महत्वाच्या बातम्या
-
'KG टू PG' मोफत शिक्षणावरून आदित्य यांना लक्ष केलं तोच मुद्दा झारखंडच्या जाहीरनाम्यात
युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ऑक्टोबर २०१६ रोजी मुंबईतील केजी टू पीजी मोर्चात पूर्वीच्या काँग्रेस सरकार आणि विद्यमान भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या युती सरकारवर देखील प्रचंड टीका केली होती. देशात आणि राज्यात २०१४ मध्ये सत्ताबदल झाला आणि त्यावेळी आपलं सरकार आलं असं वाटलं होतं. मात्र त्यानंतर २ वर्षांत कोणताही बदल न झाल्यानं विराट मोर्चा काढावा लागला असा घणाघात त्यांना युती सरकारवर देखील केला होता. तसेच जर परिस्थिती जैसे थेच राहणार असेल तर मग आधीच्या आणि आताच्या सरकारमध्ये काही फरक वाटत नाही, अशी जहरी टीका त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी सार्वजनिकरित्या केली होती.
5 वर्षांपूर्वी -
बॅनरवर मोदींचा फोटो लावून आदित्य ठाकरे आणि सेनेच्या आमदारांनी मतं मागितली: अमित शहा
राज्यातील भारतीय जनता पक्षाचं सरकार अवघ्या साडेतीन दिवसात पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा चांगलेच संतापले दिसले, जनादेशाचा अनादर करण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे. विचारधारा आणि युतीधर्माच्या विरोधात त्यांनी काम केलं आहे. शिवसेनेचा एकही आमदार असा नाही ज्यांनी त्यांच्या बॅनरवर फोटो लावून मतं मागितली नाही, आदित्य ठाकरेंनी तेचं केलं असा अमित शहांनी टोला लगावला.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी'मार्गे मनसेचे राजू पाटील देखील मंत्रिमंडळात जाण्याची शक्यता? सविस्तर वृत्त
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांची जवळीक पाहायला मिळाली होती. केवळ राज्यातील नव्हे तर देशातील सर्व विरोधकांना भाजप म्हणजे मोदी-शहा यांच्या हिटलरशाही विरुद्ध एकत्र येण्याचं जाहीर आवाहन केलं होतं. प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने ऐतिहासिक निर्णय घेतला आणि थेट मोदी-शहांशी राष्ट्रीय पंगा घेत एनडीए’मधून बाहेर पडले. विशेष म्हणजे एकूण घडामोडींबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकासआघाडीवर कोणतीही टीका केली नव्हती.
5 वर्षांपूर्वी -
सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा सुरु
महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी तिढा सुटला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय (Supreme Court of India Order) देते, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आता आपले बहुमत दाखवत ‘महाविकास’आघाडी सत्ता स्थापन करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
उद्या उद्धव ठाकरे शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नाट्यानंतर पुन्हा एकदा सर्वात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल. सर्वोच्च न्यायालयानं उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वीच अजित पवारांनी राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे नाव जाहीर करण्यात आले आहे. उद्या बुधवारी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
5 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च आदेश! गुप्त मतदान नाही...व्हिडिओ शूट करा
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालय राखून ठेवलेला आपला निर्णय देणार आहे. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सरकार स्थापन केलं. त्या शपथविधीविरोधा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २ दिवस म्हणजे रविवार आणि सोमवार सुनावणी झाली. सोमवारी कागदपत्र सादर करण्यात आले आणि दोन्ही पक्षाकारांची बाजू न्यायालयानं ऐकून घेतली आणि आपला निर्णय राखून ठेवला होता आणि त्यावर आज अंतरिम निकाल देणार असल्याचं म्हटलं जातं होतं.
5 वर्षांपूर्वी -
धक्का! विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील हेच अधिकृत गटनेते अशी नोंद; त्यांचाच ‘व्हीप’ अधिकृत
अजित पवारांचा आदेश न मानल्यास अपात्रतेची कारवाई होईल, अशी भीती नवीन आमदारांना दाखवली जात होती. पण ते चुकीचे आहे. राष्ट्रवादीने अजित पवार यांना गटनेतेपदावरून दूर केले आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना पक्षादेश काढण्याचा अधिकारच उरलेला नाही, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. अजित पवार यांनी पक्षादेश काढलाच तर त्यांच्याविरोधात मतदान करणाऱ्यांवर कसलीही कारवाई होणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
आमदारांच्या सह्यांचं पत्र चुकीच्या हेतूनं वापरण्यात आलं: अभिषेक मनू सिंघवी
सिंघवी राष्ट्रवादीच्या वतीनं युक्तीवाद करताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, ‘आमदारांचं पत्र चुकीच्या हेतूनं वापरण्यात आलं. राज्यपालांची फसवणूक करण्यात आली. ते पत्र वेगळ्या कारणासाठी तयार करण्यात आलं होतं. मात्र, ते दुसरीकडं जोडण्यात आलं. दोन्ही पक्ष बहुमत चाचणीसाठी तयार आहे. मग उशीर कशासाठी केला जातोय. एकतरी आमदार भारतीय जनता पक्षासोबत गेला आहे का? तसं सांगणार पत्र आहे का? न्यायालयानं दिलेले जुने आदेश डावलता येणार नाही. त्यामुळं हंगामी अध्यक्ष नेमून बहुमत चाचणी आजच व्हायला हवी,’ अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडं केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जस्टीस खन्ना यांनी विचारलं 'त्या आमदारांचा आता पाठिंबा आहे का'...पुढे?
भाजपाच्या वतीनं बाजू मांडतांना मुकूल रोहतगी यांनी महत्त्वाचा युक्तीवाद केला. ५४ आमदारांचा आम्हाला पाठिंबा असून, एक पवार आमच्या सोबत आहेत. तर दुसरे आमच्या विरोधात आहेत. त्यांच्या कुटुंबातील वादाशी आम्हाला देणंघेणं नाही. राज्यपालांनी पत्रांच्या आधारे निर्णय घेतला आहे,” असं रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
CBI, ईडी, आयकर, पोलीस हे भाजपचे ४ मुख्य खेळाडू; राष्ट्रपती भवन व राजभवन राखीव: राऊत
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाला आमंत्रण देण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत रिट याचिका दाखल केली असून या याचिकेवर आज रात्रीच तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती तिन्ही पक्षांकडून करण्यात आली आहे. याचिकेत केंद्रीय गृहमंत्रालय, महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
शपथविधी विरोधातील शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर सकाळी सुनावणी
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजपला आमंत्रण देण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत रिट याचिका दाखल केली असून या याचिकेवर आज रात्रीच तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती तिन्ही पक्षांकडून करण्यात आली आहे. याचिकेत केंद्रीय गृहमंत्रालय, महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
बहुमत नसताना शपथविधी हा केवळ आमदार फोडण्यासाठीचा माइंडगेम भाजपवरच उलटणार? सविस्तर
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
३० नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करा; राष्ट्रवादीसारखी शिवसेनेत व काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता?
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; फडणवीस पुन्हा सीएम, अजित पवार उपमुख्यमंत्री
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर
विद्यमान महापौर, उपमहापौर यांचा कार्यकाळ गुरुवारी संपुष्टात आला. त्यानुसार मुंबईच्या महापौर व उपमहापौरपदासाठी आज पालिका मुख्यालयात निवडणूक झाली. या निवडणुकीत मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
५ वर्ष सेनेचाच मुख्यमंत्री; शरद पवारांसोबत उद्धव ठाकरेंची निर्णायक चर्चा
विधानसभा निवडणुकीचे निकल जाहीर होऊन जवळपास महिना पूर्ण होत आला असला तरी सरकार स्थापनेच्या हालचाली सुरूच असून त्या अंतिम आणि निर्णायक टप्यात आल्या आहेत. दरम्यान, महिन्याभराच्या राजकीय अनिश्चिततेनंतर शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस यांच्यात सहमती झाल्यामुळे महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होण्याचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे. आज, शुक्रवारी मुंबईत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अहमद पटेल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या निर्णायक बैठकीत याविषयी औपचारिक घोषणा होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे आमदार उद्या जयपूरला रवाना होण्याची शक्यता
राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मातोश्रीवरील उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार आहेत. मात्र आमदारांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काँग्रेसची सत्ता असलेलं राज्य जाणीवपूर्वक निवडण्यात आल्याचं वृत्त आहे. भारतीय जनता पक्ष आजही घोडेबाजार करेल अशी आघाडीला आणि शिवसेनेला शंका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेलं राज्य शिवसेनेने निवडलं नाही असं समजतं.
5 वर्षांपूर्वी -
'सेक्युलर' शब्द घटनेतच आहे, पण माध्यमांनी उगीच संभ्रम निर्माण करू नये: संजय राऊत
राज्यात १ डिसेंबरपूर्वी सरकार स्थापन होईल. काल काँग्रेस आणि एनसीपी’ची पार पडलेली बैठक ही सकारात्मक झाली. सरकार स्थापनेसंदर्भात त्यांनी काही निर्णय घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. बैठकीनंतर आघाडीच्या काही नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली आहे आणि लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल, अशी माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही: सुभाष देशमुख
सत्तास्थापनेच्या प्रक्रियेतील सर्व महत्त्वाचे मुद्दे संपले आहेत. दोन्ही काँग्रेसच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. उद्या पुन्हा आमची चर्चा होणार असून त्यानंतर शुक्रवारी शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यात येईल. शुक्रवार संध्याकाळपर्यंत सत्तेचा फॉर्म्युलाही तयार होणार असून त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत सत्तास्थापनेची अंतिम घोषणा करण्यात येणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. शिवसेनेसोबत जाण्याबाबत आजच्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आल्याचे संकेतही त्यांनी दिले.
5 वर्षांपूर्वी -
महाशिवआघाडीसाठी सोनिया गांधींचा होकार जवळपास निश्चित असल्याचं वृत्त
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी काँग्रेस आणि एनसीपी यांच्या नेत्यांमध्ये होणारी बैठक रद्द झाली असून, ही बैठक आज, बुधवारी होणार आहे. शिवसेनेसोबत महाशिवआघाडीत सामील होण्यास काँग्रेसला मुळीच हरकत नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Poco X7 5G | 32MP फ्रंट कॅमेरा, Poco X7 5G स्मार्टफोन लवकरच लाँच होतोय, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनला तोड नाही