महत्वाच्या बातम्या
-
युवकांच्या भविष्याशी खेळू होऊ नये | ST'चा प्रवास खर्चही सरकारच्या माध्यमातून देण्याबाबत विचार करावा - आ. रोहित पवार
आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नसून पुढे ढकलण्यात आलेली आहे. जाहीर केलेल्या जागा कोणत्याही परिस्थिती भरणारच आहे. कंपनीने असमर्थता दाखविल्यमुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. पण विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. मी विद्यार्थ्यांची माफी मागतो. पण विद्यार्थ्यांनी काळजी करु नये. येत्या काहीच दिवसांत परीक्षेच्या तारखेची घोषणा केली जाईल, असं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं.
3 वर्षांपूर्वी -
कर्जत-जामखेड | राम शिंदे समर्थक नामदेव राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार आमदार झाले आणि स्थानिक पातळीवर राम शिंदे यांच्या एकूण राजकारणाला उतरती कळा लागली आहे. त्यात राम शिंदे यांना अजून एक राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण कर्जत नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष आणि नगरसेवक नामदेव राऊत यांनी प्राथमिक आणि सक्रीय सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
सोमय्यांकडे भाजपचे प्रतिनिधी एवढंच पद आहे | भाजपने त्यांना ईडीचे प्रवक्ते पद तरी द्यावं - आ. रोहित पवार
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी आघाडीतील नेत्यांना टार्गेट करून त्यांचे भ्रष्टाचार काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोमय्या यांना टोला लगावला आहे. भारतीय जनता पक्षाने किरीट सोमय्या यांना ईडीचं प्रवक्तेपद द्यावं, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काढला आहे.
3 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार जगातील सर्वात उंच ‘भगवा ध्वज’ उभारणार
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जगातील सर्वात उंच ‘भगवा ध्वज’ उभारण्याचा निर्णय घेतला सून त्याच्या तयारीला ते लागले आहेत. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात देशातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. या स्वराज्य ध्वजाची दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 15 ऑक्टोबरला प्रतिष्ठापना करणार आहे. तर आज कर्जतचे ग्रामदैवत गोधड महाराजांच्या मंदिरापासून देशातील विविध भागात ‘स्वराज्य ध्वज पूजन’ यात्रा निघाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! | असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय.. - रोहित पवार
राज्यातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे एकच गदारोळ निर्माण झाला आहे. राज यांच्या या विधानाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच राज ठाकरे यांच्या म्हणण्याचं अर्थ आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
राम शिंदे समर्थक ढोकरीकर आ. रोहित पवारांच्या गटात | नगरपरिषदेच्या निवडणुकांपूर्वी धक्का
भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे संघटन सरचिटणीस प्रसाद बापूसाहेब ढोकरीकर यांनी पदत्याग केला आहे. ढोकरीकर सध्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असून आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहताना दिसतात. राम शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
मंत्री असतानाही राम शिंदेंना जमलं नाही ते आ. रोहित पवारांनी केलं | कर्जत-जामखेड बस स्थानक, व्यापारी संकुलाचे भूमीपूजन
कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून जामखेड येथे अत्याधुनिक बस स्थानक उभारले जात आहे. त्याचसोबत नागरिकांच्या सोईसाठी व्यापारी संकुलाचीही निर्मिती करण्यात येत आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आणि नागरिकांना अद्ययावत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी आमदार पवार विविध विकासकामांच्या माध्यमातून नवे आयाम देत आहेत. मंगळवारी जामखेड येथील बहुप्रतिक्षित बस स्थानक आणि व्यापारी संकुलाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
3 वर्षांपूर्वी -
राज्याचे मुख्यमंत्री अव्वलस्थानी आल्याने भाजपने दुःख वाटून घेऊ नये | तुमचे लाडके योगी आदित्यनाथ आहेत ५ नंबरला
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील 13 राज्यांमध्ये अव्वल मुख्यमंत्री ठरले आहेत. प्रश्नम या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. “भारतीय जनता पक्षाचे नेते उत्तर प्रदेशचं कौतुक करत असतात, पण या सर्वेक्षणात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पाचवा नंबर आहे, हे भारतीय जनता पक्षाने विसरु नये” असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
3 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटील मराठा-OBC आरक्षण, केंद्राकडील राज्याचे ३० हजार कोटी संदर्भात शहांना पत्र लिहीत नाहीत
राज्य महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राज्यातील अनेक संस्था भाजपच्या हातून निसटल्या आहेत. विशेष करून कोल्हापूर स्वतःच्या मुठीत घेण्याचा चंद्रकांत दादांचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे आणि आता कोल्हापुरात सरपंच देखील निवडून आणण्याची त्यांच्यात राजकीय शक्ती उरलेली नाही हे देखील पाहायला मिळतंय. संपूर्ण सत्ताकाळात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात स्वतःचं राजकीय साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला, मात्र महाविकास आघाडी सरकार आलं आणि पुढच्या वेळी ते पुण्यातून निवडून येतील का यावरही प्रश्न चिन्ह उपस्थित झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ नेत्यावर पातळी सोडून टीका आणि वक्तव्यात महिलांचाही अनादर | कृपया लक्ष घाला - रोहित पवारांची तक्रार
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर टीका केली होती. याचे पडसाद संपूण महाराष्ट्रात आगी सरखे पसरत आहेत. त्यांच्या टीकेनंतर बुधवारी संध्याकाळी त्यांच्या गाडीवर दगडफेक देखील करण्यात आली होती. या हल्ल्यावरून पडळकर यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून आणि RBI कडून पैसे मिळत नाहीत | रोहित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळे देशभरातील विविध शहरांमध्ये आज (सोमवार, 31 मे 2021) पेट्रोल दरात प्रतिलीटर 25 ते 31 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलचा दरही 25-29 पैशांनी वाढला आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राला पुरेशा लसी मिळण्यासाठी देखील केंद्राला एखादं पत्र लिहा - आ. रोहित पवार
राज्यात काल दिवसभरात 53 हजार 605 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्याचवेळी 82 हजार 266 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनामुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे राज्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे. मुख्य म्हणजे यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 6 लाख 28 हजार 213 इतका खाली आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
युतीत असताना बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? - रोहित पवार
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. चढला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुळ भातखळकर यांना चांगलंच धारेवर धरलंय. “युतीत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,” असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण | रोहित पवारांनी झापलं
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हातावर पोट असलेले मजूर आणि छोट्या व्यवसायिकांसाठी आर्थिक पॅकेज देऊ केलंय. परंतु, हे पॅकेज म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचं काम असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय.
4 वर्षांपूर्वी -
सरकार पाडण्यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे - आ. रोहित पवार
देशात कोरोना व्हायरसची परिस्थिती दररोज बिघडत आहे. संक्रमितांची प्रकरणे रोज नविन विक्रम बनवत आहेत. गेल्या 24 तासांच्या आत देशात 1 लाख 31 हजार 878 लोक संक्रमित आढळले आहेत. गेल्या वर्षी व्हायरस आल्यानंतरपासून आतापर्यंतचा हा एका दिवसातील रुग्णांचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी बुधवारी देशात सर्वात जास्त 1 लाख 26 हजार 276 लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
4 वर्षांपूर्वी -
भाजप सरकारमध्ये मंत्री अहवाल तयार करायचे आणि सचिव स्वाक्षरी करायचे का असा प्रश्न पडलाय
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली. मात्र प्रत्यक्षात खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. ही बाब उघड होताच शुक्ला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफी मागितली. तसेच फोन टॅपिंगचा अहवाल परत घेण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. मात्र हा अत्यंत गोपनीय अहवाल शुक्ला यांनीच फोडला, असा संशय असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता शुक्ला यांच्यामागेच चौकशीचे ‘शुक्लकाष्ठ’ लागण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
२०१४ पासून केंद्र सरकार राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करत आहे - आ. रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार रोहित पवार समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असतात. या माध्यमातून ते केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सातत्याने प्रहार करत आले आहेत. रोहित पवार यांनी मोदी सरकारच्या राज्यांसंदर्भातील धोरणांबद्दल सविस्तर पोस्ट लिहून भूमिका मांडली आहे. संविधानात केंद्र आणि राज्यांमध्ये सत्ता व अधिकारांची स्पष्ट विभागणी केली असतानाही २०१४ पासून केंद्र सरकार राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करत आहे. याबाबत मी काल फेसबूक पोस्टच्या माध्यमातून सविस्तर भाष्य केलं. यातील काही प्रमुख मुद्दे इथं देतोय असं त्यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार आखतंय एक धक्कादायक योजना | कारवाँ मासिकाचा दावा | रोहित पवारांचं तरुणांना आवाहन
समाज माध्यमं नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारकडून जी धोरणे राबविली जात आहेत, ती मतदारांचे तीन गटांत विभाजन करणारी आहेत. सरकार समर्थक, सरकार विरोधक आणि काठावरचे असे तीन गट करून सरकारला विरोध करणाऱ्यांसाठी काळा रंग, सरकारच्या समर्थकांसाठी पांढरा रंग तर काठावर असणाऱ्यांसाठी हिरवा रंग अशी विभागणी करण्याची सूचनाही सरकार पातळीवर पुढं आलीय,’ याकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लक्ष वेधले. यासंदर्भात त्यांनी कारवाँ मासिकाच्या वृत्ताचा दाखल देत देशातील तरुणांना जागृत राहण्याचं आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
रोहित पवारांचा आरे जंगल दौरा | पर्यावरणप्रेमी आणि आदिवासींशी संवाद | क्रिकेट ते रिक्षातून सफारी
राष्ट्रवादीचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांनी आज आरेच्या जंगलात फेरफटका मारला. यावेळी त्यांनी पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांची संवाद साधत विषय सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. रिक्षा चालवत आमदार रोहित पवारांनी आरे कॉलनी भागात सफारी केली. त्यानंतर वृक्ष रोपण करून रोहित पवारांनी क्रिकेटचा आनंद देखील अनुभवला.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाने मेंदूवर परिणाम होत असल्याचं बरळत आपले संस्कारच दाखवून देत आहेत - रोहित पवार
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे राज्याच्या राजकारणातही पडसाद उमटत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आंदोलनासंदर्भात ट्विट करण्यात आल्यानंतर देशातील क्रीडा आणि कला क्षेत्रातील सेलिब्रिटींनी ट्विट करत भाष्य केलं होतं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम