महत्वाच्या बातम्या
-
Sarkari Naukri | UPPSC Prelims Exam 2020 | RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली
UPPSC अर्थात, उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या वतीने घेण्यात आलेल्या RO, ARO या दोन पदांसाठीच्या पूर्व परीक्षांची उत्तर सूची संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 20 सप्टेंबर 2020 ला झालेल्या पुनरावलोकन अधिकारी (Review Officer) आणि सहाय्यक पुनरावलोकन अधिकारी ( Assistant Review Officer) या पदांसाठीच्या पूर्व परीक्षांची उत्तर सूची विद्यार्थ्यांना uppsc.up.nic.in. या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील किंवा आक्षेप असतील तर ते देखील नोंदवू शकतात. 13 सप्टेंबर 2020 रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर 20 सप्टेंबरला ही परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा पुढं ढकलण्यासाठी कोणतंही विशिष्ट कारण देण्यात आलं नव्हतं.
4 वर्षांपूर्वी -
पोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल
यंदाच्या महाराष्ट्र पोलीस भरती २०२० साठी फक्त मैदानी चाचणीमध्ये बदल करण्यात आले आहेत, तर लेखी परीक्षेचे नियम आहे तसेच राहणार आहेत. अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हे लेखी परीक्षेचे विषय आहेत. लेखी परीक्षेत खुल्या गटाला किमान 35 टक्के, राखीव गटासाठी 33 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही मैदानी चाचणी देऊ शकणार आहात.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी | ३५,२०८ पदांवर जागा रिकाम्या
RRB NTPC Recruitment 2020 कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात जगभरात चहूकडे आर्थिक मंदी आहे आणि लाखो लोक आपल्या नोकऱ्या गमावून बसले आहेत. अशा परिस्थितीत आता सर्वांनाच सुरक्षित आणि सरकारी नोकऱ्या हव्या आहेत. आपणही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्याला भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. RRB NTPCच्या ३५,२०८ पदांवर जागा रिकाम्या आहेत. भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आपण याचे तपशील मिळवू शकता.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र पोलीस भरती २०२० | २५ ते ३० लाख अर्ज येण्याचा अंदाज - गृहमंत्री
सरकारने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, यानिमित्ताने राज्यातील तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाची बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक विधान केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Exam | सरकारकडून उमेदवारांसाठी नियमावली प्रसिद्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने आयोजित परीक्षांकरिता कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सूचना तसेच उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत. यासंबंधी आयोगाकडून परिपत्रक काढण्यात आले असून, उमेदवारांना या सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महाराष्ट्र पोलीस भरती २०२० जाहीर | एकूण जागा १२ हजार ५३८
राज्य मंत्रिमंडळानं आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात साडे बारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पोलीस भरती ही शहरी आणि ग्रामीण तरुण, तरुणींसाठी मोठी संधी असेल. त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती कॅबिनेटच्या बैठकीनंतर देशमुख यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची मोठी संधी | ऑनलाईन अर्जाला सुरुवात
बँक ऑफ इंडीयाने 214 अधिकारी पदांसाठी अर्ज मागविलेले आहेत. याअंतर्गत इकॉनॉमिस्ट, स्टेटिस्टिशियन, रिस्क मॅनेजर, क्रेडिट ऑफिसर यांच्यासह इतरही पदेही भरण्यात येणार आहेत. या पदांवर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी स्वतंत्रपणे निश्चित केली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी | थेट मुलाखत | लेखी परीक्षा नाही
सरकारी नौकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना सुवर्ण संधी आहे. स्टील ऑथॅरिटी ऑफ इंडियाने बऱ्याच पदांवर भरती करण्यासाठीचे अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. इथे आपणांस सांगू इच्छितो आहोत की या पदांसाठी केवळ पात्र असलेल्या नर्सच आवेदन करू शकतात. दुर्गापूर स्टील प्लांट च्या मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | लवकरच या ८ जिल्ह्यात तलाठी भरती होणार | सामान्य प्रशासनाची मान्यता
सन २०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये २६ जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, परंतु ८ जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र, आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील तलाठी (गट क) भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Recruitment 2020 | ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये भरती | सरकारी नोकरीची संधी
ऑईल इंडिया लिमिटेडने विविध पदांची भरती जारी केली आहे. ही भरती आसामच्या दुलियाजन येथील मुख्यालयासाठी काढण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ऑपरेटर- I (HMV), श्रेणी -7 मधील 36 पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. जर या पदासांसाठी नोकरी करण्यास आपण इच्छुक असाल तर अधिकृत वेबसाइट oilindia.com ला भेट देऊन अर्ज करू शकता.
4 वर्षांपूर्वी -
SBI Recruitment 2020 | स्टेट बँकेत यावर्षी 14,000 जागांसाठी भरती निघणार
संपूर्ण देश कोरोना व्हायरससारख्या महाभयाण संकटामुळे पिळून गेला असून त्यामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनचा लोकांवर आर्थिकदृष्ट्या चांगलाच फटका बसला आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या, काम, उद्योगधंदे काही प्रमाणात ठप्प झाले आहेत. या सर्वांमध्ये पिचून गेलेल्या सामान्य नागरिकांसमोर घरं चालवायचे कसे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान SBI बँकेने एक दिलासादायक बातमी सर्वांसाठी आणली आहे. SBI बँकेत यावर्षी 14,000 पदांसाठी भरती (SBI Recruitment 2020) निघणार आहे. यासाठी बँक खास योजना बनवत असल्याचे सांगण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Recruitment | बँकेत क्लार्क पदासाठी मोठी भरती | जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आली आहे. कारण आयबीपीएस’ने क्लार्क पदाच्या तब्बल १५५७ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. त्याबाबत संपूर्ण माहिती खाली सोप्या भाषेत पाहू शकता. त्यामुळे तरुणांनी संधी गमावू नये.
4 वर्षांपूर्वी -
6310 पदांवर नोकरभरतीची सुवर्णसंधी | थेट मुलाखतीनं मिळणार नोकरी
राजस्थान सरकारने 6000हून अधिक पदांसाठी सरकारी भरती काढली आहे. त्याअंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी(Community health officer)पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज करू शकतात. भरतीसंबंधित अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवार 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी कोणतीही लेखी किंवा संगणक आधारित परीक्षा घेतली जाणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
पदवीधर आहात | रेल्वेत ३५ हजार २०८ पदांसाठी भरती | ऑनलाईन परीक्षा होणार
कोरोना संकटकाळात बेरोजगारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ज्या तरुणांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आरआरबी एनटीपीसी २०२० भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत रेल्वेमध्ये जवळपास ३५ हजार २०८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सशस्त्र सीमा दलात १५२२ जागांसाठी भरती | २१,७०० ते ६९,१०० रु प्रतिमाह वेतन
सशस्त्र सीमा दलाकडून हवालदार पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे, भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे नोकरी मिळविण्यासाठी चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरीची तयारी करताना पोलीस भरती आणि भारतीय लष्करातील नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी म्हणता येईल.
4 वर्षांपूर्वी -
Recruitment | UGVCL मध्ये प्रशिक्षणार्थी पदवीधरांसाठी नोकरीची मोठी संधी
उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेडने (UGVCL) पदवीधर अॅप्रेंटिस पदासाठी रिक्त जागांवर भरती काढली आहे. या रिक्त जागा BOAT योजनेच्या म्हणजेच 1 वर्षाच्या कराराच्या आधारावर भरायच्या आहेत. याबाबत अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2020 आहे. एकूण 56 पदांसाठी भरती करावयाची आहेत, त्यापैकी 39 पदे पुरुष आणि 17 पदे महिलांसाठी रिक्त आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट www.ugvcl.com वर भेट देऊ शकतात आणि जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना संकटात सरकारी नोकरी लागली | महानिर्मितीकडून ७१५ उमेदवारांची यादी जाहीर
कोरोना संकटात देशाची आणि राज्यांची आर्थिकस्थिती नाजूक असताना काहींना सुखद धक्का मिळाला आहे. कारण या कोरोना संकटाच्या काळातच काहींना थेट सरकारी नोकरी प्राप्त झाली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC