महत्वाच्या बातम्या
-
थंडीच्या दिवसांत शेतकरी रस्त्यावर आहेत | हा प्रश्न मार्गी लावणं हे सरकारचं कर्तव्य
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षातील पाच नेत्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कृषी कायदा रद्द करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे, असंही विरोधकांनी राष्ट्रपतींना सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | शरद पवार, राहुल गांधींसहीत ५ दिग्गज नेते उद्या राष्ट्रपतींना भेटणार
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारवरचा दबाव वाढतो आहे. हा दबाव वाढविण्यासाठी विरोधी पक्षांचं एक शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार(NCP President Sharad Pawar), काँग्रेसकडून राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi), CPI (M)चे सीताराम येचुरी, CPIचे डी राजा आणि DMKचे टीकेएस एलनगोवन यांचा समावेश आहे. कोविड प्रोटोकॉलमुळे फक्त 5 नेत्यांनाच भेटीची परवानगी मिळाली आहे. शरद पवार यांनीही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली. या प्रश्नावर सर्व पक्ष मिळून भूमिका ठरविणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
नवा कृषी कायदा | शरद पवार उद्या दिल्ली विरोध पक्षांची बैठक घेणार
दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आजचा १३ वा दिवस आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या (९ डिसेंबर) सर्व विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक बोलावली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. यात भारतीय कम्यूनिस्ट पक्ष, काँग्रेस यांसह अनेक विरोधी पक्षाचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन सुरु | भाजपचे मोठे सहकारी पक्ष शरद पवारांच्या संपर्कात?
शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षासोबत त्यांच्या मोठ्या सहकारी पक्षांची देखील चिंता वाढली आहे. जेथे भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला सांभाळून घेतलं नाही तेथे आपला निभाव काय लागणार अशी चिंता सहकारी पक्षांना देखील लागली असावी. महाविकास आघाडीचा देखील आत्मविश्वास दुणावल्याचं पाहायला मिळत आहे. एका धक्क्यातून भारतीय जनता पक्ष सावरण्याआधीच पवार नीती काम करू लागल्याने ‘लोटसचं ऑपरेशन सुरु’ झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवारांच्या ‘त्या’ पत्रावर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण | पण भाजपने संधी साधली
देशभरात शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. गेले १२ दिवस दिल्लीत आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून उद्या ८ डिसेंबरला पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. “शेतकऱ्यांचे सध्या सुरू असलेले आंदोलन केंद्रातील भाजप सरकारने गांभीर्याने घ्यावे, अन्यथा ते दिल्लीपुरते सीमित न राहता त्याची व्याप्ती देशभर पसरेल,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (६ डिसेंबर) दिला होता. यादरम्यान समाज माध्यमांवर शरद पवारांची जुनी पत्रं व्हायरल झालं असून याच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतात पुरवठा तसेच १८ देशांना पंजाब-हरियाणातून गहू-तांदूळ निर्यात होतो | केंद्रानं शहाणं व्हावं
मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील हट्टाला पेटल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. समाज माध्यमांवर देखील शेतकरी आंदोलनाविरुद्ध ट्रेंड सुरु करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवारांचं सांगणं हे मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवं | संजय राऊतांची प्रतिक्रिया
काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या बाल व महिला कल्याण मंत्री यशोमती ठाकूर (MahaVikas Aghadi minister Yashomati Thakur) यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकार स्थिर चालवायचं असेल तर आमच्या नेत्यावरील टीका टाळा, असा थेट इशारा यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Udhav thackeray ) त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांचा नामोल्लेख न करता दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
नागरपूची जागा कधीच मिळाली नव्हती, तीही जिंकलो | सर्वसामान्यांनी महाविकासआघाडीला स्वीकारलं
राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या मतदारसंघात एकूण ६२ उमेदवार होते.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसजनांमध्ये गांधी परिवाराबाबत आस्था | पण राहुल गांधींमध्ये सातत्याचा थोडा अभाव
१२ डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांच्याबाबत विचारण्यात आले असता शरद पवार म्हणाले की, कुठल्याही राजकीय पक्षामध्ये त्याच्या नेतृत्वाची मान्यता पक्षसंघटनेत आणि लोकांमध्ये किती आहे, हे पाहणं आवश्यक असतं. आज काँग्रेसमध्ये रँक अँड फ्रँकची स्थिती लक्षात घेतली तर अजूनही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसजनांमध्ये (Congressmen still have faith in the Gandhi-Nehru family) आहे. सोनियाजी काय किंवा राहुल गांधी काय हे दोघेही त्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत असल्याने पक्षातील बहुसंख्य लोक त्यांच्या विचाराचे आहेत आणि ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
आज कोरोना लस'चा आढावा | मोदींच्या दौऱ्याला इव्हेंटचं स्वरूप
राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी पुण्याच्या सीरम इन्स्टीट्युटला भेट देऊन वैज्ञानिकांच्या प्रगतीचा आढावा घेतला होता. एकूण पुण्यात, पश्चिम महाराष्ट्रात आणि समस्त राज्य व देशात एक अनुभवी राजकीय नेते म्हणून सर्वश्रुत असलेल्या शरद पवारांनी प्रथम एखाद्या कोरोना लस संदर्भात आढावा घेतल्याने देशभर वृत्त पसरलं होतं. मात्र कोरोना लॉकडाऊनच्या सुरुवातीला मोदींनी ज्याप्रमाणे आपत्ती उत्सव असल्याप्रमाने इव्हेन्ट केले होते. मात्र आता भारतासहित जगभर कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या बातम्या फिरू लागल्याने मोदी पुन्हा इव्हेंटसाठी सज्ज झाल्याचं जाणार अंदाज व्यक्त करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार असल्याचं माहिती नव्हतं | त्यांचा हा गुण माहिती नव्हता - पवार
दरम्यान शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी त्यांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही | म्हणून केंद्रातील सत्तेचा गैरवापर - शरद पवार
ठाण्यातील आमदार आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक (shiv sena mla pratap sarnaik) यांच्या घरी आणि कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालय (ईडी)च्या टीमने छापा टाकला आहे. (raided by officials of enforcement directorate) तसंच प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरी देखील छापा टाकण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवारांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही | नांदगावकरांचं टीकास्त्र
वाढीव वीजबिल माफ करावं म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर पवारांना निवेदनही दिलं. त्यावेळी पवारांनी या संदर्भात राज्य सरकारशी चर्चा करतो म्हणून आश्वासनही दिलं. मात्र, त्यानंतरही काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही, असं आम्हाला वाटतंय, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्यामुळे शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द | काय आहे कारण?
एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर भाजपाला धक्के देण्यास सुरुवात केली होती. काही दिवसातच त्यांनी भाजपचे अनेक पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणलं आणि भारतीय जनता पक्षाला खान्देशात राजकीय धक्के देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता शरद पवार देखील खान्देशात राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी सज्ज झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
मिशन पक्षविस्तार | शरद पवार २०-२१ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर भाजपाला धक्के देण्यास सुरुवात केली होती. काही दिवसातच त्यांनी भाजपचे अनेक पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणलं आणि भारतीय जनता पक्षाला खान्देशात राजकीय धक्के देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता शरद पवार देखील खान्देशात राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी सज्ज झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
आईच्या आठवणींनी शरद पवार गहिवरले | पत्र लिहून भावना व्यक्त
राजकारणाच्या आखाड्यात भल्याभल्यांना मात देणारे व महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणातही आपला दबदबा राखणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाचा पाया त्यांच्या आईनेच अर्थात शारदाबाई पवार यांनी रचला होता. हार न मानता, खचून न जाता झुंजण्याचे बाळकडू पवार यांना त्यांच्या आईकडूनच मिळाले. त्याचे स्मरण करत शरद पवार यांनी एक भावनिक पत्र आपल्या दिवंगत आईला लिहिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवारांकडून पंकजा मुंडेचं कौतुक | पवारांच्या गुगलीने भाजपाची डोकेदुखी वाढली
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचं कौतुक करून 24 तास होत नाहीत तोच पवारांनीही पंकजा मुंडे यांचं कौतुक (Sharad Pawar praised Pankaja Munde) केलं आहे. पंकजा या चांगलं काम करत आहेत असं पवारांनी नाशिक मध्ये म्हटलं आहे. ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर बैठक असल्याने त्या पुण्यातल्या बैठकीत हजर होत्या. त्यांचं या विषयात काम आहे आणि त्या चांगलं काम करत आहेत असंही पवारांनी म्हटलं आहे. पवारांच्या या कौतुकामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आहे | पवारांकडून फिरकी
राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते, बुधवारी रात्री उशिरापर्यंत उद्धव ठाकरे आणि जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु होती, रात्री १० वाजता सुरु झालेली बैठक तब्बल १ वाजता संपली.
4 वर्षांपूर्वी -
जीवनावश्यक यादीतून कांदा वगळला मग कारवाई का | पवारांचा केंद्राला सवाल
धाडी, आयात, निर्यात हे सर्व निर्णय केंद्र सरकारच्या अधिकारात आहेत. मात्र, जीवनावश्यक यादीतून कांदा वगळला मग कारवाई का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला खडसावलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
काल पंकजा मुंडेंशी मतभेद | आज भाजपा आ. सुरेश धस यांना पवारांसोबतच्या बैठकीत प्रवेश
२१ रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली तर कोयता उचलून तोडणीला जाण्याचे पंकजा मुंडे (BJP Ex MLA and Minister Pankaja Munde) यांनी काल आदेश दिले होते. मात्र दुसरीकडे या घोषणेला विरोध करत भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांनी १५० टक्के वाढ झाल्याशिवाय एकही मजूर जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. ऊसतोड मजुरांच्या आंदोलनात (Sugarcane worker) फूट पडल्याचं चित्र होतं. कारण या प्रश्नावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने-सामने आल्याचं काल पाहायला मिळत होतं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा