Rupee Falls | डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरले, निर्मला सीतारामन तेव्हा काय सांगायच्या आणि आज काय उत्तर देतात पहा
Rupee Falls | अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ८१.०९ या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरल्याने कच्चे तेल आणि अन्य वस्तूंची आयात महागणार असून, महागाई आणखी वाढेल. चलनवाढीचा दर आधीच रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) ६ टक्क्यांच्या कमाल आरामदायी पातळीपेक्षा जास्त आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने वारंवार व्याजदरात वाढ केल्यामुळे भारतीय रुपयावरील दबावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी तूट आणि परकीय भांडवलाचा ओघ यामुळे वाढण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी