Sequent Scientific Share Price | काय शेअर आहे! अवघ्या 5 दिवसात 32.33 टक्के परतावा दिला, स्टॉक वाढीचे कारण काय?
Sequentnt Scientific Share Price | ‘सिक्वेंट सायंटिफिक’ या फार्मा कंपनीच्या शेअर मध्ये मागील पाच दिवसापासून कमालीची तेही पाहायला मिळत आहे. ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीने ‘टिनेटा फार्मा’ कंपनीचे अधिग्रहण करणार नाही, अशी घोषणा करताच ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत आले. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीचे शेअर्स 12.96 टक्के वाढीसह 83.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांनी वाढले होते. मागील पाच दिवसात ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीचे शेअर्स 32.33 टक्के वाढले आहेत. काही वेळा कंपनीची डील रद्द होण्याचा फायदाही शेअर धारकांना मिळत असतो. याचेच हे एक उदाहरण आहे.
2 वर्षांपूर्वी