महत्वाच्या बातम्या
-
खोट्या घोड्यावर बसत | दुसऱ्याच्या स्क्रिप्ट वाचल्याने कोणी झाशीची राणी होत नाही - आदेश बांदेकर
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतच्या मुंबई वक्तव्यावरुन राज्यभरात वातावरण पेटलं आहे. मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं होत असून कंगनाविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. कंगनाला मुंबईमध्ये पाय ठेवू देणार नाही असा धमकीवजा इशारा बीडच्या शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशात शिवसेनेचे नेते रमेश साहू यांची गोळ्या घालून हत्या
मध्य प्रदेशातील शिवसेनेचे नेते रमेश साहू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपींनी केलेल्या गोळीबारात साहू यांची पत्नी व मुलगी जखमी झाली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरू पोबारा केला. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद शिवसेनेतील मोठ्या पदाधिकाऱ्यांचा सेनेला जय महाराष्ट्र | मनसेत जाहीर प्रवेश
कोरोनाच्या ब्रेकनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे राज यांनी औरंगाबादेत शिवसेना दे-धक्का दिला आहे. औरंगाबाद शिवसेनेत उपशहर प्रमुख, जिल्हा संघटक अशी पदे भूषवलेल्या सात बड्या शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीकडून गळचेपी | शिवसेना खा. संजय जाधव यांचा राजीनामा | नार्वेकरांची शिष्टाई
राज्यात महाविकास आघाडीचं तीन पक्षांचं सरकार आहे. मात्र या तीनही पक्षांमध्ये राष्ट्रवादीचाच सर्वात जास्त दबदबा असल्याची कायम चर्चा असते. शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या राजीनाम्यामुळे त्याची चर्चा आता जोरात सुरु झालीय.जाधव यांच्या परभणी मतदार संघात येणाऱ्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचं अशासकीय मंडळ असावं असा प्रयत्न जाधव करत होते. 8 ते 10 महिने प्रयत्न केली मात्र शिवसेनेचं नाही तर राष्ट्रवादीचं प्रशासकीय मंडळ नियुक्त केलं गेलं.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील मंदिरं उघडा | शिवसेनेची सामनातून मागणी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व मंदिरं दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून लॉकडाऊन पाळण्यात येत असल्याने अनेक उद्योगधंद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातचं देशातील मंदिरांवर असंख्य लोकांची उपजीविका अवलंबून आहे. मंदिरांचंही एक अर्थकारण असतं. कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न मंदिरं आणि इतर प्रार्थनास्थळं सोडवत असतात. त्यामुळे मंदिरं सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना आमदाराने उभारलेला नित्कृष्ट दर्जाचा लाकडी कृत्रिम तलाव कोसळला
भांडुपमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून मुंबईत पहिल्यांदाज लाकड़ी साहित्य वापरून कृत्रिम तलाव उभारण्यात येत असल्याचे सांगून आमदार रमेश कोरगावकर यांच्या हस्ते भूमिपूजनाचा नारळ फुटला. मात्र, उभारणीच्या दुसऱ्याच दिवशी हा कृत्रिम तलाव कोसळल्याने लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. विशेष म्हणजे यात सेनेच्या स्थानिक पदाधिकारीकडून या कामाचे कंत्राट घेण्यात आले होते. यासाठी चार लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्याचे समजते. या कामामुळे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये अनेक हत्या, खून झाले | त्यातील किती आरोपी सीबीआयनं पकडले?
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार नाही. सर्वोच्च न्यायालयानं काल या प्रकरणी निकाल दिला. त्यामुळे राज्य सरकारला धक्का बसल्याचं मानलं जात आहे. याबद्दल शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. बिहारमध्ये अनेक हत्या, खून झाले. त्या प्रकरणांमधील किती खरे आरोपी सीबीआयनं पकडले?, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेनं सामनामधून सीबीआयच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामीवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी
पालघर येथील साधुंचा झुंडबळी तसेच वांद्रे स्थानकाबाहेरील स्थलांतरितांची गर्दी याबाबत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते रद्द करण्याच्या मागणीसाठी गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गोस्वामी यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे सकृतदर्शनी दिसून येते, असे नमूद करत न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने कारवाईस स्थगिती दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
सेना नगरसेवकाकडून ब्रिटनमधील बोट रुग्णवाहिकेचा फेक फोटो ट्विट | खासदाराकडूनही अभिनंदन
रायगडकरांचे स्पीड बोट रुग्णवाहिकेच स्वप्न अखेर पुर्ण होणार आहे. राज्य सरकारने अलिबागमधील मांडवा ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडीया दरम्यान बोट रुग्णवाहिका सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. आरोग्य विभागाने नुकतेच याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत,अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली ९ ऑगस्ट रोजी दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
पक्षाची धुरा संभाळणाऱ्यांना अनेकदा कटू बोलावे लागते | सेनेकडून पवारांचं समर्थन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार याच्या भूमिकेवरुन जाहीर भाष्य केले. त्यानंतर पार्थ कमालीचा नाराज झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी बहीण खासदार सुप्रिया सुळे गेल्यात. त्यांच्यात काय चर्चा झाली ती पुढे आलेली नाही. पार्थ हे अजित पवार यांचे चिरंजीव. लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने पार्थसह अजितदादा नाराज होते. त्यानंतर मोठे राजकीय नाट्य घडले होते. त्यावेळी अजित पवार यांची समजूत काढत मनधरणी केल्याचे अख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आताही शरद पवार यांनी नातू पार्थ याला शाब्दीक फटकरल्यानंतर कटुतेची भावना वाढीस लागली. यावरुन दोन दिवस बैठका होत आहेत. आता शिवसेनेने पार्थ पवार लहान आहेत. ते राजकारणात नवीन आहेत, असे सांगत शरद पवार वेगळ वागले नाहीत, असे शिवसेने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
हे काय? खासदार अदाणींच्या सौजन्याने वस्तू वाटप करतात | आमदारांचे अदाणी विरोधात मोर्चे
कोरोनाकाळात सर्वसामान्यांची आर्थिक गणिते कोलमडली असतानाच, अवाच्या सवा दराने आलेल्या वीज देयकांमुळे महावितरणविरोधात सध्या राज्यभर तीव्र नाराजी पसरली आहे. वाढीव वीज बिलाची चर्चा संपूर्ण राज्यात सुरु असून त्याबद्दल सरकार आणि वीज मंडळांविरोधात संतापाचं वातावरण आहे, कारण लाखो ग्राहकांना नेहमीपेक्षा तिप्पट बिल आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
परप्रांतीयांसमोर शिवसैनिक हैराण | कधी पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ | कधी डोकी फोडत आहेत
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उत्तर भारतीय कार्यकर्ते तुलसी सिंह राजपूत यांनी नितीन नांदगावकर यांना फोन करून अत्यंत घाणेरड्या आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. शिवसैनिक तुलसी सिंह राजपूत हे मूळचे उत्तर भारतीय कार्यकर्ते असून मी राजपूत असल्याचा कांगावा करत अप्रत्यक्षरित्या मराठीलाच आवाहन दिल्याचं संभाषणातून समोर आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे - शिवसेना
सामना अग्रलेखातून आज भाजपच्या ऑपरेशन कमळचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. राजस्थानात फसलेलं ऑपरेशन कमळ कसं भाजपच्याच अंगलट आलं याबद्दल सामनातून आज लिहिण्यात आलं आहे. ही राजकिय विकृती असल्याचं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. महाराष्ट्रातही पहाटेची ऑपरेशन फसली. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भाजपच्या भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. अशी बोचरी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. तसेच थोडे थांबा, आणि पुढे जा… वळणावर धोका आहे असा सबूरीचा सल्लाही सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
एका दगडात दोन पक्षी | एकाच्या नियुक्तीने दोघांचं महत्व कमी होणार? - नाराजीचा सूर
रवींद्र वायकर यांची पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं देखील समोर आलं आहे. आमदारांशी समन्वय ठेवण्यासाठी वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. आपली कामं होत नसल्याची शिवसेना आमदारांची तक्रार असल्याने वायकर यांची नियुक्ती करण्याबाबत हालचाली सुरु आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आ. रवींद्र वायकर यांना सरकारमध्ये पुन्हा महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मातोश्रीच्या अगदी जवळचे मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नसल्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे ११ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांना सीएमओ कार्यालयात समन्वयकाचे पद देण्यात आले होते. तर महाविकास आघाडी सरकारसाठी आपल्या मंत्रीपदाची आहुती देणारे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांना केंद्रातील समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली होती. या दोन्ही पदांसाठी शासकीय लाभ, भत्ते देण्यात येत असल्याचा शासन निर्णयही काढण्यात आला होता. मात्र विरोधकांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा उकरून काढला.
4 वर्षांपूर्वी -
खुर्ची गेल्याची तडफड होतेय, असं काय झालं की त्यांना असुरक्षित वाटतंय? - अनिल परब
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राजकारण पेटलं आहे. आज अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटचा समाचार घेत चांगलेच फटकारले आहे. रेणुका शहाणे म्हणाल्या की, सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करु नये. जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशी घटना घडली असती तर तेव्हा तुम्ही मुंबईबद्दल असं ट्वीट केलं नसतं, असा टोला रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे, या प्रकरणावर मीडिया आणि राजकारण्यांचा कोणताही दबाव असता कामा नये, असं मत रेणुका शहाणे यांनी व्यक्त केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO - ....तर मनसे कार्यकर्त्यांना शिवसेना स्टाईलने चोप देण्याचा इशारा
मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अविनाश जाधव यांना 1 ऑगस्टला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले होते. अविनाश जाधव यांना कापूर बावडी पोलीस ठाण्यातून कोर्टात हजेरीसाठी नेत असताना मनसैनिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला होता. यावेळी मनसैनिकांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
ती मुलाखत बघून शिवसैनिकांनी दारे-खिडक्या बंद करून डोकी भिंतीवर आपटली असतील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीनंतर भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवर बसून सर्व कारभार हाताळणे, कसे गरजेचे आहे, हे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. सध्या राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे राज्यभर फिरत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. ते रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
आणि रंजन गोगोईंसारख्या रामभक्तांमुळे राममंदिर उभारणीची पहिली कुदळ मारली जाईल - शिवसेना
येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत श्री राम मंदिर निर्माणासाठी भूमीपूजन सोहळा होत आहे. त्यापूर्वी बाबरी कटाचा खटला बरखास्त करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. ‘सीबीआय चालवत असलेला हा खटला 5 ऑगस्टपूर्वी बरखास्त केला तर ती श्रीराम मंदिर निर्माणासाठी आहुती देणाऱ्यांसाठी श्रद्धांजली ठरेल’, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
देश कोरोना संकटाशी झुंजत आहे आणि भाजप सरकार पाडण्यात व्यस्त, शिवसेनेची टीका
‘देश कोरोना संकटाशी झुंजत असताना भारतीय जनता पक्षाने काही वेगळेच उपद्व्याप सुरू केले आहेत. या काळात भाजपने मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडले. आता जिभेला लागलेले हे रक्त पचण्याआधीच राजस्थानातील गेहलोत सरकार पाडून ढेकर देण्याच्या स्थितीत भाजप दिसत आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार