महत्वाच्या बातम्या
-
वीर सावरकरांना भारतरत्न द्या, ढोंगी प्रेम दाखवू नका, संजय राऊतांनी भाजपाला घेरलं
Sanjay Raut | वीर सावरकर यांच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीवर टीका केली होती. त्या टीकेला आज संजय राऊत यांनी जशास तसं उत्तर दिलं. तसंच एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
2 वर्षांपूर्वी -
Sanjay Raut | संजय राऊतांना झालेली अटक बेकायदेशीर, PMLA कोर्टाची ईडीबाबत मोठी टिपणी, ईडीने मर्जीने आरोपी निवडले
Sanjay Raut | पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते व राज्यसभा खासदार यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती मिळावी, अशी याचिता ईडीकडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे संजय राऊत यांची आजच सुटका होणार आहे. अनेक वेळी जामीन नामंजूर झाल्यानंतर आज अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sanjay Raut | मुंबई हायकोर्टाचा देखील राऊतांच्या जामीनाला स्थगिती देण्यास नकार, शिवसैनिकांमध्ये प्रचंड जल्लोष
Sanjay Raut | शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. ED ने कोर्टाविरोधात केलेलं अपीलही फेटाळण्यात आल्यामुळे संजय राऊत यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या सुटकेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sanjay Raut | राऊतांच्या जामीनाविरोधात ईडी सुपरसॉनिक वेगात हायकोर्टात, निकालाकडे लक्ष
Sanjay Raut | शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. ED ने कोर्टाविरोधात केलेलं अपीलही फेटाळण्यात आल्यामुळे संजय राऊत यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या सुटकेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sanjay Raut | नडले, भिडले, पण ईडीपुढे झुकले नाही, 5 महिन्यांनंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर
Sanjay Raut | पत्राचाळ घोटाळ्यासंदर्भात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. मात्र आज १०० दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय राऊत यांना जामीन मिळू नये असं ईडीने म्हटलं होतं. मात्र आज संजय राऊत यांना काही वेळापूर्वीच जामीन मिळाला आहे. संजय राऊत यांना ३१ जुलैला अटक करण्यात आली होती. आता तब्बल १०० दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. PMLA कोर्टाने या संदर्भातला निर्णय दिला आहे. इतके दिवस ते ऑर्थर रोड तुरुंगात होते.
2 वर्षांपूर्वी -
भाजपकडून माध्यमांच्या कॅमेऱ्यावर शेकडो, हजारो करोडोच्या घोटाळ्याची बोंबाबोंब | पण कोर्टात केवळ लाखाचे दावे
शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. काल त्यांना पीएमएलए कोर्टात हजर केल्यानंतर ४ दिवसांची ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे. संजय राऊतांना अटक झाल्यानंतर शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या कुटुंबीयांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवरती जहरी टीका केली होती. आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संजय राऊतांच्या सपोर्टमध्ये ट्विट केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
२०२४ पूर्वी देशातील विरोधी पक्षांना हुकूमशाहीतून नष्ट करायची योजना? | राऊत खोटं बोलत आहेत असं वाटतंय तर हा व्हिडिओ पहा
शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील रोखठोकमध्ये म्हटले आहे की, भारतामधील लोकशाहीचे भवितव्य कसे अंधकारमय झाले आहे त्यांचे प्रत्यंतर रोजच येत आहे. देशाचे सरन्यायाधीश श्री. रमण्णा यांनी देखील एका कार्यक्रमात लोकशाही आणि संसदेच्या भवितव्यावर चिंता व्यक्त केली आहे.विरोधी पक्षांची जागाही सत्ताध्याऱ्यांनी बळकावयाची हे चित्र घातक आहे, असे सरन्यायाधीश रमण्णा जेव्हा जाहीरपणे सांगतात तेव्हा भीती वाटू लागते. पण एकाधिकारशाही व हुकूमशाहीचे कितीही तांडव झाले तरी लोकशाही या देशात मरणार नसल्याचे रोखठोकमध्ये म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sanjay Raut | चार ईडी अधिकाऱ्यांसह जितेंद्र नवलानीबाबत मुंबई पोलिसात तक्रार | ईडी अधिकारी रडारवर
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्याची पोलखोल करणार असल्याचं म्हटलं होतं. ईडीचा तो अधिकारी कोण अशी चर्चाही त्यांच्या फेब्रुवारीमधील पत्रकार परिषदेपासून सुरू होती. अखेर आज संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्याचं नाव घेत गंभीर आरोप केले. खंडणी वसुली करुन परदेशात बेनामी संपत्ती खरेदी केली जात आहे. ईडीच्या खंडणी रॅकेटच्या एजंटमध्ये भाजपचे महाराष्ट्रातील नेतेही असल्याचा दावा राऊत यांनी केला.
3 वर्षांपूर्वी -
Sanjay Raut | बाप-बेटा जेल जाऐंगे | 3 केंद्रीय तपास यंत्रणेंचे अधिकारीही तुरुंगात जाणार | राऊतांची डरकाळी
काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची यादी जाहीर करत त्यांना ‘डर्टी डझन’ संबोधलं होतं. या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर गैरकारभार, भ्रष्टाचार, घोटाळा केल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला आणि सातत्याने माध्यमांसमोर हे विषय पेटत ठेवला आहे.
3 वर्षांपूर्वी -
तुमच्याही कुटुंबाच्या संपत्ती कुठे आहेत हे आमच्याकडे आहे | स्फोट दिवाळीनंतर होतील - संजय राऊत
एकाबाजूला नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत घेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं. ‘मी काल जे आरोप केले, ते हवेत केले नाहीत. ड्रग्ज पेडलरने गाण्याला पैसे पुरवल्याचा आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी काल माझ्यावर आरोप केले. हे आरोप करताना त्यांनी म्हटलं होतं की, आरोप केल्यानंतर मी माफी मागत नाही.
3 वर्षांपूर्वी -
Sam Dsouza Secrets | बाजूला बसलेला सॅम डिसोझा नेते, IAS-IPS-NCB अधिकाऱ्यांसाठी मनी लाँड्रिंगचं काम करतो - राऊत
एनसीबीच्या धाडप्रकरणात प्रभाकर साईल या साक्षीदाराने केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट भाजपलाच इशारा दिला आहे. मला धमक्या देऊ नका. नवाब मलिकांनी या प्रकरणात इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली. इंटरव्हलनंतरची गोष्ट मी सांगेन, असं सांगत राऊतांनी भाजप नेत्याचे व्हिडीओही समोर आणण्याचा (Sam Dsouza Secrets) इशारा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra Bandh | भाजप-मनसे बंदमध्ये सामील नसण्याचा अर्थ शेतकऱ्यांना चिरडून मारण्याच्या घटनेला त्यांचा पाठिंबा - राऊत
लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे बंद पाळण्यात आला. हा बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेच्या नेत्यांनी केला. मात्र, या बंदमध्ये विरोधी पक्ष भाजप तसेच मनसेने सहभाग नोंदवला नाही. याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी (Maharashtra Bandh) या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली. महाराष्ट्र बंदमध्ये सामील न होणे म्हणजेच शेतकरी चिरडण्याला पाठिंबा देणे आहे, असे म्हणत राऊतांनी भाजप तसेच मनसेवर निशाणा साधला.
3 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Incident | देशात लोकशाही उरली आहे का? | संजय राऊतांचा संतप्त सवाल
लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली अक्षरश: चिरडलं गेलं. त्याचा एक व्हिडीओही अनेक नेत्यांनी ट्वीट केलाय. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी सामना अग्रलेखातून मोदी सरकार आणि योगी सरकारवर टीका केली होती. पुन्हा आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची संजय राऊत यांनी भेट घेतली. राजधानी दिल्लीत ही भेट झाली. यावेळी संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली.
3 वर्षांपूर्वी -
MP Sanjay Raut on Congress Crisis | काँग्रेसला अध्यक्ष नसणं चांगली गोष्ट नाही, भाजप फायदा घेतंय - राऊत
कोणताही पक्ष असेल त्याला नेतृत्व पक्षाध्यक्ष हवाच. तेव्हा तो पक्ष काम करू शकतो. काँग्रेस पक्ष हा भारतातला सर्वात जुना पक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस पक्षाचे मोलाचं सहकार्य आहे. असं असताना गेल्या काही वर्षापासून काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नसणं ही चांगली गोष्ट नाही आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टी घेत आहे. पक्षनेतृत्व असेल तर कार्यकर्ते जोमाने काम करतात असं संजय राऊत म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
विरोधी पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्राच केली आहे | १०० अजित पवार भाजपला कसे झेपणार? - संजय राऊत
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आघाडी सरकारवर सातत्याने टीका करताना दिसते. मात्र गेल्या काही दिवसांपासून यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच रंगल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर सतत विविध आरोप करताना दिसत आहेत. चंद्रकांत पाटील देखील सातत्याने आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. आता संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक या सदरातून विरोधीपक्षाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
3 वर्षांपूर्वी -
२१ हजार कोटींचे ड्रग्ज पकडतात, ते पैसे कुठे जातात, कुठे वापरता हे सर्व आम्हाला माहित | योग्यवेळी खुलासा करु - संजय राऊत
गुजरातमध्ये पकडलेल्या २१ हजार कोटींच्या ड्रग्जवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. हे पैसे कुठून येतात, कुठे जातात आणि कुठे वापरले जातात, याचा योग्यवेळी आम्ही खुलासा करु, असे राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये आज (गुरुवार) पत्रकारांशी बोलत असताना खासदार संजय राऊत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात गुजरातमध्ये मुंद्रा पोर्टवर पकडण्यात आलेल्या २१ हजार कोटींच्या ड्रग्जचा उल्लेख केला. ‘२१ हजारांचे ड्रग्ज कुठे पकडतात, ‘ते पैसे कुठे जातात आणि कुठे वापरले जातात, हे सर्व आम्हाला माहित आहे. त्याचा योग्यवेळी खुलासा करु,’ असेही खासदार संजय राऊत म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
चंद्रकांतदादांची लायकी सव्वा रुपयाची, कोट्यवधीची नाही | सव्वा रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार - संजय राऊत
भाजप नेते किरीट सोमय्या हे शिवसेनेच्या नेत्यांवर विविध आरोप करत आहेत. यामुळे राज्यातील वातावरण हे तापलेले दिसत आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये देखील शाब्दीत युद्ध सुरू आहे. दरम्यान शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. याला पाटलांनी उत्तर देत राऊतांना पत्र लिहिले. या पत्रामध्ये त्यांनी पीएमसी घोटाळ्यासंदर्भात राऊतांवर आरोप केले होते. आता या आरोपांना संजय राऊतांनी उत्तर देत अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी -
महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू हा हिंदूत्वाचा गळा घोटण्याचा प्रकार - संजय राऊत
आनंद गिरी संशयाच्या भोवऱ्यात आहेत कारण नरेंद्र गिरी यांच्याशी त्यांचा वाद खूप जुना होता. याचे कारण बाघंबरी गादीची 300 वर्ष जुनी वसीयत आहे, जी नरेंद्र गिरी सांभाळत होते.काही वर्षांपूर्वी आनंद गिरी यांनी नरेंद्र गिरी यांच्यावर 8 बिघा जमीन 400 कोटींना विकल्याचा आरोप केला होता, त्यानंतर हा वाद आणखी वाढला. आनंदने नरेंद्रवर आखाड्याच्या सेक्रेटरीचा खून करायला लावल्याचा आरोपही केला होता.
3 वर्षांपूर्वी -
महागाईविरोधात जनतेच्या तीव्र भावना | मोदीजी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन जनतेला बर्थडे गिफ्ट देतील
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना शुभेच्छा दिला आहेत. नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीबद्दल मतभेद असले तरी त्यांच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच देशातल्या महागाईविरोधात जनतेच्या तीव्र भावना आहेत. त्यामुळे मोदीजी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन जनतेला बर्थडे गिफ्ट देतील, अशा खोचक टोलाही संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही | संजय राऊतांची संतप्त टीका
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. बेळगावात भाजपचा विजय झाला आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल