IRCTC General Train Ticket | जनरल तिकीटने ट्रेन किती वेळेत पकडावी लागते? उशीर झाल्यास तिकीट रद्द होईल
IRCTC General Train Ticket | भारतीय रेल्वे अनेक प्रकारच्या गाड्या चालवते. पॅसेंजर, मेल, मेल एक्स्प्रेस, एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट या गाड्यांना अनेक प्रकारचे डबे असतात. जवळजवळ प्रत्येक ट्रेनमध्ये जनरल डबे असतात. यामध्ये प्रवासासाठी जनरल तिकीट घ्यावे लागते. हे सर्वात स्वस्त तिकीट आहे. यामुळेच लोक कमी अंतराच्या प्रवासासाठी जनरल डब्यातून प्रवास करतात. आता प्रश्न असा पडतो की, जनरल तिकीट काढल्यानंतर आपण प्रवास सुरू करू शकतो. जनरल तिकीट खरेदी करणारे दिवसभरात केव्हाही ट्रेनमध्ये चढू शकतात, असे अनेकांचे मत आहे. परंतु, हा गैरसमज आहे. जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्ही फक्त तीन तास ट्रेनने प्रवास करू शकता. त्यामुळे पुढच्या वेळी जनरल तिकीट घेताना हे लक्षात ठेवा.
2 वर्षांपूर्वी