महत्वाच्या बातम्या
-
हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच | भागवतांच्या विधानाने माझ्या ज्ञानात भर पडली - पवारांचा चिमटा
भारतात राहणारे हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज समान आहेत. आपण सर्व हिंदूच आहोत, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. भागवत यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांना चिमटा काढला आहे. मोहन भागवत यांच्या विधानाने माझ्या ज्ञानामध्ये भर पडली आहे असा टोला पवारांनी लगावला आहे. पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
गैव्यवहारांविरोधात देशात कमिशन आहेत | ईडीच्या कारवायांचा मुद्दा संसदेत मांडणार - शरद पवार
मागील दोन-तीन वर्षांत देशात नवीन यंत्रणा लोकांना माहिती झाली आहे. त्या यंत्रणेचं नाव आहे ईडी. ही ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही. कालच अकोल्यातून भावना गवळी नावाच्या शिवसेनेच्या खासदार आल्या होत्या. त्यांच्या ३-४ संस्था आहेत. ३ शिक्षणसंस्था आणि एक दुसरी छोटी संस्था आहे. त्याचा व्यवहारही २०-२५ कोटींच्या आत आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपाची सत्ता असलेल्या हरयाणात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज | शरद पवारांचं टीकास्त्र
शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत असताना, आज (शनिवार) हरयाणा पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. या लाठीचार्जच्या विरोधात सर्व स्तरातून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्त्या | राज्य सरकारचं पत्र गेलंय, वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल - शरद पवार
राज्यपालांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य सदस्यांनी भेटून १२ आमदारांची यादी दिली आहे. त्यांच्या नियुक्त्या लवकरात लवकर व्हाव्यात याबाबत अनेकदा विनंती केली आहे. मात्र सरकार आग्रही नाही असे म्हणणे आश्चर्याचे असल्याचे आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या दीर्घकाळ रखडलेल्या नियुक्त्या तत्काळ करा, अशी विनंती काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी पुणे दौऱ्यावर आलेल्या राज्यपालांकडे केली.
3 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं | त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे - शरद पवार
महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती. मात्र स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. मात्र मागील २० वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहेत आणि राजकीय स्वार्थातून हे सगळं केलं गेलं आहे. जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे,’ असं राज ठाकरे म्हणले होते.
3 वर्षांपूर्वी -
महिला खासदारांना धक्काबुक्की | 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत असं कधीच पाहिलं नव्हतं | पवारांची नाराजी
राज्यसभेत घटना दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर विमा विधेयकावर चर्चा सुरू झाली. त्याला विरोधकांनी विरोध केला असता संसदते महिला खासरांना धक्काबुक्की करण्यात आली. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संतपा व्यक्त केला आहे. माझ्या 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी असं कधीच पाहिलं नव्हतं, असं शरद पवार म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजप आणि पवारांमध्ये जवळीक वाढतेय का? | | ते एकत्र येतील अशीही शंका व्यक्त - सविस्तर वृत्त
राज्यात काँग्रेसला एकत्र आणून महाविकास आघाडी सरकार स्थापन करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत सुमारे 15 मिनिटे भेट घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | दिल्लीत अमित शहा आणि शरद पवार यांची महत्वाच्या विषयावरून भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार हे पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे नवे सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. राजधानी दिल्लीत दोघांची भेट होत आहे. या भेटीत राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, याच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे देखील त्यांच्यासोबत असणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पेगासस प्रकरण | संसदेत मोदी सरकारची डोकेदुखी वाढू लागल्याने गडकरी पोहोचले पवारांच्या भेटीला
दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशना दरम्यान दिल्लीत अनेक राजकीय हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी भेट झाली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार ही बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, राजकारणातील या दोन दिग्गज नेत्यांच्या बैठकीमुळे चर्चा तर सुरु झालीच आहे. शिवाय अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोकणात ५ एम्ब्युलन्स, २५० डॉक्टरांची टीम पाठवणार | पवारांची माहिती
महाराष्ट्रात पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. कोल्हापूर, कोकण, सातारा, सांगली या भागात पूर आल्याने लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. लवकरच मदत जाहीर करण्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवली आहे. यावेळी अनेक जिल्ह्यांचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्त १६ हजार कुटुंबांना राष्ट्रवादी पक्ष जीवनाश्यक वस्तू पुरवणार | पवारांची मुंबईत घोषणा
महाराष्ट्राला पावसाचा मोठा फटका बसला असून अनेक कुटूंब देशोधडीला लागली आहेत. तर स्थानिक पातळीवरील छोटे उद्योग कोलमडून पडले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष, सामान्य लोकांनी मदतीसाठी हात पुढे केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात तासभर चर्चा | लोकसभा अधिवेशनापूर्वीच्या चर्चेमुळे महत्व
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
दिल्लीत संसदेच्या अधिवेशनाला जाण्यापूर्वी पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज (15 जुलै) संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पण यापैकी तीन मुख्य विषयांवर सर्वाधिक चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास अर्धा तास बैठक झाली. शरद पवार उद्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पवारांच्या राष्ट्रपती पदाबाबतच्या वृत्तावर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण | काय म्हटलं?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपती होण्याच्या शर्यतीत असल्याची कालपासून राज्यभर, देशभर चर्चा सुरु आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार आहेत त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातम्या पेरण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील माध्यमांनी केंद्रीय सहकार खात्यामुळे इथल्या सहकार चळवळीवर परिणाम होईल असे भासवले - शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. यावेळी नव्याने सहकार खातेही तयार करण्यात आले आहे. अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वेगळे खाते निर्माण केल्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्रातील प्रकरणे बाहेर काढले जातील अशा चर्चा होत्या. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांचा जबाब नोंदवला जाणार
भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला आणि निरपराध व्यक्तींना त्यात गुंतवण्यात आले, असा आरोप शरद पवार यांनी यापूर्वी केला होता. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ला देण्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात मीडिया अजून शिल्लक आहे | त्यांच्या माध्यमातून काय गौप्यस्फोट करायचे आहेत ते करा - शरद पवार
महाराष्ट्राच्या २ दिवसीय पावसाळी अधिवेशनावर विरोधीपक्ष असलेला भाजप तीव्र नाराज आहे. भाजपच्या नेत्यांकडून सरकारवर या मुद्द्यांवरून जोरदार टीका होत आहे. “मी गौप्यस्फोट करणार हे या सरकारला ठाऊक आहे म्हणून हे सरकार पळ काढत आहे”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपाला आता थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर शरद पवारांनी यावेळी फडणवीसांना एक सल्लाही दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर, नैराश्यातून हा त्रास देण्याचा प्रयत्न | त्याबद्दल यत्किंचितही चिंता नाही - शरद पवार
रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पुण्यातील कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घातले आहे. सुबोध मोहिते यांचा हा पाचवा पक्ष आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना असा राजकीय प्रवास त्यांनी केला आहे. त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सुबोध मोहिते हे वाजपेयींच्या काळात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री होते. त्यांनी नारायण राणेंसोबत शिवसेनेमध्ये बाहेर पडले होते.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात पुन्हा महत्वाची बैठक
शरद पवार दिल्लीत पोहोचल्यानंतर जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. एकूण पवार आणि प्रशांत किशोर २०२४ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची भूमिका बजावणार हे अधोरेखित होऊ लागलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या योजनेबद्दल कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात येत नसल्याने गुंता अधिक वाढत चालला असून भाजपच्या गोटातही चिंतेचं वातावरण आहे.
4 वर्षांपूर्वी -
तिसऱ्या आघाडीची तयारी नाही | पवारांच्या घरी झालेल्या बैठकीचा अजेंडा तिसरी आघाडी नाही - मजीद मेमन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या घरी राष्ट्रमंचची बैठक झाली. टीएमसीचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रमंचचे संस्थापक यशवंत सिन्ही देखील शरद पवारांच्या घरी उपस्थित होते. शरद पवार आणि यशवंत सिन्हा अध्यक्षस्थानी होते. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीबाबत राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांचे विधान समोर आले असून त्यांनी तिसर्या आघाडीची तयारी करण्याचा अजेंडा फेटाळून लावला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN