महत्वाच्या बातम्या
-
शरद पवार उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर; दुष्काळाने होरपळलेल्या जनतेशी संवाद साधणार
एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे उद्या बीड जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात ते संपूर्ण बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, दुष्काळी जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच गुरांच्या छावण्यांना भेट आणि जळालेल्या फळबागांची पहाणी देखील करणार असल्याचे वृत्त आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित राहणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ईव्हीएम मशीन बाबतची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
EVM संदर्भात विरोधीपक्षांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आपल्या याचिकेमध्ये ५० टक्के व्हिव्हिपॅट मशीन आणि EVM मतांची एकत्रित मोजणी करण्याची मागणी करण्यात आली होती. पण, सुप्रीम कोर्टाने विरोधकांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. EVM मध्ये घोळ असल्याचा आरोप यापूर्वी देखील करण्यात आला होता. त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला होत असून ५० टक्के व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. पण, सुप्रीम कोर्टाने विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली आहे, यामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे विरोधकांना जोरदार धक्का बसला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मतमोजणीवेळी ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची पडताळणी होणार का यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी
मतमोजणी करताना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात यावी, या देशभरातील विरोधकांच्या मागणीवर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. काँग्रेस, टीडीपीसह देशातील तब्बल २१ प्रमुख विरोधी पक्षांनी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मतमोजणीवेळी व्हीव्हीपॅटमधल्या ५० टक्के पावत्या ईव्हीएमसोबत पडताळून पाहिल्या जाव्यात असे आदेश कोर्टाने निवडणूक आयोगला द्यावेत, अशी विरोधकांची मागणी आहे.
6 वर्षांपूर्वी -
५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी होणार? न्यायालयात लवकरच सुनावणी
लोकसभा निवडणुकीदरम्यान २१ विरोधी पक्षांनी ईव्हीएमसंदर्भात केलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. ५० टक्के व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी या याचिकाद्वारे केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असताना विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिन्सबद्दल शंका उपस्थित केली. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी थेट मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जाहीर पत्रकार परिषद घेतली होती.
6 वर्षांपूर्वी -
शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले, मुंबईत आमदारांची बैठक बोलावली
लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपल्यानंतर आता एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं वृत्त आहे. शरद पवार यांनी ४ मे रोजी मुंबईमध्ये पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच वरून राजाचं आगमन होणार असून, त्या काळात पक्ष विस्ताराची कामं हाती घेणं कठीण काम असतं. त्यात पावसाचा ३-४ महिन्याचा कालावधी संपताच लगेचच विधानसभा निवडणूक लागणार असल्याने सर्वच पक्ष आतापासूनच तयारीला लागतील असं म्हटलं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपचं बारामती जिंकण्याच्या दाव्यांचं रहस्य ईव्हीएम तर नाही ना? शरद पवार
बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल, असं एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं बारामतीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यंदा बारामती जिंकणारच असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा व्यक्त केला. याबद्दल भाष्य करताना ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी ईव्हीएमविषयी अनेक शंका उपस्थित केल्या.
6 वर्षांपूर्वी -
तशी बातमी छापणे हा निव्वळ खोडसाळपणा आहे: शरद पवार
आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पेडर रोडवरील मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं. त्यांनी काल केलेल्या पंतप्रधानपदाच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. त्यांनी म्हटलं होतं, ‘जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळालं नाही आणि विरोधकांचं सरकार आलं तर पंतप्रधानपदासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे पंतप्रधानपदासाठी प्रमुख दावेदार असतील’, तसेच त्यांनी चौथ्या क्रमांकावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचंही नाव घेतलं.
6 वर्षांपूर्वी -
चंद्राबाबू, ममता किंवा मायावती पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार: शरद पवार
देशभरात लोकसभा निवडणुकीच्या ३ टप्प्यांतील मतदान झाले असून उद्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार कोण असतील याबाबत शक्यता वर्तविली आहे. ते म्हणाले, जर नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात एनडीए स्पष्ट बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी राहिलं तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार असतील. तसेच यात चौथ्या क्रमांकावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे नावही त्यांनी घेतले. शनिवारी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दरम्यान मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे राहुल गांधींनीच अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर कोणतीही चर्चा निरर्थक ठरते असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
२३ तारखेला कोणाच्या चड्डी उतरतील ते समजणार आहे; पवारांना मुख्यमंत्र्यांचा टोला
पराभव समोर दिसत असल्यामुळेच एनसीपीचे अध्यक्ष शरद पवारांचा तोल सुटत चालला आहे. शरद पवार म्हणाले होते, भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यामुळे आता चड्या घालून मांड्या दाखवू नका. पण, इथे तर फुल पॅन्ट आहे. तुम्हीच या चड्डीवाल्यांच्या सपोर्टवर मुख्यमंत्री झाला होता, हे मात्र विसरू नका. कारण, येथे २३ तारखेला कोणाच्या चड्डी उतरतील ते समजणार आहे, असे टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेला राज ठाकरेंशी चर्चा होऊ शकते : शरद पवार
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, एनसीपीच्या आघाडीला अनुकूल वातावरण दिसत आहे. आपण अनेक लोकसभा निवडणुका पाहिल्या, यापुर्वी देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रात एक-दोन वेळा प्रचारासाठी येत होते. आता नरेंद्र मोदी यांना दर २-३ दिवसांनी महाराष्ट्रात यावे लागते, यावरून येथील राजकीय हवा बदलत असल्याचे सूचक विधान एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
6 वर्षांपूर्वी -
सध्या विरोध करणाऱ्यांना दहशतवादी ठरविण्याची मोदी यांची नीती
एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हल्लाबोल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी आता जशास तसे प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून, मंगळवारी मुंबईत झालेल्या जाहीर सभेत त्यांनी त्याचे पुन्हा प्रत्यंतर दिले. ‘राजकारणात विरोधात जाणाऱ्या शक्तींना दहशतवादी ठरविण्याची मोदी यांची नीती आहे’, असा थेट आरोप पवार यांनी केलाच पण, नेहरू, गांधी कुटुंबांनी देशासाठी काय केले, असा प्रश्न करणाऱ्या मोदींना या कुटुंबांनी केलेल्या कार्याची जंत्रीच वाचून दाखवली.
6 वर्षांपूर्वी -
ईशान्य मुंबई: जोरदार शक्तिप्रदर्शन करत संजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
किरीट सोमैया आणि शिवसेनेच्या वादात ईशान्य लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर गैरव्यवहाराचे वैयक्तिक आरोप केल्याने किरीट सोमैया यांचा पत्ता कट करत भाजपाने मुलुंडचे नगरसेवक मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने माजी खासदार संजय दीना पाटील यांना आधीच उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी प्रचारात देखील आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
जातीसाठी नाही मातीसाठी मतदान करा: शरद पवार
लोकसभा निवडणुकीत जातीसाठी नाही तर आपल्या मातीसाठी मतदान करा, असं म्हणत एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना साथ देण्याचं जाहीर आवाहन मतदाराला केलं आहे. शरद पवार यांनी आपल्या या विधानातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना देखील अप्रत्यक्षरित्या टोला हणाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ? अर्थात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दीना पाटील यांना?
ईशान्य मुंबईतील उमेदवारी कुणाला द्यायची यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यावरून मोठं वादंग निर्माण झालं. खासदार किरिट सोमय्या यांचा पत्ता कट करण्यात शिवसेनेला यश देखील आले आहे. पण शिवसेनेने केलेल्या रडीच्या खेळामुळे ईशान्य मुंबईमध्ये युतीने स्वतःचेच हसू करून घेतले आहे. मात्र त्याचा फायदा एनसीपीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना होऊ शकतो, असे चित्र सध्या या मतदारसंघात निर्माण झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
शरद पवार - सचिन तेंडुलकर भेट; चर्चांना उधान
देशभरात आगामी लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापत चालले असून निवडणूकांची रणधुमाळी सुुरू आहे.यादरम्यानच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चाना जोरदार उधाण आले आहे. तब्बल ३० मिनिटं दोघांमध्ये सविस्तर चर्चा सुरु होती. असं असलं तरी दोघांच्या भेटीचं कारण अजून समोर आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
उस्मानाबाद शक्तिप्रदर्शन: एनसीपीचे राणा जगजीतसिंह पाटील यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल
आज दसऱ्या टप्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी स्थानिकांनी तुफान गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
५६ इंच छातीचे मोदी कुलभूषण जाधवला का नाही सोडवून आणत, पवारांचा सवाल
कराड येथील महाआघाडीच्या प्रचारसभेत एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला. या देशाच्या संरक्षण दलांबाबत आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. अभिनंदनला अटक केल्यानंतर जगातील देशांनी पाकिस्तानवर दबाव टाकला आणि अभिनंदनची सुटका झाली. जर मोदींची खरंच ५६ इंचाची छाती असेल तर ते कुलभूषण जाधव यांना सोडवून का आणत नाहीत, असा रास्त सवाल त्यांनी उपस्थित केला. सैनिकांच्या पराक्रमाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी दिला.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हटवण्यासाठी प्रचार करा, असे आदेश काल दिल्यानंतर आज लगेचच मनसेप्रमुखराज ठाकरे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. राज ठाकरे यांनी पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. राज ठाकरे आणि शरद पवार यांची गेल्या काही महिन्यांपासूनची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तब्बल २६ वर्षानंतर अनिल गोटे-शरद पवार भेट
भारतीय जनता पक्षाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्बल २६ वर्षांनंतर भेट घेतली आहे. एकमेकांचे कायम टीकाकार राहिलेल्या गोटे-पवार भेटीने राजकीय वर्तुळात मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सुभाष भामरेंचा पराभव करण्यासाठी आपण शरद पवार यांची भेट घेतली आहे, अशी प्रतिक्रिया अनिल गोटे यांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्या बैठकीला मोदीच गैरहजर होते, त्यामुळे मी पुलावामाचा बदला घेण्यासाठी जवानांनाच आदेश द्या असं सुचवलं
पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात भारताचे तब्बल चाळीस जवान शहीद झाले होते. देशातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. त्यानंतर काही दिवसातच या हल्ल्याचा बदला एअर स्ट्राईकद्वारे घेण्यात आला. यात ३०० पेक्षा अधिक दहशतवादी मारल्याचा दावा सरकारने केला आहे. परंतु, ही कारवाई आमच्या सल्ल्यानेच झाल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. ते चाकण येथे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी अजित पवार, जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे आदी नेते उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार