SBI FD Vs SBI Annuity Deposit | एसबीआय FD स्कीम की SBI अॅन्युइटी डिपॉझिट योजना फायद्याची? दरमहा अधिक कमाई कुठे पहा
SBI FD Vs SBI Annuity Deposit | SBI मध्ये 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.50 टक्के या दराने व्याज परतावा मिळतो. पूर्वी हा व्याज दर 4.70 टक्के होता, मात्र SBI ने नंतर त्यात 80 पॉइंट्सची वाढ केली. नवीन व्याज दर 22 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. याशिवाय SBI बँक 180 दिवस ते 210 दिवसांच्या कालावधीसाठी परिपक्व होणाऱ्या FD वर 4.65 टक्के व्याज दराने परतावा देते. त्याचप्रमाणे 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर पूर्वी 5.65 टक्के व्याज मिळत होता, आता त्यात वाढ झाली असून 6.25 टक्के दराने व्याज परतावा मिळतो.
2 वर्षांपूर्वी