महत्वाच्या बातम्या
-
भाजपाचे लोक जसे मुद्दाम एखादं वाक्य बोलतात तसं इंदुरीकर महाराज बोलत नाहीत: रोहित पवार
भारतीय जनता पक्षाचे लोक जसं मुद्दाम एखादं वाक्य बोलतात तसं इंदुरीकर महाराज बोलत नाहीत अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. इंदुरीकर महाराज हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी इंदुरीकर महाराजांनी मंगळवारी माफी मागितली आहे. त्यामुळे फार खोलात जाण्याची गरज नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. इंदुरीकर महाराजांनी ते वक्तव्य केलं त्यामागे त्यांचा काय हेतू होता? हे तपासलं पाहिजे असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. उस्मानाबद येथे ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
आज आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करत असाल तर लक्षात ठेवा...गॅसचा दर रु. ९१०
प्रेमाचा उत्सव मानला जाणारा व्हॅलेंटाइन डे आज उत्साहात साजरा केला जात आहे. महाविद्यालयातील युवकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असतो. युवक-युवती आपापल्या जोडीदाराचा शोध या दिवशी घेत असतात. प्रेम सागरात जोडीदार यथेच्छ सैर करत असतात. अनेकांना हा दिवस का साजरा केला जातो, याची माहिती नसते. तर अनेक जण हा दिवस साजरा करणे म्हणजे पाश्चात्यांचे अंधानुकरण करणे आहे, असे मानतात.
5 वर्षांपूर्वी -
आ. रोहित पवारांची आमदारकी रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करीत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यानंतर खंडपीठाने आमदार रोहित पवार यांच्यासह आणखी १४ उमेदवारांना नोटीस पाठवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
२०२४'ला शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात - आ. रोहित पवार
“साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रासारखीच महाविकास आघाडी देशातही झाली तर आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. शरद पवार यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. पवारसाहेब जेव्हा कुठेही जातात तेव्हा सामान्य लोकांना काय पाहिजे ते ओळखून घेतात. साहेबांचा लोकांवर विश्वास आहे. लोकांचा साहेबांवर विश्वास आहे.”असंही रोहित पवार म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
केंद्रात 'असे' सरकार येणार हे LIC'ला माहित असतं तर त्यांनी स्वतःचीच पॉलिसी काढली असती: आ. रोहित पवार
एलआयसीला माहिती असतं केंद्रात “असे’ सरकार येणार आहे, तर त्यांनी सर्वात प्रथम स्वत:चीच पॉलिसी काढली असती. इतकी वाईट स्थिती देशात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणली आहे. सर्वच क्षेत्राचे खासगीकरण केले जात आहे, अशी प्रतिक्रिया कर्जत-जामखेडचे आमदार, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी नोंदवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा; मित्र म्हणून व्यक्तीगत पातळीवर नेहमीच सहकार्य करू
शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरुन नव्याने राजकारणात एण्ट्री करत महत्वाच्या पदावर गेलेल्या अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज गोरेगाव येथे पहिलं अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे याची अधिकृतपणे पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तसा अधिकृत प्रस्ताव मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मांडला.
5 वर्षांपूर्वी -
अहमदनगर: फडणवीस सरकारच्या काळातील टँकर घोटाळ्याची चौकशी होणार
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अहमदनगरमध्ये टँकर घोटाळा झाल्याचा आरोप एनसीपीचे तरुण आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यानंतर रोहित पवारांच्या तक्रारीची चौकशी करणार, अशी ग्वाही अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. संबंधित बैठकीत आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दुष्काळ पडला असताना झालेल्या टँकर छावणी आणि इतर दुष्काळ निवारण कामांची चौकशी करण्याची मागणी केली. अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा यासाठी मोठा निधी मागितला असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
रोहित पवार बोलतोय, तुम्ही ओळखलंच असेल; रोहित पवारांचा मोदींना कॉल आणि?
महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’तील युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमाअंतर्गत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्तेंनी बोलतं केलं.
5 वर्षांपूर्वी -
घराणेशाहीचा आरोप कोणी करणार नाही असं काम करून दाखवीन: आ. रोहित पवार
महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’तील युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमाअंतर्गत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्तेंनी बोलतं केलं.
5 वर्षांपूर्वी -
चांगलं ते स्विकारण्याच्या वृत्तीवरून अरविंद केजरीवाल यांच्याकडून आ. रोहित पवारांना शुभेच्छा
शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार विधानसभा निवडणुकीदरम्यान चांगलेच चर्चेत होते. पक्षाची चौकट सोडून लोकांमध्ये सहजपणे मिसळण्याच्या त्यांच्या स्वभावाचे अनेकांनी कौतुक केले होते. यानंतर आता आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी रोहित पवार यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे ते पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
गाठली दिल्ली! केजरीवाल सरकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांचा रोहित पवारांकडून अभ्यास
शिक्षणाच्या बाबतीत दिल्लीत नेमकं काय सुरु आहे? असं काय केलं अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने, ज्यामुळे साडेतीन वर्षात इथल्या सरकारी शाळांचं रुप पालटलंय? सरकारी शाळांचे रिझल्टही प्रायव्हेट शाळांपेक्षा चांगले येऊ लागले. शिक्षणासारखा विषय जिथे अनेक राज्यांत शिक्षणसम्राटांच्या हातात गेलाय, तिथे दिल्ली सरकारला मात्र शिक्षण आणि आरोग्य या दोन बेसिक गोष्टींवर काम करावंसं वाटलं. काय आहे यामागची प्रेरणा, हा बदल जमिनीवर कितपत रुपांतरित झाला, जितकं हे मॉडेल चर्चिलं जातंय, तितकं ते यशस्वी झालंय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लोंकांना कालांतराने मिळाली.
5 वर्षांपूर्वी -
कितीही चिखल केला तरी देखील कुठेही कमळ फुलू देणार नाही: आ. आदित्य ठाकरे
शिवसेनेचे युवा नेते आणि पहिल्यांदाच आमदार बनलेले आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. कितीही चिखल केला गेला असला तरी देखील आम्ही कुठेही कमळ फुलू देणार नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी टोला हाणला आहे आणि त्यांच्या बोलण्याचा संपूर्ण रोख हा भाजपवर होता हे स्पष्ट होतं. सत्ताच्या लोभापोटी मित्राना कसे डावलले जाते हे आपण पाहिले असल्याचेही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
जिल्हापरिषदेतील अनुभवानंतर आमदार रोहित पवार यांचा विधानसभेत प्रवेश
महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी तिढा सुटला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देते, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आता आपले बहुमत दाखवत ‘महाविकास’आघाडी सत्ता स्थापन करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडणं, मग संसार नीट कसा होईल? - आ. रोहित पवार
एनसीपीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून शिवसेना-भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. सत्ता स्थापनेसाठी वाटाघाटीवरून शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये वाद सुरू आहे. लग्न ठरवण्याच्या आधीच इतकी भांडणं मग पुढे काय होणार, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. दोन्ही पक्ष राज्यातील जनतेला निराश करत असल्याचेही रोहित यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
युतीचे उद्योग म्हणजे लहानपणी पाहिलेला सर्कशीचा खेळ - रोहित पवार
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजप – सेना युतीवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या मते आजचे युतीचे उद्योग म्हणजे मी लहानपणी पाहिलेलं सर्कसच. “कधीकाळी बाळासाहेब भाजपचा उल्लेख कमळाबाई म्हणून करायचे आणि भाजप शिवसेनेचा उल्लेख थोरला भाऊ म्हणून करत. इतकेच नाही तर राजकारणाच्या मैदानात जंगलातल्या ढाण्या वाघप्रमाणे ते लढायचे, सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता”, अशा शब्दात रोहित पवारांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS