Salary Appraisal | सॅलरी अप्रेजल | यावेळी बहुतांश लोकांचा पगार वाढू शकतो - अहवाल
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून पगारवाढीवर परिणाम झाला आहे. पण यावेळी परिस्थिती बदलली आहे. टीमलीज सव्हिर्सेस इंडियाच्या मते यंदा सर्वच क्षेत्रातील बहुतांश लोकांचा पगार वाढू शकतो. मात्र, आर्थिक वर्ष २०२च्या कंपनीच्या जॉब्स अँड सॅलरी प्राइमरच्या अहवालानुसार, पगारवाढीत बदल होऊ शकतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, १७ क्षेत्रांपैकी १४ क्षेत्रांमध्ये एक अंकी वाढ होऊ शकते आणि उर्वरित तीन क्षेत्र, ई-कॉमर्स आणि टेक स्टार्टअप्स, हेल्थकेअर आणि संलग्न उद्योग, आयटी आणि नॉलेज सर्व्हिसेस, पगारात १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊ शकते.
3 वर्षांपूर्वी