Rocky Aur Rani Ki Prem Kahaani | रॉकी आणि राणीच्या लव्हस्टोरीचा टीझर रिलीज, रणवीर-आलियाचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकणार
Rocky Aur Rani Ki Prem Kahaani | रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘रॉकी अँड राणी की लव्ह स्टोरी’ या चित्रपटाचा टीझर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. याआधी रणवीर आणि आलिया ‘गली बॉय’ या चित्रपटात दिसले होते. करण जोहर या चित्रपटातून बऱ्याच काळानंतर दिग्दर्शनात परतला आहे. हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. तसेच रणवीर आणि आलियाचा लूकही समोर आला होता. हा चित्रपट २८ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2 वर्षांपूर्वी