महत्वाच्या बातम्या
-
'ठाकरे' आडनाव नसते तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते: मंत्री गुलाबराव पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते आज संगीतकारांमध्ये दिसले असते, अशी जहरी टीका शिवसेनेचे आमदार आणि नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
स्वतःला कॅबिनेट मंत्रिपद व मुलाला आमदारकी जाहीर न झाल्याने अब्दुल सत्तारांचा राजीनामा
मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाच दिवसात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. तसेच ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे सरकार आणि शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
माजी मंत्र्याची सेना सोडण्याची धमकी; पण पक्षासाठी कुचकामी असल्याचं शिवसैनिक म्हणतात
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत म्हणाले की, सध्या तरी महाविकास आघाडीत आलबेल आहेत असं वाटतं, मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, सगळ्यांना दालनं मिळाली आहेत. मात्र गेल्या जानेवारी महिन्यापासून माझ्याकडे कोणतंही काम नाही. राजकारणात खूप गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला मिळत नाही. जानेवारीपासून मला कोणतंही काम मिळालं नाही, मी कामासाठी भूकेला आहे. मी काम मागितलं होतं. पण कदाचित उद्धव ठाकरेंच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मला काम दिलं नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाराज आमदारांचे वेगवेगळे आकडे दाखवून प्रसार माध्यमंच संभ्रम पसरवत आहेत? सविस्तर वृत्त
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील नाराजांनी मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढल्याच्या कपोकल्पित बातम्या पेरण्याचं पेव सध्या प्रसार माध्यमांमध्येच आल्याचं पाहायला मिळत आहे. वास्तविक मंत्रिमंडळ वाटपापूर्वी आणि नंतर लॉबिंग तसेच नाराजीनाट्य काही नवा विषय नाही. शपथविधीच्या दिवशी खासदार संजय राऊत यांचा नाराजीनाट्याच्या वृत्तानंतर त्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली असताना देखील त्यांच्या ट्विटरवरील पोस्टवरून भलतेच चित्र रंगविण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
नगराध्यक्षपद: राणे कुटुंबियांवर टीका करून मंत्रिपद मिळवणाऱ्या केसरकारांना भाजपचा दणका
एकीकडे मुंबईत नव्या ठाकरे सरकारच्या पहिल्या वहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार तयारी सुरू असताना तिकडे कोकणात भाजपनं शिवसेनेला जोरदार धोबीपछाड दिली आहे. कोकणातल्या सावंतवाडीमध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संजू परब यांनी शिवसेनेच्या बाबू कुडतरकर यांचा तब्बल ३०९ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपच्या गोटामध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
पवारांची साथ सोडणारे आ. राणाजगजितसिंह पाटील राजकीय अडचणीत
आज राष्ट्र्वादीत असते तर मंत्रीपदी वर्णी निश्चित असली असती, मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी लाटेच्या आशेवर भारतीय जनता पक्षात उडी घेऊन पवार कुटुंबियांशी दगा करणारे आमदार राणा राणाजगजितसिंह पदमसिंह पाटील सध्या राजकीय पेचात पडण्याची शक्यता आहे. मूळ मतदारसंघ सोडून दुसऱ्याच मतदारसंघातून ते निवडून आले खरे, मात्र त्यांचं उस्मानाबाद’मधील राजकीय भविष्य धिक्यात येऊ शकतं.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांसाठी झगडणाऱ्या आ. बच्चू कडूंना शिवसेनकडून मंत्रिपद
महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात २५ कॅबिनेट मंत्री असणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळ विस्तार; शिवसेनकडून कोणाला मिळणार संधी
महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात २५ कॅबिनेट मंत्री असणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ठाणे नंतर मुंबई पालिका? अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे AXIS बँक मोठे ग्राहक गमावणार
शिवसेना विरूद्ध अमृता फडणवीस वाद दिवसेंदिवस टोकाला पोहोचत चालला आहे. अमृता फडणवीस यांच्या टीकेनंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस दलाची खाती एक्सिस बँकेतून वळवल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे एक्सिस बँकेत खाती आहे. आता या बँकेतील खाती सरकारी बँकेमध्ये ताबडतोब वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी आज तातडीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे.
5 वर्षांपूर्वी -
एकाही सदस्याच्या केसालाही धक्का लागला तर शिवसेनेशी गाठ: शिवसेना खा. धैर्यशील माने
मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचाराचा संदर्भ देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल केला होता. यानंतर एका कन्नड संघटनेच्या नेत्याने मराठी भाषिकांना थेट गोळ्या घालून हत्या करण्याची भाषा केली आहे. यामुळे याचे सीमाभागात संतप्त पडसाद उमटले. वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
'माजी' झाल्याने आता कोणी इंडियन आयडॉलला उभं पण करणार नाही: वरूण सरदेसाई
‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती.
5 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांच्या इंटरटेनिंग ट्विटवर सेनेचं सणसणीत प्रतिउत्तर
‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती.
5 वर्षांपूर्वी -
पवारांनी शिवसेनेसमोर मुख्यमंत्रिपदाचे दाणे टाकले आणि त्यांनी ते टिपले: अमित शहा
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी अनेक मुद्यांना हात घातला आहे. तुम्ही नवे पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात का? नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी तुम्हाला तयार केलं जात आहे का? असे सवाल अमित शाह यांना करण्यात आले. यावर बोलताना आपल्यापेक्षाही दिग्गज नेते पक्षात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य मुखपत्र चक्क हिंदी-गुजरातीत? सविस्तर वृत्त
महाराष्ट्र शासन सरकारी कामकाजात १०० टक्के मराठीचा वापर करण्याच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत आहे असाच प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या चक्क हिंदी, गुजराथी आणि उर्दू आवृत्तींच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या अंकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं आहे. यावेळी सचिव तथा महासंचालक सुरेश वांदिले देखील उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे व सेनेच्या बदनामीसाठी खोटा व्हिडिओ प्रचार; फडणवीस सुद्धा सामील - सविस्तर
नागरिकत्व दुरुस्ती कायद्या संसदेत मजूर झाल्यानंतर देशभर मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येतो आहे. विद्यार्थीच रस्त्यावर ईशान्य भारतात उग्र स्वरूप आलेलं असताना दिल्लीत विद्यापीठात देखील प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, याच अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या (एएमयू) विद्यार्थ्यांच्या संबंधित आंदोलन आणि घोषबाजीवरून १-२ व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात येत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणार, फक्त बोंबलून प्रश्न मांडू नका
नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तीव्र शब्दांत निषेध केला. ‘तरुणांचं आंदोलन चिरडून देशात पुन्हा एकदा ‘जालियनवाला बाग’ घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ अशी तोफ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर डागली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प; मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली
मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. प्रकल्पाचे काम सुरू करा, असे निर्देश न्यायालायनं दिले आहेत. या निर्णयामुळं मुंबई महापालिका व राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं १६ जुलै रोजी कोस्टल रोडच्या कामास मनाई केली होती.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर अधिवेशन: शिवसेना आणि भाजपच्या दोन आमदारांमध्ये जोरदार हाणामारी
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतकरी प्रश्नावरून चर्चा सुरू असताना शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांमध्ये थेट हाणामारी झाली आहे. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर: भाजपने विधानसभेत एकही जागा न दिलेल्या शहरांमध्ये शिवसेनेची पक्षबांधणी
शिवसेना काय आहे ते सगळ्या देशाला ठाऊक आहे, आम्ही कोणताही बुरखा पांघरलेला नाही. आम्ही धर्मांतर केलेले नाही. आम्ही आजही हिंदुत्त्ववादीच आहोत, अशी टीका करतानाच हिंदुत्त्वाचा बुरखा पांघरुन वावणार्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव घेता दिला. त्या पक्षाने २०१४ साली युती तोडली होती. त्यानंतरही आम्ही हिंदूच होतो.शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याबाबत आपण कटीबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
वृक्षतोडूवरून सेनेवर कमिशनचा आरोप; पण फडणवीस सरकारच्या आरे वृक्षतोडीवरच भ्रष्टाचाराचं वलय?
मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात एकूण २०११ झाडं तोडण्यात आली. मात्र त्यासाठी फडणवीस सरकारने तब्बल २ कोटी ७० लाख १६ हजार ८९८ रुपयांचा खर्च आल्याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. म्हणजे सदर आकडेवारीनुसार एक झाड तोडण्यासाठी एकूण १३, ४३४ रुपये एकदा खर्च करण्यात आला होता. आरटीआय कार्यकर्ते कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी आरेतील वृक्षतोडीसाठी नेमका किती खर्च करण्यात आला, याबद्दलची सविस्तर विचारणा माहिती अधिकाराच्या माध्यमातून एमएमआरसीएलकडे केली होती. त्यानंतर सदर धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल