Shivsena Dasara Melava | शिवसेनेच्या राजकारणात भाषण गाजवणारा नेता अशी एकनाथ शिंदेंची ओळख कधीच नव्हती, तर लोकं चॅनल बदलतील
Shivsena Dasara Melava | मुंबई शिवतिर्थावर आणि मुंबई बीकेसीत एकाच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे भाषण सुरु झाले तर आपण कुणाचे भाषण ऐकणार? असे पोल घेण्याचा सपाटा सध्या अनेक वृत्तवाहिन्यांचा अधिकृत युट्युब चॅन्सलवर विचारला जातोय, जेथे लाखो-करोडोत फॉलोअर्स आहेत. त्यात जवळपास सर्वच चॅनेल्सवर ९२-९५ टक्के लोक उद्धव ठाकरे यांना पसंती देत आहेत. बरं, या वाहिन्यांवर भाजप, शिवसेना, मनसे, भाजप आणि शिंदे समर्थक देखील फॉलो करतात तरी त्यात शिंदेंच्या भाषणाला ७-८ टक्के पसंती मिळत आहे हे विशेष म्हणावे लागेल. त्यातही जर बीकेसीला सणासुदीच्या दिवशी आर्थिक आमिष दाखवून घरून ओढून-ताणून आणलेल्या लोकांनी खुर्चीत बसून मोबाईलवर शिवाजी पार्कचं भाषण ऐकलं नाही तर नवल वाटायला नको. कारण शिंदेंच्या रटाळ भाषण शैलीमुळे लोकं कसे निघून जातात याचा प्रत्यय जळगावात कॅमेऱ्यात कैद झाला होता. मात्र विषय तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे का?
2 वर्षांपूर्वी