Sarkari Gold Investment Scheme | स्वस्त सोन्यात गुंतवणुकीची उत्तम संधी, सरकारी योजनेचा इश्यू प्राइस तपासून घ्या
Sakari Gold Scheme | स्वस्तात सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या सोमवारपासून स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी सरकार देणार आहे. 6 मार्च 2023 पासून गुंतवणूकदार सॉवरेन गोल्ड बाँड (एसजीबी) योजनेअंतर्गत गुंतवणूक करू शकतील. पाच दिवसांसाठी उघडणाऱ्या गोल्ड बाँडची किंमत ५,६११ रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. 2022-23 च्या चौथ्या सीरिजअंतर्गत सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम 6 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत खरेदीसाठी उपलब्ध असेल, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी