SBI Multi Option Deposit Scheme | एफडीचे व्याज आणि बचत खात्याची सुविधा, एसबीआयच्या या योजनेत घ्या दोघांचाही लाभ
SBI Multi Option Deposit Scheme | बँक मुदत ठेवी (बॅन एफडी) हे भारतीय गुंतवणूकदारांमध्ये बचत आणि गुंतवणूकीचे सर्वात लोकप्रिय मार्ग आहेत. एफडीमध्ये जमा झालेल्या पैशातून बचत खात्यापेक्षा चांगला परतावा तर मिळतोच, पण ते अतिशय सुरक्षितही मानले जातात. परंतु एफडीशी संबंधित एक गैरसोय देखील आहे. अचानक गरज पडल्यावर कधीही मॅच्युरिटीपूर्वी एफडीमध्ये ठेवलेले पैसे काढावे लागले तर बँक त्यासाठी दंड आकारते. ही समस्या टाळण्याचा एक मार्ग म्हणजे बचत खात्यात थोडे अधिक पैसे ठेवणे, जे गरज पडल्यास लगेच काढता येतात. पण बचत खात्यात ठेवल्यामुळे त्यांना खूप कमी व्याज मिळतं. आणि महागाई ७ टक्क्यांच्या आसपास असताना बचत खात्याचा खरा परतावा दर नकारात्मक होतो.
2 वर्षांपूर्वी