Sat Industries Share Price | सॅट इंडस्ट्रीज शेअरमध्ये मोठी उसळी, 1 दिवसात 10 टक्के परतावा दिला, गुंतवणुकीसाठी स्टॉक तपशील पाहा
Sat Industries Share Price | शेअर बाजारातील चढ उताराच्या काळात शुक्रवारी सॅट इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त उसळी पाहायला मिळाली आहे. सॅट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 100 रुपये किंमत पातळीवर पोहोचले होते. मागील 5 दिवसात सॅट इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत सॅट इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी सॅट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 8.45 टक्के वाढीसह 97.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी