महत्वाच्या बातम्या
-
शिवसेनेचे प्रवक्ते सध्या गजनी बनले आहेत: जीवीएल नरसिम्हा राव
भारतीय जनता पक्षाकडून कडक शब्दांत शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे आणि त्याचे पडसाद थेट दिल्लीतून उमटले आहेत. राज्यातील सत्तास्थापनेवरुन भारतीय जनता पक्षावर करण्यात आलेल्या टीकेवर भारतीय जनता पक्षानेही जशास तसं उत्तर दिलं आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जीवीएल नरसिम्हा राव (BJP National Spoke person GVL Narasimha Rao) यांनी आम्ही सामना वाचत नाही, जे त्यात लिखाण करतात तेच सामना वाचतात, ज्यांना बाहेर जायचं होतं ते स्वत: बाहेर गेले आहेत असा टोला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेनंही राज्यात मोहम्मद घोरीसारख्या विश्वासघातकी प्रवृत्तीला जीवदान दिले
हिंदू राजे पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यात १८ छोटी-मोठी युद्धं झाली. त्यातल्या १७ युद्धांमध्ये मोहम्मद घोरीचा पराभव झाला. मात्र प्रत्येकवेळी पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीला जीवदान देऊन सोडून दिले. हीच चूक त्यांना महागात पडली. शिवसेनेनंही महाराष्ट्रात घोरीसारख्या विश्वासघातकी प्रवृत्तीला जीवदान दिले. हीच प्रवृत्ती आज शिवसेनेवर पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करीत आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आपसातील भांडणांमुळे दोघांचे नुकसान झाले पण अजून भांडणं बंद नाहीत: मोहन भागवत
राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. भारतीय जनता पक्ष-सेना यांच्यात सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणातून अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी सांगितले की, लहान मुलांचे प्रथम गुरू त्यांचे आई-वडील असतात. शाळेत जाण्यापूर्वी त्यांना प्राथमिक शिक्षण घरातूनच मिळतं.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर काँग्रेस आणि एनसीपीचा उपमुख्यमंत्री? सविस्तर वृत्त
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यात सोमवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीदरम्यान महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत चर्चा झाल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्र ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी यांच्यातील सत्तेचा फॉर्म्युला देखील ठरल्याचं वृत्तपत्राने म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेसोबत सरकार स्थापनेबद्दल चर्चा नाही; आघाडीच्या सहकाऱ्यांना विश्वासात घेते आहोत
सरकार स्थापनेचं शिवसेना-भारतीय जनता पक्षाला विचारा असं सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रम वाढवलेला असतानाच आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झालीच नसल्याचं पवार यांनी सांगितलं. पवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस-एनसीपी शिवसेनेसोबत जाणार की नाही? याबाबतची स्पष्टता अजून आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईच्या महापौरपदासाठी किशोरी पेडणेकर शिवसेनेच्या उमेदवार
शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना मुंबईच्या नव्या महापौर होणार आहेत. शिवसेनेकडून त्यांनी महापौरपदाच्या उमेदवार म्हणून आज अर्ज भरला आहे. पेडणेकर या पालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका असून त्यांनी पालिकेच्या विविध पदांवर काम केलं आहे. आक्रमक नगरसेविका म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे सुहास वाडकर यांनी अर्ज भरला आहे.
5 वर्षांपूर्वी -
गिरगावात मेट्रो-३ विरोधात शिवसेनेचं आक्रमक आंदोलन
शिवसेनेनं मेट्रो 3 प्रकल्पा विरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू केलं आज गिरगावातील मेट्रो तीन प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या खोदकामांमुळे स्थानिक नागरिकांना जो त्रास होतेय त्या संदर्भात शिवसेना आंदोलन करत आहे. शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना दररोजचा त्रास तसेच रहिवाशांना त्यांच्याच घरी येण्याजाण्यासाठी करावी लागणारी कसरत. या संदर्भात शिवसेनेनं हे आंदोलन सुरू केलं. या आंदोलनादरम्यान गिरगावात मेट्रो ३ प्रकल्पासाठी सामानांची ने आण करणारे डंपर शिवसैनिकांनी फोडले. डंपरच्या काचा तोडण्यात आल्यात. तसेच डंपरमधील ड्रायव्हर आणि क्लिनर यांना शिवसैनिकांनी पळवून लावलं.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर
येत्या २४ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता उद्धव ठाकरेंनी आपाला नियोजित अयोध्या दौरा रद्द केल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा पेच वाढल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, अयोध्येमधील वादग्रस्त जमिनीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने ९ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक निकाल दिला. त्यावेळी ‘येत्या २४ नोव्हेंबर रोजी सर्व काही नियोजन व्यवस्थित झाल्यास मी स्वत: अयोध्येला जाईन’, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु, आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या तुटपुंज्या मदतीवरून सेनेचे खासदार केंद्राला जाब विचारणार
संसदेचे हिवाळी अधिवेशन आज, सोमवारपासून सुरुवात होत असून यामध्ये बहुचर्चित नागरिकत्व (सुधारणा) विधेयक मंजूर करून घेणे; तसेच कॉर्पोरेट कर कमी केल्याचा वटहुकूम आणि ई-सिगारेटवर बंदी घातल्याच्या वटहुकमाला कायद्याचे रूप या अधिवेशनात सरकारकडून दिले जाण्याचीही शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, आर्थिक मंदीसदृश परिस्थिती, बेरोजगारी हे मुद्दे अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. अधिवेशनाची सांगता १३ डिसेंबर रोजी होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO - ते पुन्हा आले, पण बाळासाहेबांच्या चरणी; शिवसैनिकांची घोषणाबाजी
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळी फडणवीस यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे, पंकजा मुंडे तर शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती होती. आदरांजली वाहिल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांना हात जोडत बोलण टाळलं. मात्र, परत जात असताना फडणवीसांना बघून शिवसैनिकांनी मी पुन्हा येईन अशी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
युती तुटली! शिवसेना ‘एनडीए’बाहेर; भाजपाकडून अधिकृत घोषणा
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून भारतीय जनता पक्षासोबत काडीमोड घेतलेली शिवसेना आता एनडीएतून बाहेर पडली आहे. संसदेतील दोन्ही सभागृहांत म्हणजेच, लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेचे खासदार विरोधी पक्षात बसणार आहेत. ते विरोधी पक्षांच्या बाकावर बसतील, अशी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७वा स्मृतिदिन
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७वा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या विचारांतून मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांच्या अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
आरपारची लढाई! शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर बसणार? सविस्तर वृत्त
सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीच्या घटकपक्षांची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. परंतु या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, नुकतीच आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतले आहे. सर्वकाही ठिकठाक आहे, असंही ते म्हणाले. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या पुण्यतिथी आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्वच नेते उद्या मुंबईत हजर राहणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना एनडीएच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; एनडीए'तुन बाहेर पडल्यात जमा?
भारतीय जनता पक्षाला वगळून राज्यात सत्तास्थापनेच्या प्रयत्नात असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे नेते आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेणार आहेत. याशिवाय, सरकार स्थापनेच्या दृष्टीनं आज अनेक बैठका अपेक्षित आहेत.
6 वर्षांपूर्वी -
गडकरींचा संबंध सिमेंट, इथेनॉल, डांबर वगैरे वस्तूंशी, क्रिकेटशी नाही: शिवसेना
‘सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत असं सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच ‘आमचेच सरकार येणार’ असं कोणत्या तोंडानं सांगत आहेत’, असा खडा सवाल करतानाच, ‘श्रीरामासही राज्य सोडावे लागले होते. त्यामुळं इतकं मनास लावून घेऊ नका,’ असा खोचक सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात नवी समीकरणे जुळत असल्याने अनेकांना पोटाचे विकार सुरू झाले: शिवसेना
सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत असं सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच ‘आमचेच सरकार येणार’ असं कोणत्या तोंडानं सांगत आहेत’, असा खडा सवाल करतानाच, ‘श्रीरामासही राज्य सोडावे लागले होते. त्यामुळं इतकं मनास लावून घेऊ नका,’ असा खोचक सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंवर राग व्यक्त करण्यासाठी भाजपकडून ठाकरेंच्या कौटुंबिक नात्याचा वापर?
गुरूवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. ‘मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा बंद दाराआड अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली होती. ती बंद दाराची खोली खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यामुळे त्यांची ती खोली आम्हाला मंदिरापेक्षा कमी नाही. तिथे झालेली शहा-ठाकरे यांच्यातील चर्चा शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितली नाही, त्यामुळे गोष्टी बिघडल्या’, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी थेट अमित शहा यांच्यावर केला होता. त्यामुळे आशिष शेलार यांनी आज संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी -
आम्ही सारखं 'मी पुन्हा येईन पुन्हा येईन' बोलणार नाही; शिवसेनाच येणार: संजय राऊत
नव्या सरकारच्या फॉर्म्युल्याची चिंता करू नका. त्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे. लाख प्रयत्न करा, कुणीही शिवसेनेला रोखू शकणार नाही,’ असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज बोलून दाखवला.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई पालिका कंत्राटदारांवरील धाडीमार्गे सेना लक्ष? राज्यात सत्ता येताच सेना उत्तर देणार?
मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेचे बिनसले असताना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्राप्तीकर विभागाने सेनेच्या ताब्यातील महापालिकेतील कंत्राटदारांवर छापे टाकले आहेत. यावरून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी शिवसेना पक्ष नैत्रुत्वाच्या विरुद्ध आघाडी उघडल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, राज्यात सत्ता स्थापन होताच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी देखील भाजपच्या संबंधित घोटाळ्यांमध्ये लक्ष घालण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी चालवलेला हा खेळ काही दिवसचं बघायचा आणि सत्ता येताच चोख प्रतिऊत्तर द्यायचं अशी चर्चा शिवसेना आणि मित्रपक्षांमध्ये रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO - महाशिवआघाडीची पहिली संयुक्त बैठक; किमान समान कार्यक्रमावर चर्चा
महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे ठोस पावले टाकायला सुरुवात केली असून या तिन्ही पक्षांची पहिली संयुक्त बैठक आज मुंबईत सुरू झाली आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रम व सत्ता वाटप यावर चर्चा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले या शेअरवर, जिओ फायनान्शिअल शेअरबाबत अपडेट नोट करा - NSE: JIOFIN