Save Aarey Forest | आरे जंगल वाचवण्यासाठी तरुणांची पुन्हा आंदोलनाची तयारी | शिंदे सरकार विरोधात संताप वाढणार
महाराष्ट्रात पर्यावरणप्रेमी आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा आरे कॉलनीचं जंगल वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने आरेमध्ये मेट्रो कारशेड न बांधण्याचा उद्धव सरकारचा निर्णय मागे घेतला, हे आपण जाणून घेऊया. सरकारच्या या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमी आणि कार्यकर्ते संतापले असून, त्याविरोधात नव्याने लढण्याची त्यांची तयारी सुरू आहे. १८०० एकरात पसरलेल्या या आरे फॉरेस्टला अनेकदा ‘मुंबईचं फुफ्फुस’ असं संबोधलं जातं. आरेच्या जंगलात बिबट्यांव्यतिरिक्त सुमारे 300 प्रजातीचे प्राणी आढळतात. हे उपनगर गोरेगाव येथे असून ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडलेले आहे.
3 वर्षांपूर्वी