महत्वाच्या बातम्या
-
GST वाद चिघळला! तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, मोदी सरकारवर शिवसेनेची टीका
केंद्र सरकारकडून राज्यांना देणे असलेला वस्तू व सेवा कर अर्थात, जीएसटी (GST) परतावा रखडल्यामुळं संतापलेल्या शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘जीएसटी परताव्यावरून राज्यांची मुस्कटदाबी व आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रकार सुरू असेल तर केंद्रातील ठकसेनांविरुद्ध राज्यांना आवाज उठवावा लागेल,’ असं ठणकावतानाच, ‘तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मारता,’ असा खडा सवाल शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’तून करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले: आशिष शेलार
राज्यसभेत बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. त्याअगोदर ते लोकसभेतही मंजूर झाले होते. या विधेयकाला दोन्ही सभागृहात विरोधकांनी विरोध केला होता. शिवसेनेने लोकसभेत फारसा विरोध केला नाही. परंतु, राज्यसभेत शिवसेनेने विरोध केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सभागृहात या विधेयकावर स्पष्ट मत मांडले. या विधेयकाच्या माध्यमातून मतांचे राजकारण व्हायला नको, असे राऊत म्हणाले. एवढेच काय तर या विधेयकाला विरोध करण्यासाठी शिवसेनेने सभात्याग केला. परंतु, तरीही राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. दरम्यान, शिवसेनेच्या याच भूमिकेवरुन भारतीय जनता पक्ष नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरलं! समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. हा मार्ग ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
सेनेचा अपमान छोट्या-मोठ्या गोष्टीं? भाजपा - शिवसेना यांनी एकत्र यायला हवं: मनोहर जोशी
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले तर उत्तम होईल, पण सध्या दोन्ही पक्ष त्या मानसिकतेत नाहीत, असं मनोहर जोशी म्हणाले. मनोहर जोशी यांनी हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही यावेळी नमूद केलं.
5 वर्षांपूर्वी -
नवा शोध! प्रादेशिक पक्षांमुळे भ्रष्टाचार होतो...आइन्स्टाइनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला सांगणारे सुद्धा हेच
भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका योग्य नाही. देशानं १९९०-२०००मध्ये राजकीय अस्थिरता पाहिली आहे. प्रादेशिक पक्ष हे देशाच्या राजकारणासाठी योग्य नाहीत. प्रादेशिक पक्षांमुळेच भ्रष्टाचार होतो, असा आरोपही पीयूष गोयल यांनी केला आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात मुलाखती दरम्यान ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरेंचं नाव निश्चित; पण भाजपचा विरोध?
मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाचे काम गतिमान झालेले नसले तरी त्याच्या नामकरणावरून निर्माण झालेला वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. या महामार्गास दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा प्रस्ताव मोडीत काढत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे या महार्गाचे नामांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याची घोषणा लकरच केली जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रानी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मी कांदा खात नाही, तुम्ही सुद्धा खाऊ नका' हे त्यांचे अर्थव्यवस्थेबद्दलचे ज्ञान: शिवसेना
महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात रोज राजकीय खटके उडताना दिसत आहेत. त्यात कालच्या कर्नाटकातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं, परंतु त्यावेळी भारतीय जनता पक्षाने ज्या ५ राज्यात जनमत धुडकावलं ते सामान्य लोकसांपासून दडवलं आणि त्याबद्दल वृत्त प्रसिद्ध होताच पुन्हा चिडीचूप झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र सामना मुखपत्रात शिवसेनेने अर्थव्यवस्थेच्या दुरावस्थेवरून भाजपाला लक्ष केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
रेटून खोटं बोलणं हा मोठा रोग आहे, लवकर बऱ्या व्हा; प्रियांका चतुर्वेदींचा अमृता फडणवीस यांना टोला
औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरून बराच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी सोशल मीडियातून यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती.
5 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांची शिवसेनेवर थेट 'फक्त कमिशनसाठी' असा शब्दप्रयोग करत टीका
औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरून बराच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी सोशल मीडियातून यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
घटनेची चौकशी करा; घटनांवर पडदा टाकण्यासाठी पोलीस काही लोकांना अटक करतात: डॉ. नीलम गोरे
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आलं आहे. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
भाजपमधील आगामी पक्षफुटी झाकण्यासाठी धारावीतील दाक्षिणात्य शिवसेना कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा शो?
राज्यात महाशिव आघाडीने सत्ता स्थापन केल्याच्या धक्क्यातून भारतीय जनता पक्षातील नेते मंडळी अजून सावरताना दिसत नाहीत असंच म्हणावं लागेल आणि त्यामुळे आमच्या पक्षात सर्वकाही आलबेल असल्याचा दिखावा करण्यात येतं आहे. धारावीत मोठ्या प्रमाणावर दाक्षिणात्य लोकांचं साम्राज्यं असून अनेकांचे किरकोळ उद्योग या भागात चालतात. शिवसेनेचा इथे चांगला संपर्क असला तरी तिथला मराठी कार्यकर्ता हा प्रमुख भूमिकेत असतो. तसेच या विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणावर आहे.
5 वर्षांपूर्वी -
शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे, पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल: शिवसेना
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नाट्यमय, तर काही आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडल्या आणि अखेर नव्यानं उद्यास आलेल्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाले. त्यानंतर यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला. याच ‘ऑफर’च्या संदर्भाने शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. “पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल,” असा सल्ला देत शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला चिमटे काढले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनंतर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र (NCP MLA Dhananjay Munde wrote a letter to Chief Minister Uddhav Thackeray) लिहीत भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे (Bhima Koregaon Riots).
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना जमलं नाही ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं; नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे
कोकणातील बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्प राज्यात विविध आंदोलनामुळे चर्चेत होता. स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले फडणवीस यांनी मात्र स्वतःच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नाणारवासियांवर गुन्हे दाखल केल्याने कोकणात भारतीय जनता पक्षाबद्दल खदखद होती आणि त्याची झळ थेट युती सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेला देखील बसली होती.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकार फडणवीसांच्या काळातील विकास कामांची श्वेतपत्रिका काढणार
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्यात येणार आहे. तसेच भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल आणि राज्यातील जनतेला १० रुपयांत जेवण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज त्यांच्या अभिभाषणातून दिलं.
5 वर्षांपूर्वी -
आज महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (Chief Minister Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज, शनिवारी विधानसभेत मांडला जाणार असून, त्यासाठी शनिवार आणि रविवार असे २ दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता सत्ताधारी आघाडीतर्फे विश्वासदर्शक ठराव आणला जाईल.
5 वर्षांपूर्वी -
शिवतीर्थावर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अभूतपूर्व शपथविधी सोहळा संपन्न
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून एक महिना चार दिवस झाल्यानंतर अखेर महाराष्ट्राला परमनंट मुख्यमंत्री मिळाला आहे. राज्याचे २९ वे तर शिवसेनेकडून तिसरे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. शिवतीर्थावर मोठ्या थाटामाटात झालेल्या शपथविधी सोहळ्यात ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ‘मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेस केवळ अल्पसंख्यांकांसाठीचा पक्ष नसल्याचा संदेश देण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा: सविस्तर वृत्त
देशाच्या राजकारणात काँग्रेस पक्ष जरी धर्मनिरपेक्ष असल्याचं सांगत असला तरी देशात त्यांची प्रतिमा ही अल्पसंख्यांकधार्जिणी असल्याचं सर्वश्रुत आहे. भारतीय जनता पक्षाने देशात कट्टर हिंदुत्वाच्या मुद्यावर देशभरात पक्षाचा विस्तार केला आहे. दरम्यान, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचं नैतृत्व हे हिंदू विरोधी असल्याचं सात्यत्याने लोकांच्या मनात बिंबवलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेत भूकंप झाला नाही तर शिवसेनेने भूकंप केल्याने आ. रवी राणा तोंडघशी
मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार अखेर सत्तेत येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यांच्यासोबत काँग्रेस -राष्ट्रवादीचे चार मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांना मंत्रिपद मिळणार असून, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते, अशी जोरदार चर्चा आहे. तीन तारखेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहितीसुद्धा खात्रीलायक सूत्रांकडून आता मिळाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आणीबाणीवरून काँग्रेसवर आसूड ओढणाऱ्या शिवसेनेला इंदिरा गांधींची आठवण
राज्यात सध्या महाविकासआघाडीच्या नावाने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार विराजमान होणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून इंदिरा गांधींनी लादलेल्या आणिबाणीविरुद्ध अनेकदा आसूड ओढले आहेत. मात्र, बदल्यात राजकारणात सर्वकाही जुळून येताना दिसत आहे. कारण आता शिवसेनेला स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी (Balasaheb Thackeray and Indira Gandhi Meet) यांच्या त्या भेटीची आठवण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News