RBI Action Alert | यापैकी कोणत्याही बँकेत तुमचं खातं आहे का?, आरबीआयची मोठी कारवाई, ग्राहकांना फटका
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन सहकारी बँकांवर पुन्हा एकदा निर्बंधांची मालिकाच लागू केली आहे. रिझर्व्ह बँकेने या तीन सहकारी बँकांची ढासळती आर्थिक स्थिती लक्षात घेता, त्यांना पैसे काढण्यासह अनेक बंधने घातली आहेत. जयप्रकाश नारायण नगरी सहकारी बँक, बसमतनगर, करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सोलापूर आणि दुर्गा सहकारी अर्बन बँक, विजयवाडा या तीन बँका आहेत. जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक, बसमतनगर या बँकेवर बंदी घातल्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत, असे मध्यवर्ती बँकेने निवेदनात म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी