महत्वाच्या बातम्या
-
५०-५०च्या चर्चा झाल्या नसल्याचं मुख्यमंत्रीच बोलतात मग बैठक कशाला हवी: शिवसेना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०-५०च्या फॉर्म्युल्यावरून शब्द फिरवल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री शब्द फिरवत असतील तर बैठकीत कशावर चर्चा करायची? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना-भारतीय जनता पक्षाची मंत्रिमंडळ स्थापन्याबाबतची होणारी बैठक रद्द केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्रिपदावरून तणाव निर्माण झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील सत्तेचे रिमोट कंट्रोल आता उद्धव यांच्या हाती: शिवसेनेचा इशारा
महाराष्ट्रातील सत्तेचे रिमोट कंट्रोल आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असल्याचे शिवसेनेने रविवारी सांगितले. २०१४च्या तुलनेत यावेळी विधानसभेत कमी जागा मिळून देखील शिवसेनेने हा दावा केला आहे. १९९५ ते १९९९ या सत्ता काळात शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळ ठाकरे हे सहसा ‘रिमोट कंट्रोल’ हा शब्द वापरत असत.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंसाठी सेनेने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे: रामदास आठवले
शिवसेनेने आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे असं आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनीही म्हटले आहे. शिवसेनेने समसमान फॉर्म्युला समोर आणून अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. हा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाला मान्य होईल असे वाटत नाही त्यापेक्षा शिवसेनेने पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे आणि आदित्य ठाकरेंना त्या पदी बसवावे अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाने अशी ऑफर दिली तर शिवसेना ही ऑफर स्वीकारेल असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब बोलून दाखवली.
5 वर्षांपूर्वी -
आम्ही युतीला मतं दिली; आता भांडून हे आम्हाला मूर्ख बनवत आहेत: अशोक पंडित
महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर दोन्ही राज्यात कोणाचे सरकार स्थापन होईल याबद्दल देशात बरीच चर्चा रंगली आहे. एकीकडे हरियाणामध्ये कॉंग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेना यांच्या युतीला २८८ जागांपैकी १६१ जागा मिळाल्या आहेत. मात्र, या विजयानंतरही मुख्यमंत्रीपदाच्या पदा संदर्भात दोन्ही पक्षांमध्ये बरीच भांडणं लागल्याचे पाहायला मिळत आहे. याबद्दल आता बॉलिवूड निर्माता अशोक पंडित यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे लेखी आश्वासन हवेः शिवसेना
राज्याच्या सत्तेत समसमान वाटा मिळावा अशी मागणी शिवसेना आमदारांची केली आहे. मातोश्रीवर आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांनी सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना दिले आहेत. तसेच सत्ता स्थापनेबाबत युतीत जो निर्णय होईल, तो भारतीय जनता पक्षाकडून लिहून घ्यावा अशी मागणीही शिवसेना आमदारांनी केली आहे, अशी माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
आज शिवसेना आमदारांची उद्धव ठाकरेंसोबत महत्वाची बैठक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत आज आमदारांची बैठक होणार आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेवून उद्धव ठाकरे हे त्यांन मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच भाजपसोबत सत्ता स्थापनेबाबत त्यांची मतंही जाणून घेणार असल्याची चर्चा आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्यात काहीच गैर नाही: शरद पवार
भाजप आणि शिवसेनेत सत्तास्थापनेसाठी ठरलेल्या फॉर्म्युल्याची अंमलबाजवणी झाली पाहिजे. याचा अर्थ ५०-५० टक्के किंवा त्यांचे जे काही ठरले असेल ते. मागच्या वेळी शिवसेनेच्या चार-दोन गोष्टी राहून गेल्या. मात्र, या वेळी ते काही सहन करतील, असे असे दिसत नाही. त्यामुळे स्वत:चा आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईलआणि उद्धव यांच्या या मागणीशी आपण सहमत असल्याचे पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. “१९९० च्या दशकातही शिवसेना-भाजपाने ५०-५० चे सूत्र वापरले होते. त्यांना सरकार चालवण्याचा अनुभव असल्याने त्यांनी अशा मागणीवर अडून राहण्यात काहीच चुकीचे नाही,” असं पवार म्हणाले. पवारांनी दिलेला हा संदर्भ १९९५-१९९९ काळात शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते तेव्हाचा आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
5 वर्षांपूर्वी -
वाघाच्या गळ्यात घड्याळ अन कमळाचा सुगंध; राऊतांना नक्की काय सूचित करायचंय?
विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून भारतीय जनता पक्षाला स्वबळ तर दूरच, पण २०१४च्या निवडणुकीत होत्या, तेवढ्या जागा देखील जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे या परिस्थितीत शिवसेना अधिक कठोर आणि अडून राहणं हे साहजिक आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करणं अशक्यच असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिवसेनेचा भाव आता युतीमध्ये चांगलाच वधारला असून या लहान भावाचा हट्ट आता भारतीय जनता पक्षाला पुरवावाच लागेल अशी चिन्ह आहेत. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने आधीच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला कानपिचक्या दिलेल्या असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करून समाज माध्यमांवर नवी चर्चा सुरू करून दिली आहे. हे व्यंगचित्र रवि नावाच्या व्यंगचित्रकाराने काढलं असून त्याचं देखील कौतुक संजय राऊत या ट्वीटमध्ये करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाजपवर शिवसेनेच्या दबावाखाली काम करण्याची वेळ: सविस्तर
२०१४ च्या विधानसभेत स्वबळावर लढून आलेल्या १२२ जागांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार शिवसेनेला सोबत घेऊन पाच वर्षे तारून नेले. मात्र या विधानसभा निवडणुकीत १००च्या आसपास जागा आल्यामुळे ते विधानसभेतील बहुमतांच्या १४५ या आकड्यापासून बरेच दूर राहिल्यामुळे शिवसेनेच्या अटी व शर्तीवर त्यांच्यावर सरकार चालविण्याचे वेळ आली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या दबावाला तोंड देत सरकार चालविणे हाच मुख्य अजेंडा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेत प्रवेश करणाऱ्या तब्बल १९ आयात उमेदवारांचा पराभव
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीची हवा असल्याचा अंदाज बांधून महायुतीत गेलेल्या १९ आयारामांचा पराभव झाला आहे. त्यामुळे ऐनवेळी पक्षांतर करणाऱ्या आयारामांना मतदारांनी नाकारल्याचं स्पष्ट झालं आहे. महायुतीत आलेले १६ आयाराम जिंकले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मला सत्तेची हाव नाही; पण सत्तेत समसमान वाटा हवा: उद्धव ठाकरे
लोकसभा निवडणुकीवेळी सत्तेत समसमान वाटा देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. त्याची अंमलबजावणी करायला हवी. त्यानंतरच सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल, असा इशारा देतानाच जागा वाटपात समजून घेतलं. सत्ता वाटपात समजून घेणार नाही, असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाला दिला.
5 वर्षांपूर्वी -
मातोश्रीच्या अंगणातच काँग्रेसकडून शिवसेनेचा पराभव; महाडेश्वर पराभूत
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला धक्का बसला आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा काँग्रेस उमेदवार झिशान सिद्दीकी यांनी पराभव केला आहे. झिशान हे ४,२८५ मतांनी विजयी झाले आहेत. झिशान काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना या मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिली होती. वांद्रे पूर्वची जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होती. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान या मतदारसंघात आहे.
5 वर्षांपूर्वी -
कणकवलीतून नितेश राणे विजयी; सेनेचे सतीश सावंत यांचा पराभव
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. युतीची सत्ता येणार हे स्पष्ट झालं असलं तरी महाआघाडीने देखील चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
२०१४च्या तुलनेत भाजप-सेनेच्या जागा मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी गुळगुळीत बोलत नाही! सेनेशिवाय भाजपाला राज्य करणं अशक्य: संजय राऊत
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत. निकालामध्ये कोणता पक्ष किती जागा मिळविणार हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. मात्र शिवसेनेने प्रत्येक जागा जिंकण्यासाठी लढली आहे. अबकी बार १०० पार हे ध्येय शिवसेनेचे होते. शिवसेना-भारतीय जनता पक्ष २०० च्या वर जाणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. शिवसेना १०० जागांवर विजयी होणार आहे. भारतीय जनता पक्षाला जास्त जागा मिळाल्या तरी शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
वसई, नालासोपारा, बोईसरच्या जागांवर फक्त ईव्हीएम घोटाळा आम्हाला हरवू शकतो: हितेंद्र ठाकूर
बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा आणि वसई-विरार मतदारसंघाचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भविष्यात आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले. मात्र, आपण राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. संघटनात्मक पातळीवरील राजकारणात सक्रिय राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या राजकारणाने पातळी सोडली. दोन गोळ्या घालण्याची भाषा झाली. ही घटनाच दुर्दैवी आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवणारी आहे, अशा शब्दात हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारपरिषदेत खेद व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
भाजप बहुमताच्या जवळ आल्यास शिवसेनेची अडचण पुन्हा वाढणार?
शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीने विधानसभा निवडणूक एकत्र लढवली असली तरी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याचा कोणताही शब्द दिलेला नाही असे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी आणि पक्षाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भूपेंद्र यादव यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस ठरवतील असे यादव यांनी सांगितले. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथे सह-कुटुंब मतदानाचा हक्क बजावला
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
युपीच्या शिवसैनिकाकडून कमलेश तिवारींची हत्या करणाऱ्याचा गळा चिरण्यासाठी १ कोटींचं बक्षीस
हिंदू समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी यांची निर्घृणपणे गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेना नेते अरुण पाठक यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओच्या माध्यमातून अरुण पाठक यानं कमलेश यांच्या मारेकऱ्यांचा गळा चिरणाऱ्याला एक कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. व्हिडीओत तो म्हणतो, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी उत्तर प्रदेशमधल्या लखनऊमध्ये झालेल्या माझ्या भावाच्या हत्येचा निषेध नोंदवतो. त्या मारेकऱ्यांचं मुंडकं उडवणाऱ्यांना एक कोटी रुपयांचं बक्षीस देणार आहे. त्यासाठी माझी सर्व संपत्तीही विकून टाकेन. कमलेश तिवारींची निर्दयी हत्या करणाऱ्यांचा पोलीस तपास करत आहेत, जोपर्यंत त्यांना पोलीस पकडत नाही, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. जेव्हा त्यांचा गळा चिरला जाईल, तेव्हाच मला समाधान मिळेल, असंही अरुण पाठक म्हणाला.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई: PMC बँक आणि आरे वृक्षतोडीचा फटका युतीला बसण्याची शक्यता: सविस्तर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्यावेळी पीएमसी बँकेतील गैरव्यवहारांचा आणि आरेतील मोठ्याप्रमाणावरील वृक्ष तोडीच्या मुद्द्यांमुळे भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्यातरी लाखो सामान्य ग्राहकांच्या मनातली आग तशीच धगधगत आहे आणि त्याचे परिणाम प्रत्यक्ष मतदानावर पडतील असं राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केलं आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार