महत्वाच्या बातम्या
-
शिवसेना नेत्याच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करा म्हटलं म्हणून कारवाई?- संजय निरुपम
राजस्थानमधील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्याविरोधात कारवाई केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांचीही पक्षातून हकालपट्टी होण्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मी फक्त शिवसेनेवर टीका केली. त्याचा पक्षविरोधी कारवाईशी संबंध काय?, असं सांगतानाच मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली आहे का? असा सवाल संजय निरुपम यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसमध्ये एकाकी पडलेले संजय निरुपम यांचा सत्तास्थापनेवरून तिळपापड
अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदाची शिवसेनेची मागणी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याने युतीतील सत्तास्थापनेचा पेच कायम राहिला. त्यातच देशात स्थिर सरकार देणारे नेतृत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा तयार झाल्याने त्याला तडा जाईल, असे कोणतेही पाऊल न उचलण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला व सत्तास्थापनेसाठी असमर्थ असल्याचे भारतीय जनता पक्षाने राज्यपालांना कळवल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक औरंगजेब: संजय निरुपम
मोदींचा मतदारसंघ वाराणसीमध्ये कॉरिडोरच्या नावाखाली शेकडो मंदिरे उद्धवस्त करण्यात आली. नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यानंतर बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पैसै आकारण्यात येत आहे. औरंगजेब काशीच्या गल्लीबोळात अत्याचार करण्यासाठी उतरला होता. हिंदूची मंदिरे तोडली जात होती तेव्हा हिंदू लोकांनी विरोध केला होता. जे काम औरंगजेब करु शकला नाही ते काम आता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. नरेंद्र मोदी औरंगजेबाचे आधुनिक अवतार आहेत अशी खरमरीत टीका काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी केली आहे. वाराणसी येथे एका कार्यक्रमात बोलताना संजय निरुपम यांनी मोदींवर हल्लाबोल केला.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात मराठी विरोध निरुपम यांना भोवण्याची शक्यता; मराठी वस्त्यांमध्ये प्रतिसाद मिळेना
मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणून अपयशी ठरलेले उत्तर पश्चिमचे उमेदवार संजय निरुपम यांनी मराठी माणसाचा कैवार घेतल्याचे आठवत नाही. त्यांनी केवळ उत्तर भारतीयांना तसेच हिंदीलाच पाठींबा दिला आणि काँग्रेसला त्यांच्या दावणीला बांधले. यामुळे आता त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून मराठी माणसांची मते मिळावी म्हणून त्यांना आता मराठी सिनेकलाकारांना प्रचारासाठी आणावे लागत आहेत, नाहीतर मराठी मतदार प्रचार रॅलीकडे बघणार सुद्धा नाही याची त्यांना जाणीव आहे. तसेच हा एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे जेथे मनसेने काँग्रेसला समर्थन दिलेले नाही. परिणामी त्याचा फायदा शिवसेनेच्या गजानन कीर्तिकारांना होण्याची दाट शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
मिलिंद देवरा यांची संजय निरुपम यांच्यावर टीका, मुंबई काँग्रेसमध्ये दुफळी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई कॉग्रेसससुद्धा कामाला लागली असताना अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरुपम यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या अनेक माजी खासदार आणि आमदारांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस हायकमांडचे आदेश धुडकावून निरुपमांची उत्तर पश्चिम लोकसभेसाठी स्वयंघोषित उमेदवारी?
मागील दोन तीन दिवसांपासून चाललेल्या मुंबई काँग्रेस कमिटीच्या बैठकीत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबईतील लोकसभेच्या जागेसाठी पक्षाकडून उमेदवारी देण्यास स्थानिक काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला होता. दरम्यान, राज्य काँग्रेस कमिटीने स्थानिक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावनांची गंभीर दखल घेत, निरुपम यांना उत्तर मुंबई या त्यांच्या मूळ लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले होते.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO व्हायरल: उत्तर पश्चिम जिल्हा निरीक्षकांकडून निरुपम यांची लोकसभा उमेदवारी फिक्सिंग?
उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेसची सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक काल संध्याकाळी सौराष्ट्र पटेल समाज हॉल जोगेश्वरी पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या पूर्व नियोजित बैठकीला सुरुवात होताच महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु झाली, त्यांचा उमेदवारीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि विशेष करून दिवंगत केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या कार्यकर्त्यांनी सुरेश शेट्टी यांच्या उमेदवारीची मागणी उचलून धरली. त्यामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण होते.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: उ. पश्चिम मुंबई लोकसभा उमेदवार निश्चिती, कार्यकर्त्यांच्या माजी मंत्री सुरेश शेट्टींच्या समर्थनार्थ घोषणा
उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेसची सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक काल संध्याकाळी सौराष्ट्र पटेल समाज हॉल जोगेश्वरी पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या पूर्व नियोजित बैठकीला सुरुवात होताच महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु झाली, त्यांचा उमेदवारीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि विशेष करून दिवंगत केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या कार्यकर्त्यांनी सुरेश शेट्टी यांच्या उमेदवारीची मागणी उचलून धरली. त्यामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण होते.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा: उत्तर पश्चिम मुंबईतून इच्छुक संजय निरुपम यांना स्थानिक कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध?
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी मुंबई काँग्रेसमध्ये सुद्धा जोरदार हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात आता उत्तर पश्चिम मुंबईतून संजय निरुपम सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे वृत्त आहे. संजय निरुपम यांच्या जुन्या लोकसभा मतदारसंघातून लढविण्यापेक्षा ते स्वतःसाठी नवख्या आणि काही प्रमाणात भरवशाच्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून समजते.
6 वर्षांपूर्वी -
संजय निरूपम हटाओ, मुंबई कॉंग्रेस नेत्यांची जोरदार मोहीम
आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्य काँग्रेसमध्ये सुद्धा घडामोडींना वेग आला आहे. मुंबई सर्व वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे यांची आज भेट घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्याचे वनमंत्री शिकारी माफियासोबत पैसे कमवत आहेत: संजय निरुपम
कांग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी अवनी वाघिणीच्या शिकारीनंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वनमंत्री सुधीर मुंगंटीवार हे शिकारी माफियांसोबत पैसे कमवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
म्हणे महाराष्ट्र बंद करू, महाराष्ट्र सैनिकाचा फोन येताच मोबाईल बंद
म्हणे महाराष्ट्र बंद करू, महाराष्ट्र सैनिकाचा फोन येताच मोबाईल बंद
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा, 5219 टक्के परतावा देणारा शेअर मालामाल करणार - NSE: TATACONSUM