त्यांच्या पक्षाला देखील भाजपने राज्यात अप्रत्यक्षरीत्या हॅक केले आहेत, असंच म्हणावं लागेल. महादेव जाणकारांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना, रामदास आठवले यांचा आरपीआय आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष अप्रत्यक्षरीत्या का होईना, पण त्यातीलच म्हणावे लागतील.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे 10 वेळा जरी अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १६ जुन २०१९ रोजी अयोध्येचा दौरा करणार आहेत, तसेच याची अधिकृत माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलर वरून दिली आहे. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत शिवसेनेचे १८ नवनिर्वाचित खासदार देखील असतील. मात्र उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या आधीच केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी १ वादग्रस्त विधान केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मंत्रिपद मिळालं, 'लाव रे फटाके'! भाजपासाठी आठवले व उद्धव ठाकरेंची राजकीय किंमत एकच?
कालच नवी दिल्लीत मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि त्यात अनेक पक्षातील खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यात भाजप सरकार बहुमताने सत्तेत आल्यामुळे एनडीएच्या घटक पक्षांचे चोचले पुरवले जाणार नाहीत हे त्या घटक पक्षांना आधीच ठाऊक असावं. त्यात मागील ५ वर्ष सत्तेला लाथ मारणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे गोडवे गाताना दिसत आहेत, मात्र त्यांच्याकडे १८ खासदार असले तरी ते मोदींच्या नावावरच निवडून आले आहेत, हे सत्य असलं तरी ते मान्य करणार नाहीत हे वास्तव आहे. अर्थात शिवसेनेचा संपूर्ण प्रचार हा मोदींच्या नावावर झाला, त्यात गरजेप्रमाणे स्वर्गीय. बाळासाहेबांना देखील लक्षात ठेवण्याचा त्रास यांच्या स्टार प्रचारकांनी घेतला नाही हे सर्वांनी डोळ्याने पहिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
आठवलेंना पुन्हा मंत्रिपदाची शपथ; मागील ५ वर्ष त्यांनी काय विकास कामं केली ते रहस्य
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ६५ मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये आधीच्या २१ मंत्र्यांना नारळ देण्यात येणार असून २० तरी नवीन चेहरे असण्याची शक्यता आहे. मात्र, रामदास आठवले मंत्रिपदासाठी शहांच्या फोनची वाट पाहत होते. अखेर आठवलेंना शहांचा फोन आला असून अद्याप मंत्रीपदाबाबत माहिती समोर आलेली नाही. याआधी देखील त्यांना मंत्रिपद भेटलं असलं तरी त्यांच्याकडे असलेल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी नेमकी कोणती विकास कामं केली हा मुळात संशोधनाचा विषय आहे. मागील ५ वर्ष ते प्रसार माध्यमांना केवळ फुटकळ प्रतिक्रिया देणं आणि संसदेत किंवा संसदेच्या बाहेर श्रोत्यांना मनावर दगड ठेवून ऐकाव्या लागणाऱ्या शेरोशायऱ्या दिल्याचे मतदाराला ज्ञात आहे. त्यामुळे पुढील ५ वर्ष देखील ते वेगळं काही करणार नाहीत अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार का? रामदास आठवले
प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीची स्थापना केली असून त्यांच्या सभांना जनतेकडून मोठा प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे. परंतु, सभेत होणाऱ्या या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार का, असा गंभीर प्रश्न उपस्थित करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंच्या विकास कामांचा हिशेब देशाला देतील का? नेटकरी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नेटकऱ्यांनी अनेकांच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यास आणि त्यांच्या कामाबाबत व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. त्यानुषंगाने ५ वर्ष मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात विराजमान असलेले आरपीआय’चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संपूर्ण कार्यकाळात कोणती विकास कामं केली ते पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला सांगू शकतील का? असे सवाल नेटकरी वारंवार करताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH