महत्वाच्या बातम्या
-
गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला | सचिन पायलट यांची पूर्ण साथ
आजपासून सुरु झालेल्या राजस्थान विधानसभेत भाजपाने काँग्रेस सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला होता. मात्र मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकत भाजपाला जोरदार झटका दिला आहे. जवळपास महिनाभर चाललेल्या राजकीय अनिश्चिततेनंतर पक्षश्रेष्ठींनी सचिन पायलट यांची समजूत काढल्याने राजस्थानमधील राजकीय नाट्य संपुष्टात आले होते. मात्र राजस्थानमध्ये सारे आलबेल झाले असे वाटत असतानाच भाजपाने खेळलेल्या एका चालीमुळे राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आला होता. राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता. मात्र सरकारविरोधातील अविश्वास ठराव भाजपा हरलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सचिन पायलट यांनी घेतली अशोक गेहलोत यांची भेट | काँग्रेसचा मार्ग मोकळा
जवळपास महिनाभर चाललेल्या राजकीय अनिश्चिततेनंतर पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्याने राजस्थानमधील राजकीय नाट्य संपुष्टात आले होते. मात्र राजस्थानमध्ये सारे आलबेल झाले असे वाटत असतानाच भाजपने खेळलेल्या एका चालीमुळे राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. आज झालेल्या भाजपच्या बैठकीमध्ये राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात अशोक गहलोत यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
बंडाच्या विमानाचं लँडिंग | सचिन पायलट अखेर स्वगृही परतले
राजस्थानमधील कॉंग्रेसचे संकट संपले आहे. बंडाचे निशाण फडकविणारे सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत काम करण्यास सहमती दर्शविली आहे. हे प्रकरण निकाली काढल्यानंतर सचिन पायलट म्हणाले की, पक्षाच्या हितासाठी मुद्दे उपस्थित करणे आवश्यक होते, पदाची तळमळीने नव्हे तर सन्मानाची लढाई. ३२ दिवसानानंतर पायलट अखेर राजस्थानात घरी परतले आहेत. आता पायलट यांचे जयपूरमध्ये आगमन कधी होणार याची उत्सुकता आहे. राजस्थान कॉंग्रेस सांगत आहे की, सचिन लवकरच आपल्या घरी परत येतील.
5 वर्षांपूर्वी -
पायलट जमिनीवर | राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या भेटीनंतर घरवापसीची शक्यता
राजस्थानात विधीमंडळाचे सत्र सुरू होण्यापूर्वीच राजकीय हालचालींची गती वाढली आहे. पक्षासोबत बंडखोरी करणारे सचिन पायलट यांनी सोमवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. सांगितले जात आहे की तिघांमध्ये झालेली ही भेट सकारात्मक राहिली. अशात सचिन पायलट यांना पुन्हा पक्षात रुजू करण्यामध्ये प्रियांका आणि राहुल गांधी यशस्वी राहिल्याचे संकेत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राजस्थानात न्यायालयाकडून भाजपाला मोठा धक्का, तर काँग्रेसला दिलासा
राजस्थान देशातील राजकीय घडामोडींचं हॉटस्पॉट बनले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राजस्थानात राजकीय संघर्ष उफाळून आला असून, अजूनही त्यावर पडदा पडलेला नाही. सचिन पायलट समर्थक आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल प्रलंबित असतानाच भाजपानेही बहुजन समाज पक्षाच्या आमदारांसंबंधात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावली.
5 वर्षांपूर्वी -
राजस्थानमध्ये काँग्रेसच्या आमदारांकडून राजभवनातच निदर्शनं सुरू
राजस्थानचा राजकीय संघर्ष आता राज्यपालविरुद्ध मुख्यमंत्री, असे वळ घेताना दिसत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी सांगितले, की त्यांनी विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. मात्र, राज्यपालांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. मात्र, आता वृत्त आले आहे, की राज्यपाल कलराज मिश्र यांनी कोरोनाचा हवाला देत विधानसभा अधिवेशन बोलावणे योग्य ठरणार नाही, असे म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजस्थानच्या राज्यपालांनी कोरोनाचा हवाला देत विधानसभा अधिवेशनाची विनंती फेटाळली
राजस्थानचा राजकीय संघर्ष आता राज्यपालविरुद्ध मुख्यमंत्री, असे वळ घेताना दिसत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी सांगितले, की त्यांनी विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. मात्र, राज्यपालांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. मात्र, आता वृत्त आले आहे, की राज्यपाल कलराज मिश्र यांनी कोरोनाचा हवाला देत विधानसभा अधिवेशन बोलावणे योग्य ठरणार नाही, असे म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपानं लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला 'बंधक' बनवलं आहे - काँग्रेस
राजस्थानमध्ये आमदारांच्या घोडेबाराच्या आरोपानंतर सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं होतं. त्यानंतर राजस्थानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. हा सत्तासंघर्षाचा वाद अखेर न्यायालयात पोहोचला. काँग्रेसने बोलावलेल्या बैठकांना पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह १९ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीसीला राजस्थान उच्च न्यायालयात पायलट गटाने आव्हान दिलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
CBI ला राजस्थानची दारं बंद होताच, अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीचा छापा
राजस्थानमधल्या सत्तेच्या राजकीय नाट्याला वेगळं वळण मिळालं आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा निर्णय घेत केंद्राच्या आधीन असलेल्या CBIला राजस्थानची दारं बंद केली आहेत. आता राज्य सरकारच्या परवानगी शिवाय CBIला राज्यात कुठल्याही प्रकारचा तपास करता येणार नाही. सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर अशोक गेहलोत यांची खुर्ची डळमळीत झाली असून या काळात केंद्र सरकार CBIचा वापर करून आपल्याला धक्का देऊ शकते अशी शक्यता वाटल्यानेच गेहलोत यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यपाल आणि गहलोत भेटीमुळे राजस्थानात विधानसभेच्या विशेष अधिवेशनाची शक्यता
राजस्थानमध्ये सत्तेसाठीचा संघर्ष हा एक रोचक वळणावर आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयही वेगाने बदलणार्या राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय झाले आहे. गृहमंत्रालयाने राजस्थानच्या मुख्य सचिवांना फोन टॅपिंग प्रकरणी अहवाल देण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेऊन बहुमताचा दावा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार बुधवारी किंवा गुरुवारी विधानसभेचे अधिवेशन बोलवू शकते आणि यावेळी फ्लोर टेस्ट होऊ शकते.
5 वर्षांपूर्वी -
गेहलोत यांना मदत केल्याच्या आरोपानंतर वसुंधरा राजे यांची पहिली प्रतिक्रिया
राजस्थान काँग्रेसने हकालपट्टी केलेले उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या बंडावेळी सत्तास्थापनेसाठी चकार शब्दही न काढणाऱ्या भाजपच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सचिन पायलट यांचे बंड मोडून काढण्यासाठी राजे यांनीच गेहलोतांना रसद पुरविल्याचा आरोप पायलटांसह एनडीएच्या खासदारानेही केला होता. यामुळे वसुंधरा राजेंना आता बोलावे लागल्याची चर्चा रंगू लागली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER