महत्वाच्या बातम्या
-
भाजपा-शिवसेनेनेच सरकार स्थापन करावं: शरद पवार
भाजपा आणि शिवसेना यांनाच जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करावं बाकी याबाबत बोलण्यासारखं काहीही नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार मुंबईतल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपा आणि शिवसेना युतीला जनतेने कौल दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावं आणि आम्हाला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करून काँग्रेसने पाठिंबा द्यावा, यासाठी हालचाली?
एनसीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर राज्यातील राजकीय घडामोडी वेगळ्या दिशेला वळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या नेतृत्त्वात राज्यात सत्ता स्थापन करण्यास एनसीपी पक्ष इच्छुक असल्याचे एनसीपी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला माहिती देताना सांगितले. परंतु, असे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेचे अध्यक्षपद हवे आहे. शिवसेनेच्या नेतृत्वात असे सरकार स्थापन होत असल्यास, काँग्रेस पक्षाने सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे.
5 वर्षांपूर्वी -
भविष्यात काय घडेल ते आता सांगू शकत नाही: शरद पवार
सरकार स्थापन करण्यासंदर्भात शिवसेनेच्या नेतृत्वाशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही. शिवसेनेचा प्रस्ताव आल्याशिवाय पुढे कसं जाणार, असं सांगून एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार स्थापन्याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला. महाराष्ट्रात जाणार नाही, असं स्पष्ट करून त्यांनी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना माहिती दिली, असं त्यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील सरकार स्थापनेवरून आज दिल्लीत घडामोडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. ते सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावयाचा काय? या मुद्याभोवती ही चर्चा फिरणार असल्याचे समजते. निकालानंतर ते देखील पहिल्यांदाच दिल्लीला आले आहेत. आज शरद पवार आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात दिल्लीत चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय पेचावर आता दिल्लीतच तोडगा निघण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवारांनी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेटी देताच 'डिजिटल' सत्ताधारी जमिनीवर
राज्यातील शेतकर्यांचे अवकाळी पावसाने झालेले नुकसान आणि राज्य सरकारच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. राज्याचे मुख्य सचिव, कृषी, मदत-पुनर्वसन, वित्त आणि विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभाग आणि विमा कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने भाजपसोबतचे केंद्रापासून सर्व राजकीय संबंध तोडावे; राष्ट्रवादीची अट?
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्यानं मुख्यमंत्रिपदाबद्दल ‘प्रचंड आशावादी’ असलेल्या शिवसेनेसमोर राष्ट्रवादीनं एक ‘अवजड’ आणि ‘अवघड’ अट ठेवल्याचं समजतं. राज्यात राष्ट्रवादी शिवसेनेला साथ देईल. मात्र त्यासाठी शिवसेनेनं भाजपासोबतचे सर्व संबंध तोडावेत. केंद्रात अवजड उद्योग मंत्रालय सांभाळणाऱ्या अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी अट राष्ट्रवादीकडून घालण्यात आल्याचं पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितल्याचं वृत्त ‘मुंबई मिरर’नं प्रसिद्ध केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
नव्या समिकरणांसाठी हालचाली? पवारांच्या पुढाकारामुळे भाजपाची धाकधूक वाढली
राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्ष दहाव्या दिवशीही कायम असल्यामुळे एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी एनसीपी’च्या निवडक नेत्यांची शनिवारी पेडर रोडवरील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली असे सांगण्यात येत असले तरी शरद पवार यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. पवार हे आज, रविवारी सायंकाळी दिल्लीला जात असून, ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची रविवारीच किंवा सोमवारी भेट घेतील, असे एनसीपी’च्या एका नेत्याने सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
नुकसान ग्रस्त भागाला पवारांची प्रत्यक्ष भेट तर फडणवीसांचा कार्यालयातून आढावा
राज्यातील शेतकर्यांचे अवकाळी पावसाने झालेले नुकसान आणि राज्य सरकारच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. राज्याचे मुख्य सचिव, कृषी, मदत-पुनर्वसन, वित्त आणि विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभाग आणि विमा कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: पवारांकडून जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांच्या भेटीगाठी
राज्यातील सत्ता स्थापनेवरून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत वाद सुरू असताना दुसरीकडे शरद पवार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहेत. शरद पवार सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले. इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यांच्या व्याथा ते जाणून घेत आहेत. आमच्या हातचं पीक गेलंय. खूप नुकसान झालंय. जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं शेतकऱ्यांनी पवारांना सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
युतीत तणाव वाढला, सेनेच्या आघाडीतील नेत्यांशी भेटीगाठी
दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य करायला नको होते, अशी नवनिर्वाचित आमदारांसमोरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मन की बात’ बोलून दाखविल्यानंतर काही तासांतच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे पडद्यामागे राजकारणाचा सारीपाट बदलण्याचे दबावतंत्र सुरु असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने आम्ही भाजपसोबत नाही, अशी जाहीर आणि ठाम भूमिका घेतल्यास दुसर्याक्षणी आमचा त्यांना बाहेरून जाहीर पाठिंबा असेल, असे काँग्रेसचे नेते दबक्या आवाजात बोलत आहेत.‘हीच ती वेळ’ आहे शिवसेनेला स्वाभिमान दाखविण्याची आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याची, अशी कोपरखळी काँग्रेसच्या एका नेत्याने मारली.
5 वर्षांपूर्वी -
लवकरच शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात राजकीय चर्चा होणार
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय घडामोडीला वेग आला असून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेमध्ये हमरीतुमरी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत काही वेगळा निर्णय घेण्याची वेळ आल्यास काय करावे यासाठी विरोधी गोटातही भेटीगाठींचे सत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपासून आघाडीच्या बाजूनं झुकलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
आम्ही विरोधीपक्षाची भूमिका बजावणार: जयंत पाटील
राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच एनसीपीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “जनतेनं आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही विरोधीपक्षाचीच भूमिका बजावणार असल्याचं” मत त्यांनी व्यक्त केलं. आज (बुधवार) एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार, आमदार जयंत पाटील आणि आमदार नवाब मलिक यांची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
5 वर्षांपूर्वी -
समोर पैलवानंच नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना पावसात भिजणारे पवार पुन्हा आठवले
विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त काय गाजलं असेल तर ते साताऱ्यातलं शरद पवारांचं पावसातलं भाषण. शरद पवारांच्या या पावसात भिजण्यावर आता मुख्यमंत्र्यांनी खोचक टीका केली आहे. निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी पावसात भिजावं लागतं यामध्ये आमचा अनुभव कमी पडला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. ते मुबंईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी युतीच्या वादावरही मोठं वक्तव्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सातारा दौरा रद्द करण्यावर शरद पवारांचा खुलासा
उदयनराजे भोसले यांनी एनसीपीच्या खासदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर सातारमध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागली. यामध्ये श्रीनिवास पाटील यांच्या बाजूने जनतेने कौल दिला. उदयनराजेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने एनसीपी’साठी देखील ही लढाई प्रतिष्ठेची बनली. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारामध्ये सभा घेतली होती. धो धो पावसात पवारांच्या सभेची चर्चा राज्यभरात झाली. त्यानंतर उदयनराजेंचा दारुण पराभव झाला. यानंतर श्रीनिवास पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी तसेच सातारकर जनतेचे आभार मानण्यासाठी मी स्वत: जाणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. पण हा कार्यक्रम त्यांनी रद्द केला.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्यात काहीच गैर नाही: शरद पवार
भाजप आणि शिवसेनेत सत्तास्थापनेसाठी ठरलेल्या फॉर्म्युल्याची अंमलबाजवणी झाली पाहिजे. याचा अर्थ ५०-५० टक्के किंवा त्यांचे जे काही ठरले असेल ते. मागच्या वेळी शिवसेनेच्या चार-दोन गोष्टी राहून गेल्या. मात्र, या वेळी ते काही सहन करतील, असे असे दिसत नाही. त्यामुळे स्वत:चा आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईलआणि उद्धव यांच्या या मागणीशी आपण सहमत असल्याचे पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. “१९९० च्या दशकातही शिवसेना-भाजपाने ५०-५० चे सूत्र वापरले होते. त्यांना सरकार चालवण्याचा अनुभव असल्याने त्यांनी अशा मागणीवर अडून राहण्यात काहीच चुकीचे नाही,” असं पवार म्हणाले. पवारांनी दिलेला हा संदर्भ १९९५-१९९९ काळात शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते तेव्हाचा आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
5 वर्षांपूर्वी -
निवडणुकीच्या निमित्तानं मोदी-शहांनी महाराष्ट्र दर्शन केले: शरद पवार
भाजपाची अब की बार २२० पार ही घोषणा जनतेला पटली नाही. सत्ता जाते, सत्ता येते, मात्र जमिनीवर पाय ठेवावे लागतात. पक्षांतराला जनतेनं पाठिंबा दिलेला नाही, असं म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांना जनतेनं पराभूत केले. साताऱ्याच्या गादीबद्दल सर्वांना आदर आहे. श्रीनिवास पाटील जनतेचं प्रश्न सोडवतील, असा विश्वास आहे. निवडणुकीच्या निमित्तानं मोदी-शहांनी महाराष्ट्र दर्शन केले. मोदी शहांच्या दौऱ्याचा राज्याच्या निकालावर कोणताही परिणाम झालेला नाही. नव्या समीकरणाबद्दल सर्व मित्रपक्षांशी चर्चा करूनच ठरवणार आहे, असं पवार म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
बहिणाबाईंच्या कविता आम्ही ऐकल्या आहेत; या शब्दात यातना होण्यासारखं काय आहे? शरद पवार
बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बंधू-भगिनींमध्ये सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. ‘धनंजय मुंडे हे पंकजांना बहिणाबाई बोलल्याचं मी ऐकलंय. त्यात वावगं काहीच नाही. बहिणाबाई हा आदरणीय शब्द आहे. या शब्दात यातना होण्यासारखं येण्यासारखं काय आहे,’ असा टोला पवारांनी हाणला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे, भाजपला सुद्धा कळून चुकले आहे: शरद पवार
विधानसभा निवडणुकीत यावेळी महाराष्ट्रात चमत्कार घडेल, जनतेचा मूड वेगळा आहे. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाला कळून चुकले आहे, हे राज्य आपल्या हातातून जाणार आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री इथे येऊन सभा घेतात. आपले मुख्यमंत्री प्रत्येक मतदारसंघात जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले, इतर केंद्रीय मंत्री आलेत ते इथे पर्यटनासाठी फिरतायत का? यांना खात्री झाली आहे. हे राज्य आपल्या हातातून जाईल की काय, लोकांचा मूड आपल्याविरोधात आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे, असे प्रवार म्हणालेत.
5 वर्षांपूर्वी -
सर्वच थरातुन पवारांची स्तुती तर उद्धव ठाकरेंकडून मात्र टीका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माणमध्ये घेतलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे नेते भर पावसात सभा घेत आहेत. पण गावांमध्ये ठणठणाट आहे. तुम्ही ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर तुम्हाला आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला.
5 वर्षांपूर्वी -
८० वर्षाच्या तरुणाचं भर पावसात भाषण; कार्यकत्यांना सुद्धा स्फूर्ती
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पावसात केलेली तुफान फटकेबाजी सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या वयातही शरद पवार यांनी दाखवलेल्या जिद्दीचं सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे. पाऊस सुरु असतानाही शरद पवार यांनी सभा न थांबवता उपस्थित कार्यकर्ते आणि समर्थकांना संबोधित केलं. विशेष म्हणजे व्यासपीठावर येताना शरद पवार यांच्या डोक्यावर छत्री धरलेली होती. पण शरद पवार यांनी ही छत्री दूर केली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा