Rupees 2000 Notes | 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार? नोटबंदीनंतर चलनात आलेल्या नोटांवर बंदी घालण्याची मोदींची संसदेत मागणी
Rupees 2000 Notes | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी 2000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 2000 रुपयांच्या नोटांचा वापर बेकायदेशीर कारणांसाठी केला जात आहे, त्यामुळे त्या बंद कराव्यात, असा दावा सुशील मोदी यांनी केला आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सोमवारी शून्य प्रहरात राज्यसभेत ही मागणी केली आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आपल्या म्हणण्याचा पुनरुच्चार केला.
2 वर्षांपूर्वी