बिहारमध्ये भाजपाची सत्ता जाताच ईडी, सीबीआयचा पारा चढला? | निमलष्करी दल घेऊन विरोधक आमदार, खासदारांच्या घरी धाडसत्र
बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारच्या फ्लोअर टेस्टपूर्वी सीबीआयने राष्ट्रीय जनता दलाचे खासदार अशफाक करीम आणि एमएलसी सुनील सिंह यांच्या घरावर छापे टाकले आहेत. बुधवारी सकाळी सीबीआयचं पथक अशफाक करीम आणि सुनील सिंग यांच्या घरांवर छापा टाकण्यासाठी पटना इथं दाखल झालं. कथित लँड फॉर जॉब घोटाळ्यात हा छापा टाकण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. सुनील सिंह हे राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आहेत. जाणून घेऊयात नितीश सरकारला आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं आहे.
2 वर्षांपूर्वी