SBI Bank Loan Interest Rates | तुम्ही SBI बँकेतून कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतलं आहे का? EMI बाबत महत्वाची अपडेट पहा
SBI Loan Interest Rates | स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा देत बँकेने कर्जावरील व्याजदरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने विद्यमान एमसीएलआर दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे लाखो कर्जधारकांना जास्त ईएमआयच्या चिंतेतून दिलासा मिळाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एप्रिल २०२३ मध्ये नुकत्याच झालेल्या पतधोरणाच्या बैठकीत रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्याच्या निर्णयानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंगमध्ये (एमसीएलआर) बदल केला नाही.
2 वर्षांपूर्वी