SEBI Shares Sell Rule | शेअर्सच्या विक्रीसाठी 14 नोव्हेंबरपासून ब्लॉक यंत्रणा लागू होणार, जाणून घ्या कसं काम करणार
बाजार नियामक सेबीने शुक्रवारी, १९ ऑगस्ट रोजी गुंतवणूकदारांना विक्री व्यवहारांसाठी त्यांच्या डिमॅट खात्यातील शेअर्स ब्लॉक करणे बंधनकारक केले असून, ही तरतूद १४ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. सध्या ही सुविधा गुंतवणूकदारांसाठी अनिवार्य नाही म्हणजे ती ऐच्छिक आहे. विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यांमधील ‘ब्लॉक’ प्रणाली १४ नोव्हेंबरपासून बंधनकारक होणार असून, याअंतर्गत विक्री व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांचे शेअर्स संबंधित क्लिअरिंग कॉर्पोरेशनच्या बाजूने त्यांच्या डिमॅट खात्यात ब्लॉक करण्यात येणार असल्याचे सेबीने परिपत्रकात म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी