महत्वाच्या बातम्या
-
अजितदादा नाराज आहेत | पवार म्हणाले अरे कशाला नाराज...
भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनीराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही आणि सर्व मंत्री फिल्डवर | सर्वांनी दिलेल्या जबाबदारीप्रमाणे मुख्यमंत्री काम करीत आहेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर का पडत नाहीत? असा प्रश्न विरोधकांनी उचलून धरत टीका केली होती. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे. करोना संकटात मुख्यमंत्र्यांना एका ठिकाणी बसण्याची विनंती केली आणि आढावा घ्यायला सांगितला, इतर मंत्री फिल्डवर होते, आम्ही दिलेल्या जबाबदारीप्रमाणे मुख्यमंत्री काम करीत आहेत, असे पवार म्हणाले. तुळजापूरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना मदत पुरवण्यात राज्य सरकारला मर्यादा | केंद्रानंही सहकार्य करावं
राज्यात परतीच्या पावसानं प्रचंड हाहाकार उडवला. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान झालं. अनेक शेतमाल पुरात वाहून गेला, तर शेतात उभी असलेली पिकं सडून गेली. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पवार यांनी सकाळी तुळजापूर-परंडा तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली.
4 वर्षांपूर्वी -
पवार पावसात भिजले | आणि भाजपचं सत्तेचं स्वप्न गारटलं | त्या सभेची वर्षपूर्ती
महाराष्ट्राची १४ वी विधानसभा निवडणुक अनेक अर्थांनी प्रचंड गाजली. या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत केलेले पक्षांतर, या पार्श्वभूमीवर ढवळून निघालेले राज्यातील राजकारण, दिग्गज राजकीय नेत्यांचे एकमेकांवरचे टोकाचे आरोप-प्रत्यारोप, भाजप-शिवसेनेची वाढलेली ताकद, अन्य पक्षांची अस्तित्त्वाची लढाई असे बरंच काही या निवडणुकांच्या अनुषंगाने पाहायला मिळाले. याचदरम्यान, प्रचंड गाजली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातली प्रचारसभा. आज शरद पवारांच्या या प्रचारसभेला वर्ष पूर्ण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांच्या पत्रातील राजकीय भाषेवरून पवार संतापले | थेट पंतप्रधानांकडे तक्रार
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे सोमवारी एक पत्र लिहिलं. या पत्रातून त्यांनी राज्यातील मंदिरं पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. अतिशय खरमरीत रोखानं लिहिलेल्या या पत्रात त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला.
4 वर्षांपूर्वी -
अखेर खडसे पवार भेटीच्या वृत्तावर स्वतः शरद पवारांनी खुलासा केला
पक्षांतर्गत अन्याय झाल्यामुळे नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. खडसे आज बुधवारी मुंबईत असल्याने ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार यांच्या भेटीच्या शक्यतेचा खडसे यांनी इन्कार केला असला तरी राजकीय गोटात खडसेंची मुंबईवारी चर्चेचा विषय ठरली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी सिरमची लस घेतली | पण ती कोरोनाची नव्हे | पवारांचं स्पष्टीकरण
मी घेतलेली लस करोनाची नाही असं म्हणत सिरममध्ये जाऊन घेतलेल्या लशीवर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र मी आणि माझ्या स्टाफने घेतलेली लस ही करोनावरची नसून प्रतिकार शक्ती वाढवणारी आहे. कोविडवरची लस येण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत वेळ लागेल असं सिरमकडून सांगण्यात आल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. लोकांना वाटते की मी लस घेतली आहे. अशी चर्चा लोकांमध्ये खासगी असते की सिरमचे प्रमुख पवारांचे वर्ग मित्र आहे. त्यामुळे त्यांनी ती लस घेतली असेल असं लोक बोलतात. पण मी आणि माझ्या स्टाफने घेतली लस ही करोनावरची नाही तर प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO - संजय राऊत आणि फडणवीसांच्या भेटीवर शरद पवारांची प्रतिक्रिया
तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडली. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत गुप्त भेट झाली. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये तब्बल २ तास ही भेट झाल्याचं सांगण्यात आलं. दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ही भेट झाल्याचं सांगण्यात आलं. TV9 मराठीने याबाबत वृत्त दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी सावध | शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी पोहचले
शनिवारची संध्याकाळ महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळासाठी खळबळ उडवून देणारी ठरली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते व मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यात अचानक झालेल्या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोन्ही नेत्यांच्या भेटीनं वेगवेगळ्या चर्चांचे पेव फुटले आहेत. संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या भेटीवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. या भेटीत त्यांनी संजय राऊत यांना घातलेल्या अटींचाही उल्लेख केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेकडून मित्रपक्ष राष्ट्रवादीसाठी नमती भूमिका | राष्ट्रवादीला मोठ्या भावाचा मान
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर आता स्थानिक निवडणुकीत वाद होऊ नये म्हणून नमती भूमिका घेत एकमेकांना मदत करत भाजपला बाजूला सारत आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीतही शिवसेनेकडे संख्याबळ असूनही राष्ट्रवादीला मोठ्या भावाचा मान दिला.
4 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक
भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील एक मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक सुरु आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील, गुलाबराव देवकर उपस्थित आहे. या बैठकीत हा नेता राष्ट्रवादीत आल्यावर त्याचा काय फायदा होऊ शकतो याबाबतची चाचपणी केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये शरद पवार यांच्याकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचे समजते.
4 वर्षांपूर्वी -
कृषी उत्पादनांच्या खुल्या बाजारपेठेबद्दल सांगता | मग कांद्या निर्यात बंदी का करता
कृषी विषयक विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ घातल्याने निलंबित झालेले आठ खासदार अन्नत्याग केला आहे. आज दिवसभर मीही अन्नत्याग करुन त्यांच्या अभियानात सहभागी होणार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी राज्यसभेच्या उपसभापतींसह केंद्र सरकारच्या कृषी धोरणावरही प्रश्न उपस्थित केले. एकाबाजूला केंद्र सरकार कृषी उत्पादनांच्या खुल्या बाजारपेठेबद्दल सांगतं मात्र दुसऱ्या बाजूला कांद्या निर्यात बंदी करत हे चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे | पवारांचा विरोधकांना टोला
कृषी विषयक विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ घातल्याने निलंबित झालेले आठ खासदार अन्नत्याग केला आहे. आज दिवसभर मीही अन्नत्याग करुन त्यांच्या अभियानात सहभागी होणार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी राज्यसभेच्या उपसभापतींसह केंद्र सरकारच्या कृषी धोरणावरही प्रश्न उपस्थित केले.
4 वर्षांपूर्वी -
निलंबित राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवार देखील दिवसभर अन्नत्याग करणार
कृषी विषयक विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ घातल्याने निलंबित झालेले आठ खासदार अन्नत्याग केला आहे. आज दिवसभर मीही अन्नत्याग करुन त्यांच्या अभियानात सहभागी होणार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी राज्यसभेच्या उपसभापतींसह केंद्र सरकारच्या कृषी धोरणावरही प्रश्न उपस्थित केले.
4 वर्षांपूर्वी -
कांदा निर्यात बंदीने राज्य भाजपचीही कोंडी | पवारांसोबत दानवे पंतप्रधानांची भेट घेणार
केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात बंदी घोषित केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी याचा विरोध केला आहे. कांदा उत्पादकांना याचा जबर फटका बसणार असल्यानं महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांसह भाजपातील नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आता, केंद्रीयमंत्री आणि भाजापा नेते रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली आहे. या प्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचं दानवेंनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
तिच्या वादग्रस्त वक्तव्यांना महत्व देण्याची गरज नव्हती | पालिकेच्या कारवाईने पब्लिसिटी मिळाली
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने मुंबईची तुलना पाकिस्तानसोबत केल्यानंतर, तसंच मुंबई पोलिसांवरील तिच्या वक्तव्यानंतर, अनेक माध्यमातून कंगनावर टीका होत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच वक्तव्य केलं आहे. अशा वक्तव्य करणाऱ्यांना आपण अधिक महत्त्व देतोय, अशी वक्तव्य लोक गांभीर्याने घेत नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतीय उपखंडात चीनच्या गुप्त हालचाली | नेपाळ आणि श्रीलंका'वर लक्ष ठेवा
लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. भारताने श्रीलंका आणि नेपाळमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. तसेच चीनच्या घुसखोरीवरही नजर असली पाहिजे. भारतीय उपखंडात चीनच्या गुप्त हालचाली सुरु आहेत. हा प्रदेश चीन सर्व बाजूंनी घेरत आहे. दक्षिण चीनच्या समुद्रातील चिनी नौदलाची उपस्थिती हा चिंतेचा विषय असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव, ४ कर्मचारी पॉझिटिव्ह
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय. बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज ही संख्या ४७३ झाली आहे. ५००च्या जवळपास पोहोचली आहे. पवारांच्या घरी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे शेतात, बागेत काम करणारे कर्मचारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरणाचा तपास CBI'कडे | यापूर्वीच्या तपासांची पवारांकडून केंद्राला आठवण
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय या केंद्रीय संस्थेकडे सोपविण्याचा निर्णय दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला खात्री आहे की, अभिनेता सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी महाराष्ट्र सरकार सीबीआयला पूर्ण सहकार्य करेन. मात्र सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपाससारखा होऊ नये, असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा