महत्वाच्या बातम्या
-
पोलिसांकडून वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (Police Verification) ऑनलाईन | असा ऑनलाईन अर्ज करा
नोकरभरती तसेच विविध कामांनिमित्ताने लागणाऱ्या चारित्र्य पडताळणीच्या दाखल्याकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा सुरु झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. परंतु आजही अनेकांना याबद्दल माहिती नसल्याने निरर्थक त्रास सहन करत असतात. निमशासकीय, खाजगी संस्था इ.मध्ये नोकरीकरिता वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे अत्यंत गरजेचे असते.
3 वर्षांपूर्वी -
असा करा जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाइन अर्ज | त्यासाठी लागतात 'ही' कागदपत्रे - वाचा, इतरांसोबत शेअर करा
ग्रामीण भागातील वंशपरांगत शेतजमीन किंवा मालकी हक्क ज्याच्या नावावर आहे ती शेतजमीन मूळ मालकाच्या मृत्यनंतर त्याच्या वारसदारांना त्या जमिनीवर वारसदार म्हणून नोंदणी कशी करायची, याबाबत अनभिज्ञता दिसून येते. प्रसंगी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवणे सुरू होते. मात्र शेतजमीन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद कशी करावी, हे माहीत असणे गरजेचे आहे. आता जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाइन अर्जही करता येतो. ऑनलाइन अर्ज कसा व कुठे करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्रे हवीत? त्याची प्रक्रिया काय आहे? याबाबत जाणून घ्या.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Yojana | पीक विमा योजना 2021 ऑनलाईन अर्ज | शेवटची तारीख जवळ - संपूर्ण प्रक्रिया
महाराष्ट्रात यंदा वेळे अगोदर मान्सून दाखल झाला. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांच्या दृष्टीनं तयारी सुरु केली. सन 2021 च्या खरिप हंगामासाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागनं शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Yojana | शरद पवार ग्रामसमृध्दी योजना अनुदान योजना अर्ज - संपूर्ण प्रक्रिया
गाय व म्हैस यांकरिता पक्का गोठा बांधणे, जनावरांसाठी गोठ्यांची जागा हि ओबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते तसेच ती अस्वच्छ असल्याने जनावरांना विविध आजार होतात. गाई आणि म्हशींची कास निकामी होउन शरीरावर खालच्या बाजूस जखमा होतात. याठिकाणी मौल्यवान मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते. यासाठी या ठिकाणी चार आणि खाद्यासाठी चांगली गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाके बांधण्यात येतील. स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोठयासाठी ७७,१८८ रुपये खर्च येईल. यासाठी ६ गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे याकरिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरूपेक्षा जात गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील.
3 वर्षांपूर्वी -
नवीन शेततळेसाठी 100 टक्के अनुदान | शेततळे अस्तरीकरण अनुदान योजना - नक्की वाचा
आज एक नवीन अपडेट आपण घेऊन आलो आहे ती म्हणजे शेततळे प्लॅस्टिक अस्तारीकरण अनुदान 06 एप्रिल 2021 रोजी शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी अनुदान संबंधित एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे आपण जर पाहिलं तर सहा प्रकारच्या शेततळ्यांसाठी 100 टक्के अनुदान दिल जाते परंतु शेततळ्यांच्या प्लॅस्टिक अस्तारीकरणासाठी शेतकर्यांना विविध प्रकारच्या योजनेतून लाभ घ्यावा लागतो आणि आता ही बाब लक्षात घेता 06 एप्रिल 2021रोजी शासन निर्णय घेऊन प्लॅस्टिकचा कागद आहे प्लास्टिक अस्तरीकरण आहे हे शेततळ्याचे अस्तरीकरण ही बाब मनरेगाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोणताही हप्ता नाही । गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना । कसा लाभ घ्याल? - नक्की वाचा
शेतात अपघात किंवा मृत्यू आणि अपंगत्व या साठी शेतकर्यांना मदत म्हणून आपघात विमा योजना ही 2006 पासून सुरू आहे परंतु आता या योजनेचे नाव बदलून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही कंपनी मध्ये विमा भरण्याची गरज नाही , ही निशुल्क विमा योजना आहे. यासाठी शासन रक्कम भरते .ही योजना सन 2021-2022 मध्ये राबवण्यासाठी 8 मार्च 2021 रोजी शासन निर्णय घेऊन मंजूरी मिळाली आहे . ही योजना राबवण्यासाठी निधि रक्कम ही विमा कंपनीस एका वर्षासाठी सुपूर्द करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
सरकारी योजना | नाबार्ड डेअरी लोन योजना 2021 ऑनलाईन अर्ज। तरुणांना मोठी संधी
मित्रांनो आज आपण नाबार्ड डेअरी कर्ज योजना २०२१ ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये नाबार्ड योजना २०२१ नवे बदल,नाबार्ड डेअरी योजना उद्दिष्ट्य, नाबार्ड डेअरी योजना २०२१ अनुदान आणि लाभ, लाभार्थी पात्रता, कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था, अटी, नाबार्ड योजनेंतर्गत दुग्धशाळा शेतीसाठी विविध योजना, नाबार्ड डेअरी योजना २०२१ ऑनलाइन अर्ज करा, ऑनलाइन अर्ज, दुग्धशाळेसाठी आर्थिक निकष, हेल्पलाईन क्रमांक या सर्व घटकांची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
शेतकरी बांधवांनो | राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना 2021-22 | ऑनलाईन अर्ज कसा करायचा? - नक्की वाचा
शेतकरी मित्रांनो , या लेखात आपण राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शाशनानाने अर्थसाहाय्य केले आहे . अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे .यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीविषयक काम अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी हि योजना राबवण्यात अली आहे .
3 वर्षांपूर्वी -
सरकारी योजना | राष्ट्रीय बायोगॅस योजना 2021 | असा अर्ज करा आणि १२ हजार मिळावा
राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेसंदर्भात अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेची सुरुवात देशामध्ये सन 1982-83 पासून झालेली असून ही योजना केंद्र शासनाच्या वीस कलमी कार्यक्रमामध्ये समाविष्ठ आहे.
3 वर्षांपूर्वी -
दिव्यांगांना, अपंगांना 2000 रुपये सरकारी मदत, अर्ज सुरू | असा भरा ऑनलाईन फॉर्म
समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका जाहिर प्रकटन सन 2021-2022 कोविड-१९ प्रादुर्भावाच्या काळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांच्या बँक खात्यामध्ये आर.टी.जी.एस. द्वारे प्रत्येकी रक्कम रू.2000 प्रमाणे एकदाच अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
पशुसंवर्धन योजना अंतर्गत मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य उपक्रम | एक कॉल करा, घरपोच पशुवैद्यकीय सेवा
पशु संवर्धन योजना संदर्भात जाणून घेवूयात. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना अंतर्गत फिरता पशु वैदकीय दवाखाना संदर्भात आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांसाठी पशु संवर्धन विभागाच्या विविध योजना सुरु असतात. त्या योजनांची आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे शेतकरी शेळीपालन व्यवसाय करतात किंवा दुग्धव्यवसाय करतात त्यांना या योजनेचा खूप लाभ होऊ शकतो. ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी बांधवांकडे गाई, म्हशी आणि शेळ्या असतात त्याचप्रमाणे शेती कामासाठी गुरे देखील असतात. जनावरे आजारी पडली कि मग शेतकऱ्यांची खूप परवड होते त्यामुळे हा उपक्रम जाणून घेणे खूप महत्वाचे ठरणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
खुशखबर | कुक्कुटपालन पालन योजना सुरु झाली | असा करा अर्ज | शासनाच्या वतीने आवाहन
कुक्कुटपालन पालन योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेवूयात. आदिवासी विकास विभागामार्फत एकात्मिक कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेती करत असतांना शेतकरी बांधवाना शेतीमध्ये नैसर्गिक संकटाचे अनेक धोके पत्करावे लागतात. शेती व्यवसायामध्ये केवळ शेतीवर अवलंबून राहिल्यास अधिक तोटा होण्याची शक्यता असते त्यामुळे शेतीला काहीतरी जोड धंदा असणे आवश्यक आहे. शेतकरी बंधुंनो तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेती पूरक व्यवसाय करू इच्छित असाल तर शासकीय अनुदानावर आधारित कुक्कुटपालन पालन योजनेचा लाभ घ्या.
3 वर्षांपूर्वी -
तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे? | जाणून घ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे फायदे
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य’ योजनेचे लाभ कसे घ्यायचे हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना खरंतर २ जुलै २०१२ रोजीच महाराष्ट्र सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने सुरु केली होती. आता (२०१७ मध्ये) त्याच योजनेचं नाव बदलून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना हे ठेवण्यात आलं आहे. (इथे आपल्याला राज-कारणात पडायचं नसून, उपयोगी अशा योजनेची माहिती घ्यायची आहे).
3 वर्षांपूर्वी -
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना | नवीन उद्योगासाठी कर्ज कसं मिळवाल? संपूर्ण माहिती - नक्की वाचा
आज आपण पंतप्रधान मुद्रा योजना (PMMY) २०२१ ची संपूर्ण माहिती आज या लेखात पाहणार आहोत. मित्रांनो हि एक loan योजना आहे ज्यामध्ये लघु उद्योग उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या लेखात आपण मुद्रा कर्ज म्हणजे काय, मुद्रा कर्ज फायदे (Benefits Mudra Loan), कर्जाच्या रकमेनुसार प्रकार कोणते, पंतप्रधान मुद्रा कर्जची वैशिष्ट्ये, कर्जचा परतफेड कालावधी किती, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज लाभार्थी पात्रता (loan scheme eligibility), मुद्रा योजना अर्ज आवश्यक कागदपत्रे (Required Documents for Loan), मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करावा (How to Apply Online Mudra Loan) या प्रश्नांची उत्तरे आज या लेखात आपण पाहणार आहोत. तुम्हीही स्वतःचा नवीन उद्योग उभारू इच्छिता, परंतु आर्थिक दृष्ट्या असक्षम आहेत. तर तुम्हला या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा नवीन उद्योग उभारून उदयोजक बानू शकता.
3 वर्षांपूर्वी -
खुशखबर | सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 साठी ऑनलाईन अर्ज सुरु | करा अर्ज
सोलर पंप योजना अर्थात सौर चलित पंप योजना संबधी अधिक माहिती जाणून घेवूयात. सोलर पंप योजनेसाठी अर्थात सौर उर्जा चलीत पंपासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. हा अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या वेबसाईटवर हा अर्ज करावा लागणार आहे त्यासंबधी अगदी तपशीलवारपणे माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सोलर पंप योजना संदर्भात या लेखामधील माहिती अतिशय महत्वाची आहे. या ठिकाणी सांगितलेल्या अर्ज पद्धतीनुसार तुम्ही तुमचा अर्ज करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य योजनेवर केंद्राकडून शिक्कामोर्तब | कसा घ्याल योजनेचा लाभ? - वाचा
कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्याचे योजना राबवली जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केली होती. या योजनेवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत पुढील नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत अन्नधान्य देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. मोफत अन्नधान्य वाटपाच्या योजनेचा देशभरातील 81 कोटी 35 लाख लोकांना लाभ होणार आहे. दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो धान्य योजनेअंतर्गत दिले जाईल. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेसाठी पात्र असलेल्या लोकांना योजनेनुसार पुढील पाच महिने मोफत धान्य मिळणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांसाठी खुशखबर | राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मिळणार अनुदानावर मशीन - वाचा सविस्तर
शेतकरी बंधुंनो राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना गवत कापण्यासाठी ५० टक्के अनुदानावर मशीन मिळणार आहे. या योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेवूयात. महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने केंद्र सहाय्यित राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत वैरण व पशुखाद्य या उप अभियानांतर्गत गवताचे गठ्ठे तयार करण्याच्या मशीनचे ५० टक्के अनुदानावर वितरण. म्हणजेच ( जनजाती क्षेत्र उप योजना ) या योजनेसाठी नवीन लेखशीर्षास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत या योजनेसाठी ५० टक्के अनुदान हे केंद्र शासनाकडून मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय दिनांक २३ जून २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
3 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र सरकारकडून महिला बचत गटांना मिळणार २ लाख रुपये कर्ज | असा करा अर्ज
केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकरी व महिला बचत गटांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करत असते, यासाठी अनेक योजना ही राबवत असते, महिला सक्षमीकरण करणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
सातारा | अनुदानावर १० शेळ्या-एक बोकड, दोन गाई म्हशी आणि मिल्किंग मशीनच वाटप | करा अर्ज
जिल्हा परिषद योजना 2021 अंतर्गत जिल्हा परिषद सातारा पशुसंवर्धन विभागाकडून ७५ टक्के अनुदानावर १० शेळ्या व एक बोकड वाटप. ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे गट वाटप ( दोन गाई म्हशी) व मिल्किंग मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी शेवट दिनांकाच्या आत विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करावा.
3 वर्षांपूर्वी -
व्यवसाय कर्ज योजना उद्योग उभारणीसाठी १० लाखापर्यंत अनुदान | वाचा आणि शेअर करा
आजच्या या लेखामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी व्यवसाय कर्ज योजना कोणत्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ज्या व्यक्ती खाजगी नोकरीमध्ये होते लॉकडाऊनमुळे त्यांची ती नोकरी सुद्धा गेल्यामुळे बेरोजगारीमध्ये आणखीच भर पडली आहे. अशा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजना माहित असाव्यात जेणे करून ते या योजनांचा लाभ घेऊ शकतील.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News