काश्मिरी पंडित किंवा पाकिस्तानमधून आलेल्या हिंदूंना नव्हे तर रोहिंग्यांना सुरक्षेसह दिल्लीत फ्लॅट देण्याची मोदी सरकारची योजना
केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी बुधवारी ट्विट केले होते की, रोहिंग्यांना मूलभूत सुविधा आणि चोवीस तास सुरक्षेसह फ्लॅट देण्याची सरकारची योजना आहे. या प्रकरणाला आम आदमी पक्षाने प्रथम आक्षेप घेतला. विश्व हिंदू परिषदेनेही सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. आता या संपूर्ण प्रकरणात हा वाद समोर आल्यानंतर गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. नवी दिल्लीतील बक्करवाला येथे रोहिंग्या बेकायदेशीर स्थलांतरितांना ईडब्ल्यूएस सदनिका उपलब्ध करून देण्याच्या कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.
2 वर्षांपूर्वी