शिंदे गट फोडण्यासाठी 3000 कोटी खर्च, 2500 कोटी आमदारांवर खर्च, 500 कोटी त्यांच्या मॅनेजमेंटवर खर्च झाले, वरिष्ठ पत्रकाराचा दावा
50 Khoke Ekdam Ok? | एकीकडे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटाचे आमदार खूपच अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी गटातून बाहेर पडू शकतात. ते फुटू नयेत यासाठी या आमदारांना पुन्हा ५-५ कोटी रुपये देण्यात आले आहेत, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एका उद्योगपतीनेच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. खैरे यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
2 वर्षांपूर्वी