महत्वाच्या बातम्या
-
राष्ट्रवादी व शरद पवारांनी आत्मचिंतन करावं – मुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य आणि केंद्र सरकारबाबत अनेक गौप्यस्फोट केले. तसंच सरकारवर जोरदार टीका देखील केली. या टीकेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करत प्रत्युत्तर दिले आहे. ‘भाजप सरकार कोणावरही दबाव टाकत नसून दबाव टाकून लोकांना पक्षात घेण्याची भारतीय जनता पक्षाला गरज नाही.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवारांच्या टिकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
आगामी विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर असताना शिवसेना- भारतीय जनता पक्षामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांचे पक्ष प्रवेश जोरदार सुरू आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. यावर, आमचे खत चांगलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार, असा टोला आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला.
5 वर्षांपूर्वी -
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली; ‘या’ दोन बड्या नेत्यांची मुलाखतीला दांडी
जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तस तशी सत्ताधाऱ्यांच्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहेत. दलबदलीचा सर्वाधिक मोठा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला बसत आहे. मात्र त्याचे लोन आता पक्षाचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघात देखील पसरू लागल्याचे दिसत आहे. तसाच काहीसा प्रकार सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या बाततीत घडणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार, १३ नगरसेवक व अनेक पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर
जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तस तशी सत्ताधाऱ्यांच्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहेत. दलबदलीचा सर्वाधिक मोठा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला बसत आहे. मात्र त्याचे लोन आता पक्षाचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघात देखील पसरू लागल्याचे दिसत आहे. तसाच काहीसा प्रकार नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या बाततीत घडणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.
5 वर्षांपूर्वी -
निवडणूक आयोगाची राष्ट्रवादीला नोटीस; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात?
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या लाटेत काँग्रेस’सकट देशभरातील सर्वच विरोधकांचा सुपडा साफ झाला. मात्र त्यानंतर अनेक पक्षांचं राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखच धोक्यात आली आहे. लोकसभेतील पराभवानंतर आता निवडणूक आयोग देखील भारतीय जनता पक्षाच्या सर्व विरोधी पक्षांना धक्का देण्यास सज्ज झाला आहे असं म्हटलं जात आहे. इतर पक्षांप्रमाणे हा धक्का शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला देखील बसणार आहे. कारण आयोगाने अनेक पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिली आहे. अशा पक्षांमध्ये एनसीपीचा देखील समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे ३८७ कोटी कधी मिळणार? - जयंत पाटील
कांदा अनुदानावरून एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात सरकारवर पुन्हा लक्ष केले आहे. अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले कांदा अनुदान ४ महिने १५ दिवस उलटून देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेले नाहीत, असे जयंत पाटील यांनी ट्विट करून म्हंटले आहे. राज्यातील कांदा उत्पादक अत्यंत हलाकीच्या आणि अडचणींचा सामना करत असताना देखील राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली पाहायला मिळत नसल्याने आमदार जयंत पाटील यांनी युती सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शहापूर राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांचा राष्ट्रवादीला रामराम..शिवबंधन बांधणार
ठाण्यातील एनसीपीचे नेते आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामुळे बरोरो हे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवतील हे जवळपास नक्की झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
एनसीपी'कडून तिवरे दुर्घटनाग्रस्तांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत; शरद पवारांची उपस्थिती
चिपळूण येथील तिवरे धरण २ दिवसांपूर्वी रात्री ९ च्या सुमारास फुटलं. त्या दुर्घटनेत एका वाडीतील तब्बल २४ जण वाहून गेले. दरम्यान आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले असून नशिबाने एकजण जिवंत आढळला आहे. मात्र अनेकांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. धरण फुटल्यामुळे एकूण १३ घरं वाहून गेल्यानं अनेक कुटुंबाची मोठी आर्थिक हानी देखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव केवळ लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती, तर आज १८ गावकऱ्यांचा जीव वाचला असता.
5 वर्षांपूर्वी -
खबरदारीचा उपाय म्हणून विनोद पाटलांकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल
मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण वैध आहे, अपवादात्मक स्थितीत ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण राज्य सरकार देऊ शकतं, असं स्पष्ट करत मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षण कायद्यावर काल शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र, देण्यात आलेलं १६ टक्के आरक्षण कमी करून १२ ते १३ टक्के आरक्षण देण्याचे निर्देश कोर्टाने दिले. या निकालावर, मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. तसेच सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे देखील सांगितलेय. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी सातत्याने कायदेशीर बाजू लढणारे मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभेसाठी आता शरद पवारचं मैदानात, मुंबईत महत्वाची बैठक
लोकसभा निवडणुकीत पराभव सहन करावा लागल्याने एनसीपीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे, लोकसभेतील पराभव झटकून टाकत नव्या दमाने कामाला सुरुवात करण्यासाठी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
5 वर्षांपूर्वी -
EVM बाबत तंत्रज्ञांशी चर्चा करून व विरोधकांना एकत्र घेऊन प्रकरणाच्या खोलात जाणार
ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचा दावा करणारे एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता निवडणूक अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची देखील धाकधूक वाढणार आहे. ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये अडचण नसून निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतमोजणीवेळी गडबड होत असल्याचा संशय पवार यांनी कार्यकर्त्यांना संवाद साधताना व्यक्त केला. एनसीपीच्या २० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
उशीरच झाला! जमिनीवरील नेते शरद पवार आता डिजिटल तंत्राचा वापर करणार
मागील काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रातही समाज माध्यमांचं महत्त्व वाढलं आहे. याद्वारे नेते थेट आपल्या कार्यकर्त्यांसोबत जोडले जातात. याच विषयाला नुसरून एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या फेसबुक पेजवरून तरुणांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार ९ जून रोजी सकाळी अकरा वाजता शरद पवारां त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर LIVE असणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीत 'तो' निर्णय झाल्यास भाजप कार्यकर्ते गळफास लावून घेणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडणार आहे. पवार यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी बारामतीकडे वर्ग केले आहे असा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे. दरम्यान आज होणा-या मुंबई येथील बैठकीत बारामतीचे पाणी जैसे थे राहावे, असा निर्णय झाल्यास सांगोला तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते आणि तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते शिवाजी चौक सांगोला येथे गळफास लावून घेणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकीत पाकिस्तानचं पाणी अडवण्याच्या धमक्या देऊन बारामतीचं पाणी बंद?
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजा दुर्लक्षित करून भाजपचे सर्वच नेते मंडळी भाषणात केवळ पाकिस्तानवर केंद्रित झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर भाषणात थेट पाकिस्तानचं पाणी रोखण्याची भाषा केली होती. भारतातुन वाहणाऱ्या नद्यांचे पाणी रोखून पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करणारे आज बहुमताने केंद्रात सत्तेत येताच पाकिस्तनाला विसरले असून, देशातील सामान्य लोकांच्या तोंडाचे पाणी पळवण्याचे काम करत आहेत असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीची नोटीस
हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एनसीपीचे नेते आणि शरद पवारांचे अत्यंत विश्वासू प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे ठरले जाईंट किलर! सेनेच्या आढळराव पाटलांचा पराभव
शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मोठ्या प्रतिष्ठेचा केला होता. त्यात राष्ट्र्वादीने आयत्यावेळी अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांच्या विजयाचा निर्धार केला होता. विद्यमान खासदार आढळराव पाटील हे शिवसेनेतील दिग्गज नेते म्हणून परिचित असल्याने शिवसेनेने येथे प्रतिष्ठा पणाला लावल्याचे पाहायला मिळालं. या मतदारसंघात आढळराव पाटलांची स्वतःची अशी मोठी यंत्रणा असून त्यांना पराभूत करणे म्हणजे मोठं आव्हान असल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांचा आज शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश
मागील ३ वर्षे पक्षाच्या सर्वच जाहीर कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवणारे एनसीपीएचे मराठवाड्यातील दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज मुंबईतील मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जयदत्त क्षीरसागर भेट घेणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना शिवबंधन बांधतील. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय सुट्यानिमित्त परदेश दौऱ्यावर असल्याने हा प्रवेश लांबला होता.
6 वर्षांपूर्वी -
२०१४ वगळता यापूर्वी एक्झिट पोल खोटी ठरली व भलतेच निकाल आल्याचा इतिहास
काल लोकसभा निवडणुकीच्या ७व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपताच अनेक टीव्ही वृत्तवाहिन्यांची विविध एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलची निरीक्षणं प्रसिद्ध केली आहेत. वास्तविक २३ तारखेला खरं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान प्रसार माध्यमांमध्ये एक्झिट पोलची दिली जाणारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष निकालाचे चित्र पूर्णपणे वेगळंही असू शकतं असा पूर्व इतिहास देखील आहे. एक्झिट पोलचे अंदाज सपशेल आपटल्याची अनेक उदाहरणे आहेत. २००९ मधील एक्झिट पोलची आकडेवारी त्याच उत्तम उदाहरण ठरले आहेत. त्याव्येतिरिक्त ही अनेकदा निरनिराळ्या एजन्सीने केलेली एक्झिट पोल खोटी ठरली असल्याचे इतिहास आहे.
6 वर्षांपूर्वी -
७व्या टप्प्यातील मतदान पूर्ण; थोड्याच वेळात जाहीर होणार एक्झिट पोल
लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या आणि ७व्या टप्प्यातील मतदान संध्याकाळी ६ वाजता अधिकृतपणे पूर्ण झाले असून संध्याकाळी ६:३० वाजता एक्झिट पोलचा अंदाज जाहीर होणार आहे. २३ मे रोजीच्या मतमोजणीपूर्वी एक्झिट पोलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
चंद्राबाबू-शरद पवार भेट! दीड तास चर्चा
लोकसभा निवडणुकीच्या ७व्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या मतदान पार पडणार आहे. यादरम्यान नवं सरकार बनविण्याच्या दृष्टीने विरोधकांच्या जोरदार हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी’चे सर्वेसेवा चंदबाबू नायडू यांनी आज राजधानी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार