SBI Festive Offer | एसबीआय'ची ऑफर, गृहकर्जावर 0.25 टक्क्यांपर्यंत सूट, प्रोसेसिंग फी सुद्धा माफ, डिटेल्स पहा
SBI Festive Offer | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) गृहकर्जाचा आकडा सहा लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला असून, या विभागातील कोणत्याही बँकेने दिलेले हे सर्वाधिक कर्ज आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेने या निमित्ताने आपल्या गृहकर्ज ग्राहकांसाठी सणसणीत सवलत जाहीर केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना 8.40 टक्के पासून सुरू होणाऱ्या व्याजदरावर 0.25 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर ३१ जानेवारी २०२३ पर्यंत प्रक्रिया शुल्क माफ करण्यात येणार आहे.
2 वर्षांपूर्वी