Shares Buying Selling T+1 | शेअर बाजारातील ट्रेडिंगचे नियम बदलणार, सेबी लवकरच नवीन प्रणाली लागू करण्याच्या तयारीत, डिटेल वाचा
Shares Buying Selling T+1 | स्टॉक मार्केट ट्रेडिंग अधिक सोपी होणार आहे. 27 जानेवारी 2023 पासून भारतीय शेअर बाजारात डील सेटलमेंटसाठी T + 1 प्रणाली लागू केली जाणार आहे. यामुळे शेअर्समध्ये होणारी खरेदी-विक्रीची सेटलमेंट डील लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 तासांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात T + 3 प्रणाली कार्यरत आहे. त्यामुळे व्यवहार प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 3 दिवस लागतात. सुरुवातीला लार्ज कॅप आणि ब्लू चिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये T+1 ही प्रणाली लागू होईल, म्हणजेच चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना याचा लाभ आधी मिळेल आणि त्यानंतर हळूहळू सर्वांसाठी या प्रणालीची अंमलबजावणी केली जाईल. T+1 प्रणालीने लहान गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे अधिक आकर्षित होतील. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, T+1 व्यवस्थेमुळे FPI द्वारे टॉप कंपनीच्या शेअरचे ट्रेडिंग व्होल्युम प्रभावित केले जाण्याची शक्यता आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Share Price | Stock Price | BSE | NSE | Shares Buying Selling T+1)
2 वर्षांपूर्वी