महत्वाच्या बातम्या
-
भाजप देशाला 'कमलस्तान' म्हणू लागेल तो दिवसही दूर नाही | ड्रॅगन फ्रूट नामांतरांवरून खिल्ली
गुजरातमध्ये ड्रॅगन फळाचं नामकरण झालं आहे. आता ड्रॅगन नावाचं फळ ‘कमलम’ नावानं ओळखलं जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंगळवारी ‘ड्रॅगन’ फळाचं नाव बदलून ‘कमलम’ करण्याचा निर्णय जाहीर केलाय.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्याला विरोध | स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास ५० दिवसांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. परंतु, या प्रकरणी अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे. सुप्रीम कोर्टाने याकडे लक्ष देत चार सदस्यीय समितीची देखील नेमणूक केली आहे. परंतु, या समितीसमोर जाण्यास आंदोलक शेतकऱ्यांनी नकाल दर्शवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशाच्या प्रमुखांनीही निवडणूक शपथपत्रात माहिती लपवली होती | पवारांचा भाजपाला टोला
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांसमोर रोकठोक भूमिका मांडली. जोपर्यंत आरोपांमधील सत्यता समोर येत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका घेत मुंबई पोलिसांवर आमचा संपूर्ण विश्वास आहे. ते या प्रकरणाचा योग्य तपास करतील, असं शरद पवार म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
सोनू सूदनं शरद पवारांची भेट घेतली | सध्या सोनू सूद विरुद्ध पालिका कोर्टात
अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोनू सूदनं भेट घेतली आहे. शरद पवार आणि सोनू सूद यांच्या भेटीबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नसून ही सदिच्छा भेट असल्याचं कळतंय. सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जूहू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमुळे चर्चेत आला होता. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची देखील सोनू सूदनं यापूर्वी भेट घेतली होती
4 वर्षांपूर्वी -
आता तरी शेतकऱ्यांचे हित पाहावे | पवारांचा मोदी सरकारला टोला
केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांवर आणि शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती. सुप्रीम कोर्टानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदे यावर तोडगा काढण्यास चार सदस्यांची समिती स्थापन करण्याचा आदेश कोर्टानं दिला आहे. शेतकऱ्यांनी मात्र संयुक्त समितीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेतून हकालपट्टी | नंतर शरद पवारांच्या उपस्थितीत महेश कोठे राष्ट्रवादीत
सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर कोठेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार का यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र, महेश कोठे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधले आहे. महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून सेना-राष्ट्रवादीत काहीसा तणाव होता. हा प्रवेश लांबण्याची शक्यता होती. परंतु अखेर खुद्द शरद पवारांच्याच उपस्थितीत महेश कोठे हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
‘इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून कोकणच्या विकासासाठी बांधील – उपमुख्यमंत्री
कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलतेची विपूलता असून जगाच्या पाठीवर संशोधन करणाऱ्या भारतीयांपैकी अनेक जण कोकणातील आहेत. कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटीव्ह’ संशोधनासाठी अनुकुल वातावरण व क्षमता आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार यांनी आज केली.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार कधीच पडणार नाही | ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल
राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांना कधीच यश मिळणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना देण्यात येणाऱ्या ईडीच्या नोटिसा म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीकाही पवारांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
राज्यांशी चर्चा न करताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटले | पवारांचं टीकास्त्र
नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा ३४वा दिवस आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी इतके दिवस मुक्काम ठोकला आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. उद्या ३० डिसेंबरला पुन्हा एकदा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आंदोलक शेतकऱ्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | 30 तारखेपर्यंत तोडगा निघतो का त्याची वाट पाहू | अन्यथा
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला तरी त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शरद पवारांनी शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला 30 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. 30 डिसेंबरपर्यंत तोडगा न काढल्यास विरोधी पक्षाला त्याचा विचार करावा लागेल, असा इशाराच पवारांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
यूपीएचं अध्यक्ष पद | थेट शरद पवार यांचीच स्पष्ट प्रतिक्रिया
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाचा मुद्दा सध्या देशातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव या पदासाठी चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेनं पवारांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं होतं. शिवसेनेच्या या तत्परतेवर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केल्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनीच या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे पारनेरचे आ. निलेश लंकेंच्या नैत्रुत्वात आत्तापर्यंत 30 ग्राम पंचायती बिनविरोध
महाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला होता. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
मेट्रो ३ कारशेड | शरद पवार मध्यस्थी करणार | चर्चेतून मार्ग काढणार
‘कांजूरमार्गची जमीन ही केंद्राची असेल नसेल हा वाद आपण सोडवू शकतो. केंद्रानं आणि राज्यानं मिळून चर्चेदरम्यान हा वाद सोडवला पाहिजे,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं आहे. याचवेळी मेट्रो कारशेडवरून सरकारला वेळोवेळी लक्ष्य करणाऱ्या विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांनी एक आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन | भाजप नेते कल्याणराव काळे यांची राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता
भारतीय जनता पक्षाचे नेते कल्याण काळे (BJP Leader Kalyanrao Kale) हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माहितीनुसार , सरकोली येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात कल्याण काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
केकसाठी झुंबड | मन खचून गेलं हे पाहून | ६० वर्षांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल ८० वा वाढदिवस (NCP President Sharad Pawar’s 80th Birthday) होता. त्यानिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला गावागावात पोहोचविण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. मात्र दुसरीकडे बीड मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आणि त्याची समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीला खेड्यापाड्यांत पोहोचवण्यासाठी पवारांनी सांगितला मास्टर प्लान | दिला हा सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस (NCP President Sharad Pawar’s 80th Birthday) आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला गावागावात पोहोचविण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. गावागावात आधुनिकता आणि विज्ञानाच्या विचारांची पिढी निर्माण करण्याचं काम आपल्या पक्षानं करायला हवं, असं शरद पवार म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
यूपीएच नेतृत्व | काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांकडूनही पवारांना समर्थन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar)यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने शरद पवार यांना विविध राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Former Chief Minister Sushilkumar Shinde) यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या असून मोठे विधान केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | पवार युपीएचे संभाव्य अध्यक्ष | संभ्रमाचं वृत्त रिपब्लिक TV'ने पसरवलं?
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जातं. तर दुसरीकडे सध्या देशात सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रपतींची भेट घेत नवे कृषी कायदे मागे घेण्याची रणनीती शरद पवार आणि सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांनी तयार केली आणि यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानीही भेट झाली.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवारांच्या यूपीए अध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा काल (१० डिसेंबर दिल्लीत रंगली होती. राहुल गांधी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने शरद पवार यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद सोपवलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील असा दावाही केला जात आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवार यूपीएचे चेअरमन होण्याची शक्यता | मोदी-शहांसमोर मोठी चाणक्य नीती?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचीही काँग्रेसची तयारी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याऐवजी यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार स्वीकारणार का, पंतप्रधानपदावर दावेदारी सांगण्याची काँग्रेसची मागणी पवार मान्य करणार का, याकडे सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN