महत्वाच्या बातम्या
-
शरद पवार योग्य निर्णय घेतील पण मंत्र्यांनी पाय जमिनीवर ठेवण्याची गरज - संजय राऊत
मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली आहे. देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा सनसनाटी आरोप करणारं पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. यामुळे देशमुख अडचणीत आले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
NIA ने उरी, पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यात काय तपास केला? - संजय राऊत
अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांवर शिवसेनेनं भाष्य केलं आहे. बदल्यांमागील कारणांचा उलगडा करताना शिवसेनेनंही भारतीय जनता पक्षावर देखील निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सर्वपक्षीय शिष्टमंडळ बेळगावला पाठवा | अन्यथा असंख्य मराठी माणसे तेथे धडकतील - संजय राऊत
बेळगावात कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद पुन्हा पेटला असताना शिवसेना खासदार संजय राउत यांनी कर्नाटक सरकारला आपल्याच थेट इशारा दिला आहे. बेळगावात मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत. या अत्याचारांची कुणी दखल घेत नसेल तर मग महाराष्ट्र सरकारला पूर्ण ताकदीने बेळगावात उतरावे लागेल. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका. कर्नाटकमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे असा हल्लाबोल संजय राउत यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
प्लॅस्टर ममतांना आणि दुखणं भाजपला | शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पश्चिम बंगालच्या विधानसभेचं रण चांगलंच तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांचे वार सुरु झालेत. अशातच सामना अग्रलेखातून ममतांना वाघिण संबोधत भाजपवर शरसंधान करण्यात आलं आहे. ममतांना प्लॅस्टर, भाजपला दुखणं, अशा मथळ्याखाली अग्रलेख लिहून भाजपची नौका आणखीनच खोल पाण्यात गेली, असं सुचवत सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं भांडवल करु नये | राऊतांनी विरोधकांना सुनावलं
उद्योपगती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांचा साठा असलेलं वाहन सापडल्याप्रकरणी तपास सुरु असतानाच वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीजवळ आढळून आल्याने गूढ आणखी वाढलं आहे. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस सांगत असताना दुसरीकडे कुटुंबीय मात्र हा दावा फेटाळत आहेत. या दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (६ मार्च) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
राजधर्मावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचं सूचक ट्विट
विरोधकांकडून राजीनाम्यासाठी दबाव येत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री संजय राठोड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राठोड हे पत्नी आणि मेव्हण्यासह कॅबिनेट बैठकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राठोड यांच्या बाबत कॅबिनेटपूर्वीच काही मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी हे सरदार पटेल, महात्मा गांधी, नेहरू, इंदिराजींपेक्षा महान असल्याचं भक्तांना वाटत असेल तर...
नरेंद्र मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके अकांडतांडव का करता? हा बदल त्यांच्या गुजरातच्या जनतेने स्वीकारला आहे. सरदार पटेलांचे महत्त्व नव्या राजकारणात संपले आहे, उद्या नेताजी बोसही संपतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापरही मागच्या निवडणुकीत झालाच होता. आता ‘गरज सरो, पटेल मरो’ हा त्याच नाट्याचा हा भाग आहे, अशी खरपूस टीका आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल | मग बसा बोंबलत - शिवसेना
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मागील काही आठवड्यांपासून इंधन दर वेगानं वाढले असून, काही ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण असल्याचं चित्र आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून मोदी सरकार घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
अयोध्याला गेल्यानंतर राज ठाकरेंना काही मदत लागली तर शिवसेना नक्कीच मदत करेल
राज्यात शिवसेना-भाजप युती आणि राष्ट्रवादी – काँग्रेस आघाडी असाच इतिहास राहिला आहे. मात्र भविष्यात राज्यात वेगळीच युती आणि आघाडी जन्म घेऊ शकते अशी शक्यता आहे. भविष्यातील निवडणुका विशेष करून लोकसभा आणि विधानसभा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढवतील अशी दाट शक्यता आहे. राज्यातील दोन बलाढ्य पक्ष एकत्र आल्याने राजकिय समीकरणं बदलण्याची शक्यता यापूर्वी देखील वर्तविण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी आणि शिवसेना | नव्या युतीचे संकेत | कारण ठरतील आगामी पालिका निवडणुका
राज्यात शिवसेना-भाजप युती आणि राष्ट्रवादी – काँग्रेस आघाडी असाच इतिहास राहिला आहे. मात्र भविष्यात राज्यात वेगळीच युती आणि आघाडी जन्म घेऊ शकते अशी शक्यता आहे. भविष्यातील निवडणुका विशेष करून लोकसभा आणि विधानसभा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढवतील अशी दाट शक्यता आहे. राज्यातील दोन बलाढ्य पक्ष एकत्र आल्याने राजकिय समीकरणं बदलण्याची शक्यता यापूर्वी देखील वर्तविण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोड प्रकरणावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय सरकारचा असून याबाबत सरकारी पातळीवर निर्णय होईल, असे राऊत यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांना खासगी कामासाठी सरकारी यंत्रणा वापरायची असेल तर त्यासंदर्भात काही नियम आहेत
राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. आता पुन्हा एकदा राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये नवा वाद उफाळून आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासालाच मुख्यमंत्री कार्यालयानं परवानगी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब अशी की राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचं कळालं आणि त्यांना विमानातून उतरुन राजभवनात परतावं लागलं अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनात शेतकरी मृत्यूमुखी पडले तेव्हा मोदींचे अश्रू बाहेर पडले नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (१० फेब्रुवारी) राज्यसभेला संबोधित केले. काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यासह ४ खासदारांना निरोप देताना नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केले. त्याचसोबत गुलाम नबी आझाद यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेवरून नरेंद्र मोदी सभागृहात भावूक झाल्याचे दिसून आले. यावर, नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच भावूक झाले नाहीत, यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
फासे पलटण्यासाठी फडणवीसांना माझ्या मनापासून शुभेच्छा | राऊतांच्या टोला
काँग्रेसनं महाराष्ट्रात खांदेपालट करत प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं नाना पटोले यांच्या हाती दिली आहेत. त्याचबरोबर सहा कार्य अध्यक्षही नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्यानं विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त झालं आहे. पुन्हा निवडणूक होणार असून, यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोजके सेलिब्रेटी सोडल्यास यातील एक तरी सेलिब्रेटी शेतकऱ्याच्या बाजूनं उभा राहिला आहे का?
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार आणि शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु कृषी विधेयक मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. यातच आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.
4 वर्षांपूर्वी -
गाझीपूर बॉर्डर | राऊतांच्या भेटीनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भूमिका स्पष्ट केली
नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचं स्वरुप दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. भारतीय किसान युनिअनने नव्या कृषी कायद्यांसंबंधी देशभरात जागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपण देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन मोहीम राबवणार असल्याचं भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी जाहीर केलेलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर आंदोलन | संजय राऊत आज शेतकरी आंदोलकांना भेटणार
केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी २ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला या आंदोलनाला हिंसक वळण आलेले देखील सगळ्यांनी पाहिले. पण त्यानंतरही शेतकरी बांधव शांतपणे पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रात देखील त्यांच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी एक आंदोलन करण्यात आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
Budget 2021 | पेट्रोल 1 हजार रुपये लिटर करुन सरकारला लोकांना मारायचं आहे - संजय राऊत
Budget 2021 LIVE : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पेट्रोल डिझेलवर लावलेल्या कृषी अधिभारावर सडकून टीका केलीय. पेट्रोल डिझेलवर अधिभार लावून पेट्रोल 1000 रुपये लिटर करुन सर्वसामान्यांना सरकारला मारायचं असेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच, केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे परिणाम आगामी 6 महिन्यांत कळतीलच. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी स्थिती केंद्र सरकारची झाली आहे, असेही राऊत म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे अयोध्येला जात असतील तर आम्ही त्यांना मार्गदर्शन करू - संजय राऊत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यानं आंदोलन हिंसक - संजय राऊत
दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने सर्वच स्तरांतून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दिल्लीतल्या आंदोलनात महाराष्ट्रातल्या शेतकरी महिलेचाही मृत्यू झाल्यानं राज्यातही खळबळ उडाली आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार आणि संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यानं आंदोलन हिंसक झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB