महत्वाच्या बातम्या
-
कोरेगाव-भीमा दंगलीमागे फडणवीस सरकारचं षडयंत्र, पवारांच्या आरोपाने शिवसेना पेचात
कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. पवारांच्या या गंभीर आरोपामुळे सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप नको पण शिवसेना चालेले हा मुस्लिमांचा आग्रह; पवारांच्या विधानाने सेनेची अडचण
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही त्याला पुष्टी देणारे विधान केले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला कोणत्याही अल्पसंख्याक सदस्याचा आक्षेप नाही तर काहीही करून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवायला हवे, असेच अल्पसंख्यकांच्या प्रतिनिधींचे म्हणणे होते, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
5 वर्षांपूर्वी -
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित स्मारकाच्या कामाची पवारांकडून पाहणी
५ टक्के काम झालंय अजून ७५ टक्के करायचे आहे. जर कंपनीने मनापासून ठरवलं आणि कोणत्या परवानग्या शिल्लक राहील्या नाहीत तर २ वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण होईल. अस मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केल आहे. इंदू मिल येथील जागेची पाहणी शरद पवार यांनी केली त्यानंतर ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
अनेकांना वाटतं होतं की, मी निवृत्त होईन; पण तसं होणार नाही: शरद पवार
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘स्टेपनी’ म्हटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मात्र अजितदादांकडे थेट स्टिअरिंग व्हील दिलं आहे. आमच्या सत्तेचं ड्रायव्हिंग अजितदादांकडे आहे, असा खुशखुशीत डायलॉग उद्धव ठाकरेंनी बारामती दौऱ्यात मारला. अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बारामतीत उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अजित पवारांचंही स्वागत झालं. राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा बारामतीत हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
PMC बँकेच्या पुनरुज्जीवन संदर्भात पवारांनी अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली
बहुचर्चित पीएमसी बँकेच्या पीएमसी बँकेच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेच्या संदर्भात शरद पवार यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन केंद्राकडून तोडगा काढण्यात यावा यासाठी पुढाकार घेतला आहे. पीएमसी बँकेतील घोटाळ्यामुळे लाखो ग्राहकांना फटका बसला असून अनेकांनी या धक्क्यामुळे प्राण देखील गमावले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
CAA विरोध: आम्ही पुन्हा गांधी हत्या होऊ देणार नाही: यशवंत सिन्हा
सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC) याविरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गेट वे ऑफ इंडिया येथून ‘गांधी शांती यात्रे’ला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, आशिष देशमुख, मंत्री नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते. गेट वे ऑफ इंडिया येथून सुरु झालेल्या या यात्रेचा शेवट दिल्लीतील महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ राजघाट येथे होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मतदारसंघातील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांशी राजकारण करु नका: पवारांचा स्वपक्षिय मंत्र्यांना सल्ला
राज्यात तीन पक्षांचे मिळून संयुक्त सरकार असल्याने मंत्र्यांनी आपापसात समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी (ता.8) पक्षाच्या मंत्र्यांना केली. आपल्या मतदारसंघातील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांशी राजकारण करु नका. विकासकामे करताना त्यांना विश्वासात घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार; विद्यमान सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने नव्या पिढीसमोर मांडले
राज्याचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला २०१७ मध्ये तब्बल ५५ वर्षे झाली आणि तर आज पवार ८०च्या वयात देखील तरुण राजकारण्यांना देखील लाज वाटेल अशी पक्ष वाढीसाठीची मेहनत करताना दिसतात. १९९२मध्ये शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री होते. आता दिल्लीतच राहायचं या विचारानं पवार कामाला लागले होते.
5 वर्षांपूर्वी -
मोहिते-पाटलांचा भाजपाला धक्का; पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याचे संकेत
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, बुधवारी पुण्यात होणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित होते. राज्यातील सत्तास्थापनेनंतर दोन्ही नेते पुण्यातील व्यासपीठावर पहिल्यांदाच एकत्र येणार असल्याने सर्वांचंच लक्ष लागून होतं. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे पहिल्यांदाच मांजरी येथील ‘व्हीएसआय’ला येत असल्याने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत ते कोणती भूमिका घेणार, यावर चर्चा रंगली होती.
5 वर्षांपूर्वी -
भुजबळांना भेटल्यानंतर खडसे पवारांच्या भेटीला; भाजपवर ओबीसी नेत्यांचा राजकीय बॉम्ब पडणार?
भाजपत ओबीसी नेते नाराज असून या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले अशी माहिती राष्ट्रवादी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकारांना दिली. मंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच भुजबळ यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यानंतर भुजबळ फार्म येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
२०२४ मध्ये राष्ट्रवादी राज्यात एक नंबरचा पक्ष होईल; भाजपात गेलेले आमच्या संपर्कात: जयंत पाटील
भारतीय जनता पक्षात अनेक गेलेल्या अनेक नेत्यांनी फोन करुन आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा एनसीपी’चे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. २०२४ मध्ये एनसीपी राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल यासाठी प्रयत्न करु असंही यावेळी त्यांनी सांगितलं. सांगलीमधील इस्लामपूर येथे जयंत पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
१९८० मध्ये पवारांनी प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून स्थिर सरकार दिलं होतं: भाजप खा. संजय काकडे
महाराष्ट्रात शिवसेनेनं काँग्रेस-एनसीपी’सोबत जात ऐतिहासिक आघाडीची सत्ता स्थापन केली आहे. परंतु, ही आघाडी टिकणार नाही, सरकार पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू शकणार नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र आता भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल केलेल्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाकाला? पवारांच्या त्या टीकेमुळे १० रुपयात थाळी बोंबलणार?
राज्यात सत्ता आल्यावर अवघ्या १० रुपयांमध्ये भरपेट जेवण देऊ, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टोला लगावला होता. त्यावेळी एका सभेतील प्रचारात तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा खोचक सवाल शरद पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला होता. विधानसभा निवडणुकीच्या बार्शी येथील प्रचारसभेत पवारांनी शिवसेनेच्या त्या घोषणेवर टीका केलो होती.
5 वर्षांपूर्वी -
पवारांचं बोट सोडलं? झारखंडमध्ये मोदी म्हणाले 'करिया मुंडांचं बोट धरून राजकारण शिकलो'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणात एवढं काही बोलून ठेवलं आहे की ते त्यांना देखील आठवत नसावं. महाराष्ट्रात सहानुभूती मिळावी म्हणून एका मंचावर ‘मी शरद पवारांचं बोट धरून राजकरण शिकलो’ असं म्हणाले होते. वास्तविक त्यावर स्वतः शरद पवारांनी देखील मोदींची फिरकी घेतली होती आणि माणूस बोलण्यात ‘लय हुशार’ अशी खेड्यातल्या शैलीत त्यांचा समाचार दुसऱ्या एका कार्यक्रमात घेतला होता.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री होण्याआधी राजकारणात फडणवीसांचं काही वेगळं स्थान नव्हतं: शरद पवार
२०१४च्या निवडणुकीनंतर मोदी लाटेत राज्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षातील माहित नसलेले चेहरे देखील थेट मंत्रीपदी विराजमान झाले होते. अगदी देवेंद्र फडणवीस देखील त्यातीलच एक उदाहरण म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी विरोधी पक्षनेते पदी देखील त्यांनी काही विशेष कामगिरी बजावली नव्हती. मात्र २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडे यांचा आकस्मित मृत्यू झाला आणि मोदींच्या तालावर नाचेल आणि नागपूरच्या आरएसएस लॉबीमुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती हे सर्वश्रुत आहे. कारण भाजपात विरोधी पक्षनेते पद मिळेल याची शास्वती ते स्वतः सुद्धा देऊ शकणार नव्हते.
5 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग न्यूज: मागणी असेल तरच लोया प्रकरणाची चौकशी करावी: शरद पवार
सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे 10 वर्षापर्यंत सुरक्षित ठेवण्यात यावी या विनंतीसह दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली. अॅड. सतीश उके यांनी ही याचिका दाखल केली होती. आता, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी जस्टील लोया प्रकरणाच्या चौकशींसदर्भात विधान केलं आहे. जर, मागणी असेल आणि गरज असेल तरच लोया प्रकरणाची चौकशी करावी, असे पवार यांनी म्हटलंय.
5 वर्षांपूर्वी -
पवारसाहेबांसाठी काहीही! भिडली पोरगी भाजपाला अन ऑपरेशन लोटसच्या पाकळ्याच गळाल्या
महाराष्ट्रात २२ नोव्हेंबरला सकाळी राजकीय भूकंप झाला आणि राज्याने सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीचा बातमी बघितली. मात्र त्यानंतर राज्यात खऱ्या अर्थाने राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळालं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या खऱ्या एकीची कसोटी होती. विशेष म्हणजे यावेळीच खऱ्या अर्थाने शिवसेना, राष्टवादी आणि काँग्रेस एकमेकांसोबत विश्वासाने एकत्र आल्याचे पायाला मिळाले.
5 वर्षांपूर्वी -
आणीबाणीवरून काँग्रेसवर आसूड ओढणाऱ्या शिवसेनेला इंदिरा गांधींची आठवण
राज्यात सध्या महाविकासआघाडीच्या नावाने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार विराजमान होणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून इंदिरा गांधींनी लादलेल्या आणिबाणीविरुद्ध अनेकदा आसूड ओढले आहेत. मात्र, बदल्यात राजकारणात सर्वकाही जुळून येताना दिसत आहे. कारण आता शिवसेनेला स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी (Balasaheb Thackeray and Indira Gandhi Meet) यांच्या त्या भेटीची आठवण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे घराण्यातील मुख्यमंत्री; स्वर्गीय. बाळासाहेबांच्या राजकारणापलीकडील मित्रामुळे शक्य
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नाट्यानंतर पुन्हा एकदा सर्वात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल. सर्वोच्च न्यायालयानं उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वीच अजित पवारांनी राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे नाव जाहीर करण्यात आले आहे. उद्या बुधवारी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. विशेष म्हणजे संपूर्ण हयातीत भाजपने जे कधीच होऊ दिलं नसतं ते स्वर्गीय. बाळासाहेबांच्या जुन्या राजकारणापलीकडील मित्राने म्हणजे शरद पवारांमुळे ते शक्य झालं हे देखील वास्तव आहे.
5 वर्षांपूर्वी -
बंड अजित पवारांचं; अन भाजप नेत्यांकडून खुलेआम 'आम्हाला राष्ट्रवादीचा पाठिंबा' असल्याची वक्तव्य
राज्यात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली. त्यांनतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर अजित पवार यांचे गटनेतेपद काढून टाकण्यात आले. यावर राजकीय वर्तुळात बराच गदारोळ माजला. तसेच अजित पवार यांनी पाठिंबा दिला तेव्हा ते राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते होते आणि आजही तेच नेते आहेत त्यांनी काढलेला व्हिप राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाळावाच लागेल” असंही रावासाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. या संबंधी भारतीय जनता पक्षाचे नेता रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांना अजूनही गटनेतेपदाचे अधिकार असल्याचे सांगितले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA