महत्वाच्या बातम्या
-
काँग्रेसकडून सातवेळा खासदार | केरळमधील बडे नेते पी सी चाको यांचा एनसीपीत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. केरळमधील काँग्रेसचे माजी खासदार पी सी चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवारांच्या उपस्थितीत चाको यांनी घड्याळ हाती बांधलं. पी सी चाको हे काँग्रेसकडून तब्बल सातवेळा खासदार होते. या पक्षप्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल पटेल उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
पवारांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची आणि मंत्र्यांची महत्वाची बैठक बोलावली
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (१५ मार्च) राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. अधिवेशनानंतर ही पहिली बैठक असणार आहे. महाआघाडी सरकारमधील वादग्रस्त प्रकरणं आणि सरकारची मलिन होत असलेली प्रतिमा या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी ही महत्वाची बैठक बोलावली आहे. माहितीनुसार दोन सत्रात ही बैठक पार पडणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल - शरद पवार
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल. केवळ आसाममध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता राहील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तविले आहे.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवार यांनी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये घेतली कोरोना लस
महाराष्ट्रासह देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. यात 60 पेक्षा जास्त वय असलेले आणि 45 पेक्षा जास्त वय असलेल्या आजारी व्यक्तींना सामील करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मुंबईतील जे.जे हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना लस घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवार भेटीबद्दल चित्रा वाघ यांनी अर्धसत्य मांडलं | हे आहे पूर्ण सत्य जे स्वतः पवारांनी सांगितलेलं
पूजा चव्हाण प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 12 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे. यासोबतच आज पवार साहेबांची खूप आठवण येत असल्याचेही त्या म्हणाल्या.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही शक्तिप्रदर्शन | पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट
पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणावरून अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणींमध्ये आता आणखीनच वाढ होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचे समजते आहे. काल शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
4 वर्षांपूर्वी -
सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणाऱ्या मनसेला सार्वजनिक जबाबदारी समजणार नाही - राष्ट्रवादी
राज्यात १ मार्चपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. परंतु, कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, विधीमंडळातील अनेक नेत्यांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुनावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव | शरद पवार यांचे 1 मार्चपर्यंत सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द
राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
स्वदेशी अर्जुन रणगाडा | तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार | आणि भाजप नेत्यांचं अज्ञान
देशाच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. कालच पंतप्रधान मोदी यांनी चेन्नईमध्ये स्वदेशी बनावटीचा हायटेक अर्जुन रणगाडा लष्कराला सुपूर्द केल्यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था अधिक बळकट व सक्षम झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
केरळ | शरद पवारांकडून आमदार मणी सी कप्पन यांची पक्षातून हकालपट्टी
केरळातील एलडीफ सरकार आणि केरळ राष्ट्रवादीतील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी गेल्या महिन्यात केरळचा एक दौरा केला होता. येत्या विधानसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी एलडीएफ सोबत राहायचे की युडीएफसोबत जायचे, यावरुन वाद सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्यांनी न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा तर प्रयत्न केला नाही ना? - शरद पवार
माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी न्यायपालिकेवर टीका केली आहे. जर कोणी भारतीय न्यायालयात गेला तर त्यांना निकालासाठी सतत प्रतीक्षा करावी लागेल. देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे. मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात जाणार नाही. तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही, असं स्पष्ट मत रंजन गोगोई यांनी इंडिया टुडे या वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मांडलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते | पवारांचा गंभीर आरोप
प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब – गोपीचंद पडळकर
जेजुरी गडावरील अहिल्याबाईंच्या पुतळ्यांचं उद्घाटन करण्यात आलं असून, भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन होणार होते, मात्र त्या आधीच शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी मेंढपाळांच्या हस्ते केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पुतळा उभा करण्यात आला होता. जेजुरी गडावरील अहिल्याबाईंचा पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. पण कोरोना काळ असल्यानं त्याचं उद्घाटन हे रखडलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंचं वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद | पवारांकडून राणेंची खिल्ली
अमित शाह यांच्या पायगुणामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार जाईल, असे वक्तव्य करणारे भाजप खासदार नारायण राणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मिश्किल शैलीत समाचार घेतला.
4 वर्षांपूर्वी -
सीमावादावर हे शेवटचं हत्यार | आपण अंतिम पर्वाच्या दिशेने
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (२७ जानेवारी) ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचं आज प्रकाशन पार पडलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी सीमावादवर आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी सीमा भागातील संघर्ष आणि त्यांचा अनुभव सांगितला आहे. याशिवाय कर्नाटकात गेलेली मराठी भाषिक गाव महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी न्यायालयीन लढाई महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राने शहाणपणा दाखवावा | पंजाबला अस्वस्थेकडे नेण्याचं पाप मोदी सरकारनं करु नये
नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. आयटीओ येथे शेतकऱ्यांनी पोलिसांची व्हॅन, क्रेन ताब्यात घेतली आहे. त्यामुळे पोलीस या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करत आहे. शेतकरी आंदोलन अधिकच चिघळल्याने दिल्लीतील मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. शेतकरी लाल किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवल्याने संपूर्ण दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन | भाजपच्या नगरसेविका तनुजा मढवी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला नवी मुंबईत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती घड्याळ घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे. खरंतर, काही दिवसांवर महापालिका निवडणुका आल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर गणेश नाईक यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे | पण शेतकऱ्यांसाठी नाही - शरद पवार
आखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले.
4 वर्षांपूर्वी -
एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं आहे, असा टोला शरद पवार यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी मधुकर पिचड यांना लागवला आहे. माजी आमदार कै. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
कांहीना उगीच पोलिसांचा जथ्था सोबत घेवून फिरायची भारी हौस | आता त्यांना चांगली झोप लागेल
राज्य सरकारने पूर्ण विचाराअंती ज्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली, त्यांना केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवणे हे अत्यंत चुकीचेच आहे. हा राज्य सरकारच्या अधिकारामध्ये केलेला हस्तक्षेप आहे. या निर्णयामुळे ज्यांची सुरक्षा व्यवस्था राज्य सरकारने कमी केली होती, त्या नेत्यांना चांगली झोप तरी लागेल. कांहीना उगीच पोलिसांचा जथ्था सोबत घेवून फिरायची भारी हौस असते, असा टोला अप्रत्यक्ष टोला पवारांनी नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN