महत्वाच्या बातम्या
-
BMC Road Potholes | ताई काही जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का? - संदीप देशपांडे
राज्यभरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरुन आता राजकीय पक्ष आक्रमक झाल्याचं दिसतंय. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खड्ड्यांच्या उपाययोजनांबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक बोलावली होती. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही खड्ड्यांबाबत आपली भूमिका मांडली आहे. अमित ठाकरे यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी (BMC Road Potholes) राज्य सरकार, महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनाला जबाबदार धरत टीका केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
दहीहंडी साजरी करणारच | आम्ही अस्वल, आमच्यावर खूप केस - संदीप देशपांडे
जन आशीर्वाद यात्रा आणि आंदोलनावेळी कोरोना नसतो का? असा सवाल करतानाच आम्ही दहीहंडी साजरी करणारच, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं. आम्ही अस्वल आहोत, आमच्यावर खूप केस आहे, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला. संदीप देशपांडे यांनी मीडियाशी बोलताना हे स्पष्ट केलं.
3 वर्षांपूर्वी -
आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यांवर | यापुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी - संदीप देशपांडे
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केले. तो शिवसैनिकाचा राग होता, परंतु ते चुकीचंच होतं. कार्यकर्त्याला समज दिली आहे” अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. टीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओवर एका ट्विटराईटने लसीचे कंत्राट कोणाला दिले, असा प्रश्न विचारला होता. त्यावर महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिलं होतं.
3 वर्षांपूर्वी -
बीएमसीच्या बीकेसी जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये नियुक्त केलेले डॉक्टर दुसऱ्या रुग्णालयात नोकरी करतात - मनसेचा आरोप
मुंबई महानगरपालिकेने सूरू केलेल्या BKC येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये नियुक्त केलेल्या डॉक्टर हे दुसऱ्या रूग्णालयात नोकरी करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने बीकेसी कोव्हीड सेंटरचे डीन राजेश ढेरे यांची भेट घेतली आणि अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केले.
3 वर्षांपूर्वी -
संदीप देशपांडे यांची मुख्यमंत्री आणि संजय राऊतांवर बोचरी टीका... काय म्हणाले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे कायम ठाकरे सरकारवर टीका करत असतातच. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही काम टीका करताना संदीप देशपांडे दिसतात. आता पुन्हा एकदा देशपांडेंनी राऊतांवर टीका केली आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीबाबत मनसेला शंका | हा सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम - मनसे
राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार मिनिमम कॉमन हिंदुत्वावर | मनसेचा खोचक टोला
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदुत्त्वाची आठवण करून दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना खरमरीत शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात याच पार्श्वभूमीवर सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या वादात उडी घेतली आहे. “महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्यावेळेस मिनिमम काँमन प्रोग्रॅम ठरला होता. मात्र, हे सरकार मिनिमम कॉमन हिंदुत्वावर गेले आहे”, अशी टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
वरळीकरांच्या घरात पाणी | केम छो वरळी म्हणत मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार काल रात्रीपासून राज्यातील अनेक भागात जोरदार सरी बरसत आहे. काल रात्रीपासून मुंबईतही पावसाचं बॅटिंग सुरू आहे. मुंबईतही या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहे. आधीच देशावर कोरोनाचं संकट असताना आता पावसाच्या कहरामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गुडघाभऱ पाणी साचले असून नागरिकांना रुग्णालयात येणं व बाहेर जाणं अवघड झालं आहे. त्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोविड वॉर्डमध्ये पाणी साचलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनबद्दल लोकांचा कौल राज ठाकरेंच्या बाजूने | ऑनलाइन सर्वेक्षणाचा रिझल्ट
‘लॉकडाऊन हवं की नको?’ याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुरु केलेल्या सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला आहे. करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी साडे पाच महिन्यांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनबाबत जनतेची काय मत आहेत हे जाणून घेण्यासाठी मनसेनं सहा दिवसांचे सर्वेक्षण सुरु केलं होतं. आज मनसे नेते संदिप देशपांडे यांनी या सर्वेक्षणाचा कौल जाहीर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंग्रजी चॅनेलचा संपादक तुमचे रोज कपडे उतरवतो तरी सर्व नेते शेपट्या घालुन बसलेत - संदीप देशपांडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची अटक आणि सुटका झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील राजकारण तापू लागलं आहे. महाराष्ट्र सैनिक आणि शिवसेनेच्या नेत्यांदरम्यान खटके उडताना दिसत आहेत आणि त्यातून निरनिराळ्या राजकीय टिपण्या सुद्धा दोन्ही बाजूने होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ठाण्यातील राजकरणात अस्तित्वात असले तरी तोंड न उघडणारे खासदार देखील सध्या प्रकाशझोतात आल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणाऱ्यांवर आज नगरसेवकांसाठी भीक मागण्याची वेळ
दोन दिवसांपूर्वी चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि महाविकास आघाडीत भूकंप झाला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला होता.
4 वर्षांपूर्वी -
वरुण सरदेसाईंना संदीप देशपांडेंचा इशारा, असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. विरोधकाकडून आरोग्य सेवेवरून अनेक आरोप केले जात आहे. अशातच मुंबई महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी आपल्या तुमड्या भरत आहेत, कोरोना झाल्यावर तुम्हाला फोडून राहिल्या शिवाय राहणार नाही, असा थेट इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला होता.
4 वर्षांपूर्वी -
प्रभू रामचंद्रांनी वडीलांच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून...? मनसेची टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. अयोध्या दौऱ्यावर जाण्याअगोदर अयोध्येचा इतिहास लक्षात ठेवा, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
हिंदुत्वासाठी! देशप्रेमाची!...पण हा फोटो फेब्रुवारी २०१९ मधील आहे: संदीप देशपांडे
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि ते पहिल्यांदाच सोनिया गांधींची १० जनपथवर भेट घेणार आहेत. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर भाजपशी काडीमोड घेत थेट वेगळी विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करत मुख्यमंत्रीपद मिळवलं. मात्र त्यानंतर सत्ता चालवताना अनेक अडथळे निर्माण होतं आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आधुनिक अफजल खानानी मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला: संदीप देशपांडे
राज ठाकरे यांनी शिवसेनेशी फारकत घेऊन मनसेची स्थापना केल्यापासून राज ठाकरे आणि मनसेला सामाना वृत्तपत्रात स्थानच नव्हतं. अगदीच राज ठाकरेंच्या मनसेची एखादी बातमी आलीच तरी त्या बातमीला एखादा कोपराच मिळत असे. मात्र ज्यावर आजपर्यंत राजकारण केलं तो हिंदुत्वाचा मुद्दा आणि महाविकास आघाडीत सरकारमध्ये झालेली हिंदुत्वाच्या मुद्द्याची कोंडी यामुळे शिवसेना पेचात अडकली आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय समीकरणामुळे कोंडी झाली असताना राज ठाकरे यांनी हिंदुत्वाला हात घालताच शिवसेनेच्या जळफळाटाने मनसे आणि राज ठाकरे यांना थाट सामनाच्या अग्रलेखात स्थान दिल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून शिवसेनेची या मुद्यावरून किती कोंडी झाली आहे याचा प्रत्यय येऊ लागला आहे.
5 वर्षांपूर्वी -
बेरजेच्या राजकारणावरून मनसे नेत्यांचा सुरात सूर; संदीप देशपांडेंचं 'बेरजेवर' ट्विट
देशातील एकूण राजकरण बदललं आहे, मात्र ध्येय धोरणांमध्ये गुरपटलेली मनसे तत्वांच्या आड नेहमीच पक्ष फायद्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आल्याने, आज मोठी राजकीय किंमत मोजत आहे. पक्षाचं नुकसान आणि पक्ष संपला तरी चालेल, पण समाज माध्यमांवर आम्ही तोंडघशी पडताकामा नये अशाच अविर्भावात मनसेचे कार्यकर्ते अनेकदा वावरताना दिसतात. आपण एक राजकीय पक्ष आहोत की समाज सेवी संस्था याचा अजून कारकर्त्यांनाच उलगडा झालेला दिसत नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, ज्याप्रमाणे नैतृत्व घेईल तो निर्णय पक्ष हिताचा समजून, केवळ बेरजेचं राजकरण समजून घेतात ते मनसेच्या कार्यकर्त्यांना स्वीकारताना अत्यंत कठीण असल्याचं दिसतं.
5 वर्षांपूर्वी -
पालिका अधिकारी कलम ३५३चा गैरवापर करून हुकूमशाही राबवत आहेत? सविस्तर
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३५३ नुसार शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला असून १४ तारखेपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर न्यायदंडाधिकारी पी एस काळे यांनी दिले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याची महापालिका सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार संदीप देशपांडे यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता, कोर्टाने त्यांना १४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
5 वर्षांपूर्वी -
हे बाप्पा! देशाचे आर्थिक संकट टळूदे, हिटलर शाही जाऊन लोकशाही नांदू दे: संदीप देशपांडे
आज घरोघरी श्री गणेशाचं आगमन मोठ्या आनंदात आणि उत्साहात झालं आहे. अनेकांनी आपल्या लाडक्या बाप्पाकडे स्वतःच्या इच्छा व्यक्त करत विघ्नहर्त्याला साकडं घातलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सतत भाजपच्या एकूणच कार्यपद्धतीवर हिटलर शाहीचा आरोप सातत्याने केला आहे. विरोधकांना संपवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप एनेक वेळा विरोधकांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
संदीप देशपांडेंनी 'ईडी'यट हिटलर' शीर्षक असलेले टी-शर्ट परिधान केले होते
कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
रस्ते दुर्घटनेस कारणीभूत ठरून हजारो बळी घेणाऱ्या इंजिनिअर्सवर कारवाई कधी? मनसे
साध्याच युती सरकार हे अधिकाऱ्यांना तसेच आमदार आणि मंत्र्यांना वाचवण्याच्या उद्देशाने उंदीर खेकडे यांना दोषी ठरविण्याचे हास्यास्पद प्रकार करता आणि त्यामुळे सरकारवर चोहोबाजूने टीका करण्यात येते आहे. दरम्यान गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत होते. या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. अशातच नितेश राणे यांची सरकारने लवकरात लवकर सुटका करावी आणि कामचुकार इंजिनिअर्सवर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO