SBI FD Interest Hike | एसबीआय ग्राहकांसाठी खूशखबर, बँकेने एफडी व्याजदर वाढवले, नवीन व्याजाचे दर पहा
SBI FD Interest Hike | भारतीय रिझर्व्ह बँकेने ८ फेब्रुवारी रोजी रेपो दरात ०.२५ टक्के वाढ जाहीर केली होती. रेपो दरात वाढ झाल्यानंतर कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकठेवींवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या मुदत ठेवींच्या (एफडी) व्याजदरात 25 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयने २ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याज वाढवले आहे. एसबीआयच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआयचे एफडीवरील सुधारित दर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी