महत्वाच्या बातम्या
-
शेती करणं अवघड झालंय; इथला काश्मीरला जाऊन शेती करणार आहे का? शरद पवार
महाराष्ट्राच्या निवडणुकीत मोदी आणि शहा या दोघांच्या तोंडात फक्त कलम ३७० आणी शरद पवार ही दोन नावं असतात. अमित शहा यांची तर मला काळजी वाटते. रात्री झोपेतही ३७० म्हणत असेल. त्यांची बायको काय म्हणत असेल याची मला चिंता आहे. इथं शेती करणं अवघड झालंय कोण त्या काश्मीरला जाऊन शेती करणार हे मला सांगा?’ असं म्हणत एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा खरपूर समाचार घेतला.
5 वर्षांपूर्वी -
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी पवारांचं मुख्यमंत्र्यांना प्रतिउत्तर
पात्रता नसताना राज्य सहकारी बँकेनं काही लोकांना कर्ज दिलं. बँकेने वेगवेगळ्या प्रकारचे ठराव केले. पैसा चुकीच्या पद्धतीनं वाटला, संपत्ती विकली, कोणालाही कर्ज दिलं अशा काही ठरावांमध्ये शरद पवार यांच्या निर्देशानुसार हे करण्यात आल्याची नोंद केली आहे. याव्यतिरिक्त काही पत्रदेखील आहेत. ज्यामध्ये शरद पवार यांनी काही व्यक्तींना कर्ज देण्याची विनंती केली आहे. त्यामुळं अशा पत्राची आणि कर्जाची चौकशी करण्यात येत आहे. याचा तपास ईडीकडून सुरु आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
१३ वर्ष मंत्रीपद दिल्यानंतर काम करता येणार नसेल तर बांगड्या भरा: शरद पवार
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानं आरोप-प्रत्यारोपांना धार चढली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्वाधिक आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांवर हल्ले चढवत आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर तोफ डागताना पवार यांनी आज त्यांना बांगड्या भरण्याचा सल्ला दिला.
5 वर्षांपूर्वी -
सत्ता जाण्याच्या भीतीनेच मोदींच्या ९, शहांच्या २०, फडणवीसांच्या ५० सभा: शरद पवार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेत प्रश्न उपस्थित केला की, विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांशी कोणताही सामना नाही हे भाजपला वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर सभा का आयोजित करत आहात?. चाळीसगाव येथे सभेला संबोधित करताना पवार म्हणाले की, सत्ताधारी भाजप भाजप झोपेत आहे आणि त्यामुळेच ते गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करत आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या घटनेतील कलम ३७० रद्द केल्याबद्दल पवारांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले.
5 वर्षांपूर्वी -
मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही: शरद पवार
आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर पैलवान दिसत नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारसभेत समाचार घेतला. या सभेत पवार म्हणाले, “मुख्यमंत्री सांगतात, त्यांचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे. आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही,” असं प्रतित्युत्तर पवार यांनी दिलं.
5 वर्षांपूर्वी -
आम्ही काही नटरंग नाही, त्यामुळे आम्ही हातवारे करत नाही: फडणवीसांचं पवारांना उत्तर
लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही असं उत्तर देत आणि आक्षेपार्ह हातवारे करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बार्शी या ठिकाणी झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. पवारांच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्री म्हणाले,”आम्ही नटरंगसारखं काम केलं नाही, आम्हाला हातवारे करता येत नाही. उत्तर आम्हालाही देता येईल, पण आम्ही देणार नाही,” असं सांगत फडणवीस यांनी पवारांना टोला लगावला.
5 वर्षांपूर्वी -
राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाकाला; पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला
राज्यात सत्ता आल्यावर अवघ्या दहा रुपयांमध्ये भरपेट जेवण देऊ, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टोला लगावला आहे. तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा खोचक सवाल त्यांनी विचारला. ते शनिवारी बार्शी येथील प्रचारसभेत बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो, भाजपला दारात सुद्धा उभं करू नका: शरद पवारांचं आवाहन
भाजप सरकारला शेतीबाबत आस्था नाही. यांच्या राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली की यांनी कांदा निर्यातबंदी करून टाकली. या सरकारनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. त्यांना मतदानासाठी दारातही उभे करू नका,’ असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांना केलं.
5 वर्षांपूर्वी -
चाणाक्ष राष्ट्रवादी आणि मनसेने शिस्तबद्धपणे प्रसार माध्यमांना स्वतःवर केंद्रित केलं? सविस्तर
विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपने महाजानदेश यात्रा आणि शिवसेनेने जनआशीर्वाद यात्रेने महाराष्ट्र पिंजून काढला आणि प्रसार माध्यमांचे कैमरे स्वतःवर केंद्रित ठेऊन चर्चेत राहिले. विरोधक संपल्याचं चित्र निर्माण करण्यात सत्ताधारी जवळपास यशस्वी झाले होते. दुसऱ्याबाजूला शरद पवार आणि अमोल कोल्हे यांच्या शिवआशीर्वाद यात्रेला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत असल्याने सत्ताधारी थोडे चलबिचल होते, मात्र ते मान्य करण्यास सत्ताधारी तयार नसल्याचं पाहायला मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
आरबीआयने निर्बंध घातलेल्या पीएमसी बँकेत देखील भाजपचे संचालक: अजित पवार
राज्य सहकारी बँके प्रकरणांत शरद पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव नाहक गोवण्यात आले. महत्वाच्या पदांवर शरद पवारांमुळे मी पोहचलो होतो. माझ्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहून अस्वस्थ झालो. त्यातून राजीनामा दिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक झाले.
5 वर्षांपूर्वी -
शिखर बँकेत भाजपचे संचालक आहेत हे भाजपने जनतेपासून का लपवलं: अजित पवार
राज्य सहकारी बँके प्रकरणांत शरद पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव नाहक गोवण्यात आले. महत्वाच्या पदांवर शरद पवारांमुळे मी पोहचलो होतो. माझ्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहून अस्वस्थ झालो. त्यातून राजीनामा दिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक झाले.
5 वर्षांपूर्वी -
माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ: शरद पवार
माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रचंड खळबळ उडवली. त्यांचा मोबाइल ‘स्विच्ड ऑफ’ असल्याने गूढ वाढले आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका साखर कारखाना स्थळी असल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले.
5 वर्षांपूर्वी -
‘तेल लावलेला पैलवान’ हाताला लागलाच नाही; राज यांचं ते भाषण आज खरं ठरलं
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार होते. मात्र, चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच होती. या सगळ्या घडामोडींमुळं मुंबईत तणावाची परिस्थिती होती.
5 वर्षांपूर्वी -
सहकारी-विरोधक एकवटले? आम्हाला साथ देणाऱ्या सर्व पक्षांचे आभार मानतो: शरद पवार
बँक घोटाळ्याच्या प्रकरणात चौकशीसाठी स्वत:हून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तूर्त रद्द केला आहे. मुंबई व महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे, असं खुद्द पवार यांनी आज स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब : शरद पवार
बँक घोटाळ्याच्या प्रकरणात चौकशीसाठी स्वत:हून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तूर्त रद्द केला आहे. मुंबई व महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे, असं खुद्द पवार यांनी आज स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
ईडीच्या कार्यालयात न जाण्याची पोलीस आयुक्तांची विनंती
ईडीच्या ईमेलनंतरही शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयाला भेट देण्याचा पवित्रा घएतसा आगे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी पुन्हा एकदा त्यांची भेट घेण्यास त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. सकाळपासून दुसऱ्यांदा पोलीस त्यांच्या घरी त्यांची समजूत घालण्यासाठी पोहोचले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ज्या घोटाळ्यावरुन ईडीने FIR दाखल केला आहे, त्या बँकेत शरद पवार कोणत्याही पदावर नव्हते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)होणाऱ्या चौकशीवरुन सध्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात शरद पवार स्वत:च उपस्थित राहणार आहेत. त्यांनी स्वत: आपण ईडी कार्यालयात जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना समर्थन दिलं आहे. शरद पवार राजकारणातले भिष्म पीतामह असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ईडी चौकशी: युतीच्या यात्रांची चर्चा संपली; ग्रामीण भागात पवारांची चर्चा आणि भावनिक किनार: सविस्तर
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. मात्र, चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. या सगळ्या घडामोडींमुळं मुंबईत तणावाची परिस्थिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज शरद पवार ईडी कार्यालयात; परिसरात मोठ्या पोलीस बंदोबस्तासह कलम १४४ लागू
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. मात्र, चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. या सगळ्या घडामोडींमुळं मुंबईत तणावाची परिस्थिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिखर बँक: अण्णा हजारेंकडून शरद पवारांना क्लीन चीट
शिखर सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपा-शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांचा समावेश आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी यांनी सदर विषयाला अनुसरून शरद पवारांना क्लीन चिट दिली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना