महत्वाच्या बातम्या
-
हे छापे नसून, केवळ झाडाझडती आहे | ईडीचं स्पष्टीकरण
विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक निघून गेलं आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबई घेऊन येण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांजवळ सर्च ऑपरेशन सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे. तसेच काही राजकारण्यांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना राणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आरोप – प्रत्यारोप केले होते. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केल्याची चर्चा आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी प्रकरण | आ. प्रताप सरनाईकांची होती मोठी भूमिका - सविस्तर वृत्त
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ईडीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही.
4 वर्षांपूर्वी -
CBI'वर निर्बंध | शिवसेनेविरोधात ED अस्त्राची चर्चा | आ. प्रताप सरनाईकांच्या घरी धाड
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ईडीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही.
4 वर्षांपूर्वी -
आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा | कराचीचं नंतर बघू | फडणवीसांना टोला
‘कराची स्वीट्स’ (Karachi Sweets) या दुकानाच्या नामांतराची एका शिवसैनिकानं केलेली मागणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला जोरदार टोला हाणला आहे.
4 वर्षांपूर्वी -
फसलेल्या 'मी पुन्हा येईन' टीमला पहिल्या वर्धापनदिनी माझ्याकडून श्रद्धांजली | खोचक ट्विट
‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन..’ हे वाक्य आणि देवेंद्र फडणवीस यांना जेवढं ट्रोल केलं गेलं, तेवढं कदाचित कुणालाच ट्रोल केलं गेलं नसेल. असा एकही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसेल ज्यावर याचं पारायण झालं नसेल. त्यावर स्वतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं होतं. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन..’ बद्दल खुलासा केला होता.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण पत्री पूल गर्डर लॉचिंग | अखेर आगामी KDMC महानगरपालिकेचा इव्हेन्ट पूर्ण
दोन वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाला गती आली आहे. तुळई बसविणे आणि अन्य कामे डिसेंबरअखेपर्यंत पूर्ण करून जानेवारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या पुलावसाठीची तुळई दोन दिवसांत ६० मीटरने पुढे ढकलण्याचे काम साडेसात तासांच्या मेगाब्लॉकमध्ये शनिवार आणि रविवारी करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचे प्रयत्न सुरू | वनमंत्र्यांचा दावा
सत्ताधारी असताना देखील आज राज्य सरकारला त्रास होत आहे. मी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात असल्याने मला सर्व माहिती आहे. परंतु ते सर्व जाहीरपणे सांगता येणार नाही, परंतु उद्धवजी ठाकरेंना देखील प्रचंड त्रास होत आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचे प्रयत्न सुरू आहे,’ असा मोठा आणि खळबळजनक दावा महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण पत्रीपूल | चीन जेवढ्या वेळेत हायवे आणि धरणं उभारतं | पण शिवसेना...
फेब्रुवारी २०२० पर्यंत कल्याणचा पत्रीपूल सुरू होणार, इतकंच नाही तर या पुलाच्या बाजूला आणखी एक नवा पूल उभारणार असल्याची पोश्टरबाजी शिवसेनेने २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत केली होती. म्हणजे कोरोनाची देशात कल्पनाही नसताना त्यापूर्वी पत्रीपूल पूर्ण होणार होता असं वचन शिवसेनेने दिलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली होती. पूल जीर्ण झाल्याने नोव्हेंबर 2018 मध्ये हा पूल पाडण्यात आलेला.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड तर, त्यांच्या चिरंजीवांना पब-बारची जास्त चिंता आहे - आ. शेलार
राज्यात ‘अनलॉक’च्या प्राधान्यक्रमावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. ‘मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड तर, त्यांच्या चिरंजीवांना पब, बारची चिंता जास्त आहे,’ असा आरोप शेलार यांनी केला. विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्तानं शेलार पुण्यात आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
लव्ह जिहाद हा भाजपचा अजेंडा | लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे - महापौर
उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने, या पार्श्वभूमीवर लवकरच लव्ह जिहाद विरोधात कठोर कायद्याची निर्मिती केली असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. त्यानंतर हरियाणा व कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मध्यप्रदेश सरकारदेखील आता लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीतील भाजप मधील नेतेमंडळी हा कायदा राज्यात आणावा यासाठी पुढे आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग | पण श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार
भारत-चीन सीमेवर मागील काही महिन्यांपासून तणाव निर्माण झाला आहे, अशीच परिस्थितीत पाकिस्तानच्या सीमेवर प्रामुख्याने काश्मीरमध्ये आहे. यावेळी भारताने पाकिस्तानप्रमाणे चीनला दम देण्यापेक्षा कृतीची गरज असल्याचा सल्ला शिवसेनेने केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला दिला आहे. दरम्यान भारत-पाक सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान शहीद झाले, त्यापैकी दोन जवानांच्या तिरंग्यात लपेटलेल्या शवपेट्या महाराष्ट्रात आल्या. या शवपेट्या जवानांच्या गावी पोहोचल्या तेव्हा महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे पुढारी काय करीत होते? ते मुंबईत छठपूजेची मागणी करीत होते. त्यातले काही मंदिरे उघडा, मंदिरे उघडा असे शंख फुंकत होते, तर काही जण मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्यासाठी प्रेरणादायी भाषणे ठोकीत होते.
4 वर्षांपूर्वी -
भाजपला केवळ मुंबईतल्या आर्थिक उलाढाल, शेअर बाजारात आणि जमिनींत रस | शिवसेनेचं प्रतिउत्तर
मुंबई महापालिकेची निवडणूक २०२२ (Mumbai Municipal Corporation Election 2022) मध्ये होणार असून मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकवण्याचा निर्धार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (State Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी बोलून दाखवल्यानंतर त्यावर महाविकास आघाडीतील पक्षांकडून देखील तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या या निर्धाराची खिल्ली उडवली आहे तर काँग्रेसने देखील या निमित्ताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कराची स्वीट्स | दोन पक्षातील दोन 'संजय दृष्टी'चे विचार शिवसैनिकाविरोधात जुळले
मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचं नाव बदला अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनीच नितीन नांदगावकरांच्या भूमिकेला फाटा देत, अशा प्रकारची आता मागणी करण्यात काहीच तथ्य नसल्याचे सांगितलं आहे. याचबरोबर ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे कराची बेकरीचं नाव बदलण्याच्या मुद्यावरून आता शिवसेनेतच मतभिन्नता असल्याचं उघडपणे समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवारांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही | नांदगावकरांचं टीकास्त्र
वाढीव वीजबिल माफ करावं म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर पवारांना निवेदनही दिलं. त्यावेळी पवारांनी या संदर्भात राज्य सरकारशी चर्चा करतो म्हणून आश्वासनही दिलं. मात्र, त्यानंतरही काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही, असं आम्हाला वाटतंय, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
माझे लाईट बील माझी जवाबदारी | समाज माध्यमांवर शिवसेनेची फिरकी
लॉकडाऊनच्या काळात आलेली वाढीव वीज बिले माफ केली जाणार नाहीत, असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून सत्तारुढ आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. तत्पूर्वी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यासाठी त्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम राबवण्याबाबत सांगितलं होतं. १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबविण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता याच मोहिमेच्या टॅगलाईन बदलून महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेला समाज माध्यमांवर लक्ष करण्यास सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
वचन वीजबिल | हीच ती वेळ म्हटल्यानंतर काय वेळ आली? सविस्तर वृत्त
लॉकडाऊनच्या काळात आलेली वाढीव वीज बिले माफ केली जाणार नाहीत, असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून सत्तारुढ आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. महावितरणची आजवरची एकूण थकबाकी ५० हजार कोटींच्या घरात जाण्यास आधीचे भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला. ‘आधी घोषणा करता मग घूमजाव करत तोंड लपवता, ताकद असेल तर वीज बिल माफ करून दाखवा, असे आव्हान विधानसभेचे विरोधी पक्षेनते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
4 वर्षांपूर्वी -
एक बोगस आचार्य पुढे करून मंदिरांचे टाळे उघडण्यासाठी आंदोलन केले - शिवसेना
‘गेल्या आठ महिन्यांपासून केंद्र सरकारच्या आदेशानुसारच सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं बंद होती. त्यामुळं भारतीय जनता पक्षामधील उपऱ्या व नाच्या हिंदुत्ववाद्यांनी मंदिरे उघडा असं आंदोलन पंतप्रधान मोदी यांच्या घरासमोरच करायला हवं होतं. पण, ते महाराष्ट्रात ढोल-ताशे वाजवून बिनबुडाचे राजकारण करत आहेत. यातून महाराष्ट्राचं नुकसान होत आहे,’ अशी खरमरीत टीका शिवसेनेनं केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
उपऱ्या व नाच्या हिंदुत्ववाद्यांनी मंदिरे उघडा आंदोलन पंतप्रधानांच्या घरासमोर करायला हवं होतं
राज्यातील मंदिर उघडण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतल्यापासून नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. आमच्या दबावामुळंच सरकारनं हा निर्णय घेतल्याचं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे. भारतीय जनता पक्षाचे राम कदम, प्रवीण दरेकर यांसारख्या काही नेत्यांनी मंदिरांमध्ये जाऊन याचा आनंद साजरा केला. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून या नेत्यांवर तोफ डागली आहे. ‘भारतीय जनता पक्षाला नक्की काय झालं आहे? महाराष्ट्रातील त्या पक्षाचं डोकं सरकलं आहे का? असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.
4 वर्षांपूर्वी -
वीज बिलात ना माफी ना सूट | शिवसैनिकांचं 'ते' चड्डी बनियन आंदोलन देखील वाया
महावितरणने अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठवल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी जुलै महिन्यात महावितरणवर चड्डी बनियन मोर्चा काढला. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊनमुळे आमच्या अंगावर केवळ चड्डी बनियन उरलीय, तुमचे बील कुठून भरणार? असा सवाल महावितरणच्या अधिकाऱ्यांना केला होता. राज्यात शिवसेना आघाडीची सत्ता असतानाही शिवसैनिकांनी हा सवाल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांच्या स्मारकावरून मनसेचा सवाल | तर शिवसेनकडूनही प्रतिउत्तर
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray) यांचा आज आठवा स्मृतीदिन. या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब आज आपल्यात नसले तरीही त्यांची वादळी राजकीय कारकिर्द आणि राजकारणातील त्यांचं योगदान हे कायमच अग्रस्थानी राहील. अशा या नेत्याच्या काही स्मृतींना शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तून उजाळा देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल